scorecardresearch

विश्लेषण : PUBG नंतर सर्वाधिक लोकप्रिय असलेला फ्री फायर गेम आहे तरी काय? जाणून घ्या…

पब्जी मोबाइलवर बंदी घातल्यानंतर काही काळानंतर हा गेम डाउनलोड करण्यामध्ये २०२० च्या तुलनेत ७२ टक्के वाढ दिसून आली.

Garena free fire india ban after pubg
(screenshot from Garena website)

टिक टॉक, पब्जी नंतर आता भारतातील लोकप्रिय मोबाईल गेम गरिना फ्री फायर वर देखील बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारने पुन्हा एकदा ५३ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. गरीना फ्री फायर हा भारतातील एक अतिशय लोकप्रिय मोबाईल गेम आहे आणि तो देखील आता गुगल प्ले स्टोरवर दिसत नाही आहे.

पब्जी मोबाइलवर बंदी घातल्यानंतर काही काळानंतर हा गेम डाउनलोड करण्यामध्ये २०२० च्या तुलनेत ७२ टक्के वाढ दिसून आली. गेल्या वर्षीही ही संख्या सर्वाधिक होती. गरीना सी  ही सिंगापूर-आधारित कंपनी आहे, पण इतर चिनी अ‍ॅप्ससोबत क्लब केली गेली आहे.

फ्री फायर म्हणजे काय?

फ्री फायर हा क्राफ्टनच्या पब्जी मालिकेतील एक फ्री-टू-प्ले बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये, ५० जणांना शस्त्रे आणि पुरवठा शोधण्यासाठी बेटावर तैनात केले जाते. त्यानंतर ते शेवटी जिवंत राहण्यासाठी ते एकमेकांमध्ये भांडतात.

पब्जी प्रमाणेच, जसजसा वेळ जातो तसतसे, उपलब्ध सुरक्षित खेळाचे क्षेत्र कमी होत जाते. त्यानंतर वाचलेल्यांना एका वर्तुळात बंद केले जाते. त्यानंतर बाहेर पडण्यासाठी, कोणीही वाहनांमधून फिरू शकतो आणि १० मिनिटांच्या सत्रात दोन किंवा तीनदा एअरड्रॉप केलेली लूट आणि शस्त्रे शोधू शकतो. हे शोधताना तुम्ही जवळपासच्या खेळाडूंना तुमची शिकार करण्यासाठी खुले आमंत्रण देखील देत असता, कारण तुमचे स्थान त्याच्यापासून निघणाऱ्या रंगीत धुरामुळे उघड होते.

गेल्या महिन्यात जेव्हा पब्जी डेव्हलपर क्राफ्टनने कॉपीराइट केलेल्या एअर ड्रॉप वैशिष्ट्यासह असंख्य मेकॅनिक्सची कॉपी केल्याचा आरोप करून, गरीना विरुद्ध दोन खटले दाखल केले होते. यामध्ये पात्रांच्या वेशभूषेशिवाय दोन खेळांमधील स्पष्ट साम्य देखील क्राफ्टनने लक्षात घेतले.

विनामूल्य मोबाइल गेम किंवा अ‍ॅप्स त्यांच्यामध्ये जाहिराती ठेवतात, ज्यावर क्लिक केल्यावर किंवा पाहिल्यावर कंपनीच्या एकूण जाहिरात कमाईमध्ये भर पडते. फ्री फायर आणि पब्जी सारखे ऑनलाइन मल्टीप्लेअर गेम या प्रणालीच्या विरोधात आहेत आणि गेममधील सौंदर्यप्रसाधने आणि बॅटल पास सिस्टमद्वारे त्यांच्या उत्पादनाची कमाई करण्यास प्राधान्य देतात.

बॅटल पास कॅलेंडरप्रमाणे काम करतो. फ्री फायर दैनंदिन आणि साप्ताहिक आव्हाने देते, जे पूर्ण झाल्यावर गुण मिळतात ज्याचा उपयोग विशेष फिचर अनलॉक करण्यासाठी केला जाऊ शकतो. एलिट पास म्हणून डब केलेले, खेळाडू गेम स्टोअरमधून ४०० हिरे (गेममधील चलन) वापरून ते खरेदी करू शकतात.

फ्री फायर मॅक्स म्हणजे काय?

फ्री फायर मॅक्सचे दोन व्हर्जन आहेत. त्या दोन्ही डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य आहेत. फ्री फायर मॅक्स बंदी घातलेल्या गेमच्या यादीत नाही म्हणून ते आत्ता डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. व्हिज्युअल फिडेलिटीचा त्याग करताना कमी संसाधने घेऊन तुम्ही गेमच्या ‘लाइट’ व्हर्जनचा विचार करु शकता. अँड्रॉइडवर, फ्री फायर चालवण्‍यासाठी किमान १ जीबी रॅमची आवश्‍यकता आहे, जी बर्‍याच स्मार्ट फोनवर सहज असते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-02-2022 at 21:04 IST