महाराष्ट्रातील लोककलेमध्ये लावणी प्रकाराला मोठे महत्त्व आहे. गेली अनेक वर्ष हा प्रकार सातत्याने सुरु आहे. आजही महाराष्ट्रात लावणी महोत्सव भरताना दिसून येतात. सध्या लावणीमुळे गौतमी पाटील हे नावएका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, बिभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. या सर्व प्रकरणानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता सातत्याने चर्चेत आहे. नेमका प्रकरण काय जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील लोणी काळभोर येथील दहीहंडी दरम्यान गौतमीच्या पांढऱ्या साडीचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. तिने सादर केलेल्या नृत्यामध्ये अश्लील हावभाव असल्याने तिच्यावर मोठया प्रमाणात टीका होऊ लागली. आजवर अनेक ठिकाणी लावण्यांचे कार्यक्रम होतात मात्र गौतमीच्या नृत्याने खळबळ उडाली होती. इतकंच नव्हे तर अलीकडेच मिरज तालुक्यातील बेडग येथे गौतमीचा डान्स बघायला आलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन दत्तात्रय ओमासे यांचा मृत्यू झाला होता.

विरोध :

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही अशा तरुणी महाराष्ट्राची कला अश्लीलतेकडे घेऊन जात आहेत अशा शब्दात गौतमीचा विरोध केला होता. लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी या प्रकरणावर संतापजनक पोस्ट शेअर केली होती तसेच गौतमीला माफी मागायला लावली होती. अभिनेत्री नृत्यांगना माधुरी पवारने देखील या प्रकणावर भाष्य केलं आहे, ती असं म्हणाली एका कलाकारानं दुसऱ्या कलाकारावर लांच्छन करू नये. जे काही बाहेर चाललंय त्यातून कलेचं विभत्स रूप दिसतं. तुमच्या कलेचा रिस्पेक्ट तुम्ही किती ठेवता यावर सर्व काही आहे, असं मत माधुरी पवार यांनी व्यक्त केलं.

या प्रकरणाला राजकीय वळणदेखील लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्यांनी गौतमी पाटीलला आळा घातला नाही तर गृहमंत्रालयाच्या काचा फोडू असा इशारा दिला होता. तसेच गौतमीच्या नृत्यावर कायमची बंदी घाला अशी मागणी राष्ट्र विकास सेनेने केली आहे. गौतमीवर एकीकडे टीकेची झोड उठली असताना दुसरीकडे तिचा सोलापूर येथे कार्य्रक्रम झाला. या कार्यक्रमाला तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत लोकांनी गर्दी केली होती. याआधी तिचा इंदापूर येथील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

विश्लेषण : भीषण अपघातानंतर ऋषभ पंतची कार क्षणात पेटली; जाणून घ्या, अशावेळी का लागू शकते कारला आग?

गौतमीची भूमिका :

गौतमीने नुकतंच साम टीव्ही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत गौतमीने कार्यक्रमाबाबतची तिची भूमिका स्पष्ट केली आहे. गौतमी म्हणाली, “पूर्वी माझ्याकडून चूक झाली, हे मी मान्य करते. पण तेव्हापासून माझा पदर नीट असतो, मी केस मोकळे सोडत नाही. मी काहीही अश्लील डान्स करत नाही. त्यामुळे आता माझ्या कार्यक्रमांबद्दल आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही”.

कोण आहे गौतमी :

गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. १० वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले. पहिल्यांदा लावणी केल्यावर गौतमीला ५०० रुपये मानधन मिळाले होते. गौतमी सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. तिचे रिल्स कायम चर्चेत असतात.

मराठी चित्रपटात झळकणार :

काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. “माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा” असेही आवाहन तिने केले आहे. २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच गौतमी तिच्या चाहत्यांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ किंवा २ जानेवारीला गौतमी नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained know more about lavani performer gautami patil who is also social media star spg
First published on: 30-12-2022 at 18:22 IST