ज्ञानेश भुरे

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) प्रत्येक पर्व हे गाजतेच. याची सुरुवात खेळाडूंच्या लिलावापासून होते. नवा हंगामातील लिलावही याला अपवाद ठरला नाही. या वेळी लिलाव छोटेखानी झाला असला, तरी लिलावातील खरेदीचे आकडे हे मोठे होते. अशा या महागड्या खेळाडूंची आयपीएलमधील आजवरची कामगिरी कशी होती हे जरा पाहू…

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 : केएल राहुलने वर्षानुवर्षे धोनीच्या नावे असलेला मोठा विक्रम मोडला, ही कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

नव्या हंगामात महागड्या ठरणाऱ्या खेळाडूंमागे नेमके कोणते कारण असू शकते?

आयपीएलमध्ये महागडे ठरलेल्या खेळाडूंच्या निवडीमागे एकतर ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची त्यांची असलेली क्षमता, गुणवत्ता आणि खासकरून अष्टपैलू क्षमता यांना महत्त्व दिले गेले. अर्थात, वय याकडेही लक्ष दिले असावे. कारण सर्वाधिक महागडे ठरलेले सॅम करन आणि कॅमेरुन ग्रीन हे युवा खेळाडू असून, त्यांच्यासमोर खूप क्रिकेट शिल्लक आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत ते आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. बेन स्टोक्सही याच जातकुळीतला खेळाडू. निकोलस पूरन आणि हॅरी ब्रूक्स हे केवळ फलंदाज म्हणून निवडले गेले.

लिलावातील महागडा सॅम करन कामगिरीने किती ‘श्रीमंत’ आहे?

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक महागडा ठरलेला सॅम करन हा मैदानावर देखील श्रीमंती सिद्ध केलेला खेळाडू म्हणता येईल. इग्लंडचा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू म्हणून करनकडे बघितले जाते. यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून १४ ट्वेन्टी-२० सामने खेळताना २५ गडी बाद केले आहेत. फलंदाजीतही त्याची सुधारणा असून, आता तो फिरकी गोलंदाजी अधिक सहज खेळू शकतो. करनने २०२०पासून ३१ ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजीत २७.०७ इतकी सरासरी राखली असून, १५४.६९चा स्ट्राईक रेट राखला आहे.

कॅमेरुन ग्रीन, बेन स्टोक्स यांचा मैदानावरील प्रभाव कसा राहिला?

मैदानावर प्रभाव असल्यामुळेच या खेळाडूंना लिलावात भाव मिळाला. ग्रीनने क्रिकेटच्या या प्रारूपात गेल्या सहा महिन्यांत आपला प्रभाव खूपच ठळकपणे पाडला आहे. विश्वचषकानंतर झालेल्या भारत दौऱ्यात त्याने तीन सामन्यांत दोन अर्धशतकांसह २१४.५६च्या स्ट्राईक रेटने ११८ धावा केल्या. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजीला पाठवा, केव्हाही गोलंदाजी द्या, मिळालेल्या संधीत जेवढी सर्वोत्तम कामगिरी करता येते ती करून दाखवतो. स्टोक्स हा इग्लंडचा आणखी एक गुणी अष्टपैलू. मर्यादित षटकांच्या आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याने स्वतःचे भक्कम स्थान बनवले आहे. तिसऱ्यांदा त्याला दहा कोटींहून अधिक रक्कम मिळाली. फ्रॅंचायजी मालकांचे इतके प्रेम मिळविणारा तो एकमेव खेळाडू ठरावा. आतापर्यंत स्टोक्सने पाच आयपीएल खेळताना ४३ सामन्यांत प्रत्येकी दोन शतके, अर्धशतकांसह ९२० धावा केल्या असून, १३४.५०चा स्ट्राईक रेट राखला आहे. गोलंदाजीत त्याने ३४.७९ सरासरी राखताना २८ गडी बाद केले आहेत.

ब्रूक आणि पूरन कसे ठरतात महागडे क्रिकेटपटू?

