scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण: सौदी अरेबियाने दहशतवादाचे द्वार म्हणत बंदी घातलेली तबलिगी जमात किती मोठी आहे?; जाणून घ्या..

सौदीच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयाने मशिदीतील प्रचारकांना तबलिगी जमातबद्दल लोकांना सावध करण्याचे आदेश दिले आहेत

saudi Arabia ban tablighi and dawah group
(फोटो सौजन्य – Wikimedia Commons)

सौदी अरेबियाने तबलिगी आणि दावा गटावर बंदी घातली आहे ज्याला अल अहबाब म्हणून ओळखले जाते. सौदी सरकारने या गटाचे वर्णन समाजासाठी धोका आणि दहशतवादाचे एक द्वार असे केले आहे. सौदीच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयाने मशिदीतील प्रचारकांना तबलिगी जमातबद्दल लोकांना सावध करण्याचे आदेश दिले आहेत. सरकानरने या संघटनेकडून होत असेलेली दिशाभूल आणि धोक्याबद्दल मशिदींना सांगण्यास सांगितले आहे.

सरकारचे या संदर्भातील ट्विट तबलिगी जमातबाबत होते की नाही हे स्पष्ट नाही. इस्लामिक विद्वान आणि शिक्षक मौलाना मुहम्मद इलियास यांनी १९२७ मध्ये मेवात येथे सुन्नी इस्लामिक मिशनरी चळवळ म्हणून याची सुरुवात केली होती. इलियास यांचे म्हणणे होते मुस्लीमांना मुस्लिम बनायला हवं. सौदी अरेबिया सरकारने या गटावर बंदी का घातली आहे आणि तबलिगी जमातच्या काही मतांमुळे आणि व्याख्यांमुळे ही बंदी आहे का हे देखील स्पष्ट नाही.

अनेक देशांमध्ये तबलिगी जमातवर बंदी

२०१३ मध्ये कझाकिस्तानने तबलिगी जमातला अतिरेकी संघटना म्हणून बंदी घातली. इराण, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान सारख्या देशांमध्येही यावर बंदी आहे. तथापि, दारुल उलूम देवबंदने १२ डिसेंबर रोजी एका निवेदनात सौदी अरेबिया सरकारच्या निर्णयावर टीका केली. तबलीघी जमातवरील दहशतवादाचे आरोप निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. सौदी सरकारला या प्रकरणी आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे आणि तबलिगी जमातवर अशी कारवाई करण्यापासून रोखले आहे.

तर दुसरीकडे तबलिगी जमातीची चळवळ १५०हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे. अहवालानुसार, तबलिगी हे प्रामुख्याने मिशनरी होते ज्यांनी मुस्लिम समाज बदलण्याचा आणि मुस्लिमांना सत्याच्या मार्गावर परत आणण्याचा प्रयत्न केला..

जमातशी संबंधित लोकांची नावे दहशतवाद आणि अतिरेकाशी संबंधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. जेम्सटाउन फाऊंडेशनच्या अहवालात असे म्हटले आहे की जमातने पारंपारिकपणे राजकारणापासून दूर राहून मुस्लिमांचा विश्वास दृढ करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

तबलिगी जमात चळवळ

या चळवळीची मुळे १५० हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे आणि आजची सर्वात मोठी इस्लामिक मिशनरी चळवळ आहे. देवबंदमधील दारुल उलूम मदरशातून उगम पावले. “इस्लाम ऑन द मूव्ह” यामध्ये त्याबाबत उल्लेख असून हे पुस्तक फारिश ए नूर यांनी लिहिले आहे.

पुस्तकात असेही म्हटले आहे की तबलिगी हे प्रामुख्याने मिशनरी होते ज्यांनी मुस्लिम समाजात परिवर्तन करण्याचा आणि मुस्लिमांना सत्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. चळवळ मुख्यतः सामान्य मुस्लिमांपर्यंत पोहोचून त्यांचा धर्मावरील विश्वास पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि त्यांना विधी, पेहराव आणि वैयक्तिक वर्तन या विषयांवर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कार्य करते. ” तबलिगी जमातचा अतिरेक न करता, असे म्हणता येईल की ही चळवळ या अर्थाने काहीशी खास आहे की जगभरातील इतर अनेक मिशनरी चळवळींप्रमाणे, ती धर्माच्या बाहेरील लोकांना नव्हे तर आतल्या लोकांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करते,” असे पुस्तकात म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained saudi arabia ban tablighi and dawah group abn

ताज्या बातम्या