युक्रेनविरुद्धच्या युद्धादरम्यान, रशियाने युक्रेनमध्ये आपला सर्वात धोकादायक बीएमपीटी टर्मिनेटर टँक तैनात केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रशियन लष्कराने युद्धपातळीवर या रणगाड्याला मान्यता दिली होती. आता रशियन सैन्याने युक्रेनच्या एका भागात आपली नवीन आवृत्ती बीएमपीटी-७२ तैनात केले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा टर्मिनेटर टँक, इतर चिलखती वाहनांसह, युद्धभूमीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

टर्मिनेटर रणगाडे उर्वरित रणगाड्यांसह युक्रेनमध्ये धुमाकूळ घालत आहेत. सीमावर्ती भागातही ते गस्त घालत आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार बीएमपीटी टर्मिनेटर टँक तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. टर्मिनेटर टँक २०२२ च्या सुरुवातीस रशियन सैन्यात औपचारिकपणे तैनात करण्यात आले होते. रशियाने २०१७ मध्ये सीरियातील युद्धग्रस्त भागात ते तैनात केले होते. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद यांनी सीरियातील हेम्मिम विमानतळावर रशियन चीफ ऑफ स्टाफ जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांची भेट घेतली तेव्हा छायाचित्रांमध्ये हे रणगाडे दिसले होते.

Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
What is the Click here trend
X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?
what is isis khorasan
विश्लेषण : रशियातील हल्ल्याची जबाबदारी घेणारी ‘इस्लामिक स्टेट खोरासन’ संघटना नेमकी आहे तरी काय?

‘टर्मिनेटर’ म्हणजे काय?

टर्मिनेटर किंवा बोयेवाया मशिना पोडरझकी टँकोव्ह (BMPT), हे रशियाने विकसित केलेले टँक सपोर्ट फायटिंग व्हेईकल आहे. पाश्चात्य लष्करी विश्लेषकांचा असा विश्वास आहे की रशियाने अफगाण आणि चेचेन युद्धादरम्यान वापरलेल्या मुख्य लढाऊ रणगाड्यांना समर्पित संरक्षण प्रदान करण्याची गरज असल्याचे ओळखल्यानंतर टर्मिनेटर विकसित केले. हे शत्रूच्या पायदळापासून रशियन टँकचे संरक्षण करण्यासाठी तयार केले होते. हे टॅंक शहरी भागातील लढायांच्या वेळी त्याच्या इतर रणगाड्यांना आणि लढाऊ वाहनांना मदत पुरवते. हे ९ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये रशियन आर्म्स एक्सपोमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाले होते.

रशियन सैन्याने हे कुठे तैनात केले आहेच?

ब्रिटन संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या गुप्तचर अहवालानुसार, BMP-T टर्मिनेटर टँक रशियन सैन्याने सेवेरोडोनेत्स्क, डॉनबास येथे तैनात केली आहेत. अहवालात असे म्हटले आहे की टर्मिनेटरच्या उपस्थितीमुळे सेंट्रल ग्रुपिंग ऑफ फोर्सेस (सीजीएफ) देखील युक्रेनमधील हल्ल्यांमध्ये सामील आहे. सीजीएफ हा एकमेव रशियन सैन्य गट आहे ज्याने हे वाहन तयार केले आहे. युक्रेनमधील हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात सीजीएफ पूर्व किव्हमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरले होते.

टर्मिनेटरची वैशिष्ट्ये काय आहेत?

टर्मिनेटरने सुसज्ज असलेल्या शक्तिशाली शस्त्रांच्या यादीमध्ये ४×१३० मिमी अटाका-टी GWS लाँचर्स, २×३० मिमी २A४२ ऑटोकॅनन्स (८५० राउंड), २x३० मिमी AG-१७D किंवा २x AGS-३० ग्रेनेड लाँचर्स (६०००), १×७.६२ मिमी PKTM मशीन गन (२,००० राउंड) समाविष्ट आहे. ही शस्त्रे एकापाठोपाठ एकापेक्षा जास्त दिशेने गोळीबार करण्यास सक्षम आहेत. त्याच वेळी, ते शत्रूचा गोळीबार नष्ट करण्यास देखील सक्षम आहे. हे हलकी आणि जड वाहने देखील लक्ष्य नष्ट करते.