ब्रूककडे आयपीएलचा भविष्यातील खेळाडू म्हणून बघितले जाते. दोन महिन्यांपूर्वी तो पाकिस्तानविरुद्ध प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला. आपल्या आक्रमक फलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष हेरून घेतले. ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेत त्याने १६३.०१च्या सरासरीने २३८ धावा केल्या. आशियातील सर्व ट्वेन्टी-२० सामने पकडून ब्रूकने १६ डावांत १६७.४३च्या स्ट्राईक रेटने ५८१ धावा केल्या आहेत. हंगामात पुन्हा कोट्यवधी ठरलेला पूरन मैदानावर मात्र आपल्या गुणवत्तेला तेवढा न्याय देऊ शकलेला नाही. ट्वेंन्टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तो अपयशी ठरला. आयपीएल २०२२ मध्ये मात्र त्याने सनरायझर्सकडून खेळताना दोन अर्धशतके, २३४.६९च्या स्ट्राईक रेटने ३०६ धावा केल्या होत्या. अलीकडेच अमिरातीतील टी-१० क्रिकेटमध्ये तो कमालीचा यशस्वी ठरला. त्याने ३४५ धावा करताना स्पर्धेचा मानकरी किताब पटकावला.

यापूर्वीच्या महागड्या खेळाडूंची मैदानावरील श्रीमंती कशी राहिली?

लिलावात महागडे ठरलेले खेळाडू मैदानावर श्रीमंती दाखवू शकलेत असे अभावाने घडले आहे. काईल जेमिसन (१५ कोटी) २०२१ मध्ये महागडा ठरला, पण मैदानावर तो ९ सामन्यांत ९ गडीच बाद करू शकला आणि केवळ ६५ धावा केल्या. कमिन्सला (१५.५ कोटी) २०२० मध्ये सर्वाधिक बोली लागली. या बोलीसाठी तो पात्र ठरला. त्याने १२ गडी बाद केले आणि अखेरच्या षटकांत फलंदाजीला उतरताना त्याने आपली फलंदाजीतील कुवतही दाखवून दिली. युवराज (१६ कोटी) २०१४ मध्ये महागडा ठरला, पण ते वर्ष त्याच्यासाठी दुर्दैवी होते. तो कुठेच फारसा चमकू शकला नाही. युवराजने १४ सामन्यांत २४८ धावा केल्या. त्यानंतर नव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने त्याला ७ कोटींतच खरेदी केले. तेव्हा २०१६ मध्ये सनरायझर्ससाठी तो ‘लकी’ ठरला. त्या हंगामात वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्सने विजेतेपद मिळविले. ख्रिस मॉरिसने (१६.२५ कोटी) आपल्यावरील बोली सार्थ ठरवली. त्याने ११ सामन्यांत १५ गडी बाद केले, पण फलंदाजीत तो केवळ ६७ धावाच करू शकला. भारताच्या ईशान किशनला (१५.२५ कोटी) २०२२ मध्ये सर्वाधिक बोली लागली, पण फलंदाजीत तो फार चमक दाखवू शकला नाही. त्याला १४ सामन्यांत १२०च्या स्ट्राईक रेटने ४८१ धावाच करता आल्या.

भारतीय सर्वात महागडा आणि यशस्वी क्रिकेटपटू कोण?

भारतीय खेळाडूंमध्ये आतापर्यंत युवराज सिंगच सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरतो. त्यानंतर ईशान किशन, हार्दिक पंड्या, गौतम गंभीर, दीपक चहर यांचा क्रमांक येतो. यामध्ये २०१५ मध्ये १५ कोटी रुपये मिळविणारा हार्दिक पंड्या हा यशस्वी क्रिकेटपटू ठरतो. त्याने १५ सामन्यांत ४८७ धावा करताना १३१.२७ स्ट्राईक रेट राखला. त्याने आठ गडी बाद केले. ईशान किशनने थोडाफार न्याय देताना १४ सामन्यात ४१८ धावा केल्या. युवराजला २०१४ आणि २०१६ मध्ये सर्वाधिक रक्कम मिळाली. यात प्रथम त्याने ३७८, तर दुसऱ्या वेळी केवळ २४८ धावाच केल्या.