सूर्यमालेत पृथ्वीसह शुक्र, शनी, मंगळ, गुरू असे अनेक ग्रह आहेत. या सर्व ग्रहांभोवती परिभ्रमण करणारे चंद्रही आहेत. अनादी काळापासून चंद्राविषयी एक वेगळे आकर्षण राहिले आहे. इतर ग्रहांसह चंद्राच्या उत्पत्तीचाही शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. सूर्यमालेतील इतर ग्रहांभोवती अनेक चंद्र आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास एकट्या शनीभोवती १४६ चंद्र आहेत; मात्र पृथ्वीभोवती फिरणारा एकच चंद्र आहे. परंतु, आता अशी एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे की, ज्यामुळे पृथ्वीलाही तात्पुरत्या कालावधीसाठी आणखी एक चंद्र मिळणार आहे. होय, हे अगदी खरे आहे. या वर्षी २९ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ‘मिनी मून’ पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालातून ही माहिती समोर आली आहे. प्रकाशित झालेला हा अहवाल नक्की काय सांगतो? ‘मिनी मून’ नक्की काय आहे? या दुर्मीळ खगोलीय घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ.

‘मिनी मून’ म्हणजे काय?

‘मिनी मून’चाच अर्थ ‘अ‍ॅस्टरॉइ़़ड 2024 PT5’ असा आहे; जो चंद्राबरोबर दोन महिने पृथ्वीभोवती परिभ्रमण करणार आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ही दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा अशनी पृथ्वीभोवती परिभ्रमण करील आणि परिभ्रमण पूर्ण होण्यापूर्वीच तो आपला मार्ग बदलून सूर्याच्या दिशेने जाईल. अशा प्रकारचे अशनी काही काळासाठी ग्रहाभोवती परिभ्रमण करून आपला मार्ग बदलतात. त्यामुळे यांना ‘मिनी मून’, असे संबोधले जाते. ही संशोधकांसाठीही एक दुर्मीळ संधी असल्याचे सांगितले जात आहे. हा अशनी पृथ्वीनंतर सूर्याभोवती परिभ्रमण करणार आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi: बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात?
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
‘मिनी मून’चाच अर्थ ‘अ‍ॅस्टरॉइ़़ड 2024 PT5’ असा आहे; जो चंद्राबरोबर दोन महिने पृथ्वीभोवती परिभ्रमण करणार आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढतेय? याचा अपचनाशी काही संबंध आहे का?

कार्लोस डे ला फुएन्टे मार्कोस व राऊल डे ला फुएंटे मार्कोस यांनी लिहिलेल्या संशोधन अहवालात असे म्हटले आहे की, गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे लघुग्रह आपल्या कक्षेत खेचण्याची क्षमता आहे. या खगोलीय वस्तू काही वेळा आपल्या ग्रहाभोवती एक किंवा अधिक पूर्ण प्रदक्षिणा घालतात. तर इतर वेळी, त्या कक्षा पूर्ण करण्यापूर्वी पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार मार्गापासून दूर जातात.

‘अ‍ॅस्टरॉइ़़ड 2024 PT5’चे मूळ चंद्राशी जुळले असले तरी मी त्याला तांत्रिकदृष्ट्या मिनी-मून म्हणू शकणार नाही. ‘अ‍ॅस्टरॉइ़़ड 2024 PT5’ पृथ्वी-चंद्र प्रणालीमध्ये एक संपूर्ण परिभ्रमणही करू शकणार नाही, त्यामुळे याचे वर्गीकरण ‘मिनी-मून’ म्हणून करायचे की नाही, याची खात्री मला नाही, लघुग्रह रडार संशोधन कार्यक्रम ‘जेपीएल’चे प्रमुख अन्वेषक लान्स बेनर यांनी ‘एनवायटी’ला सांगितले. हा अशनी केवळ प्रगत वेधशाळांनाच दिसेल, असे संशोधकांनी सांगितले. लहान आकार आणि संक्षिप्त स्वरूप असलेल्या ‘अॅस्टरॉइड 2024 PT5’चा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या जवळच्या वस्तूंच्या गतिशीलतेचा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणासह आणि या लघुग्रहाच्या परस्परसंवादाचा, आपल्या ग्रहाजवळून जाताना इतर लघुग्रह कसे वागतील याचा अंदाज शास्त्रज्ञांना घेता येईल.

‘अ‍ॅस्टरॉइ़़ड 2024 PT5’चे मूळ चंद्राशी जुळले असले तरी मी त्याला तांत्रिकदृष्ट्या मिनी-मून म्हणू शकणार नाही. अॅस्टरॉइड 2024 PT5’ पृथ्वी-चंद्र प्रणालीमध्ये एक संपूर्ण परिभ्रमणही करू शकणार नाही, त्यामुळे याचे वर्गीकरण ‘मिनी-मून’ म्हणून करायचे की नाही, याची खात्री मला नाही, लघुग्रह रडार संशोधन कार्यक्रम ‘जेपीएल’चे प्रमुख अन्वेषक लान्स बेनर यांनी ‘एनवायटी’ला सांगितले. हा अशनी केवळ प्रगत वेधशाळांनाच दिसेल, असे संशोधकांनी सांगितले. लहान आकार आणि संक्षिप्त स्वरूप असलेल्या ‘अॅस्टरॉइड 2024 PT5’चा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या जवळच्या वस्तूंच्या गतिशीलतेचा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणासह आणि या लघुग्रहाच्या परस्परसंवादाचा, आपल्या ग्रहाजवळून जाताना इतर लघुग्रह कसे वागतील याचा अंदाज शास्त्रज्ञांना घेता येईल.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांची समर्थकच त्यांच्यासाठी ठरतेय डोकेदुखी; कारण काय? कोण आहेत लॉरा लूमर?

यापूर्वीही अशी दुर्मिळ खगोलीय घटना घडली आहे?

पृथ्वीला तात्पुरता चंद्र मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००६ मध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे एक अशनी आपल्या कक्षेत खेचला गेला होता. त्याने जुलै २००६ ते जुलै २००७ या एक वर्षाच्या कालावधीत आपल्या ग्रहाची प्रदक्षिणा केली होती. नव्याने शोधलेला ‘2024 PT5’ आणि ‘2022 NX1’ यांच्यात साम्य आहे. ‘2022 NX1’ या अशनीने आधी १९८१ मध्ये आणि नंतर २०२२ मध्ये पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली होती, जो २०५१ च्या आसपास पृथ्वीच्या कक्षेत परतणे अपेक्षित आहे.