पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा चिनी नागरिकांवर हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर अवघ्या २४ तासांत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने याची जबाबदारी स्वीकारली. हा फिदाईन हल्ला करणारा शरी बलोच उर्फ ​​ब्रमश ही बीएलएच्या मजीद ब्रिगेडचा भाग असल्याचे सांगण्यात आले. आता चीन आणि पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणारी ही मजीद ब्रिगेड कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेकडो सुरक्षा कर्मचारी आणि कोट्यवधी रुपये खर्च करूनही या ब्रिगेडवर नियंत्रण का ठेवता येत नाही? असाही प्रश्नही विचारला जात आहे.

पाकिस्तानमध्ये कराची सिंध विद्यापीठातील कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूटजवळ व्हॅनजवळ झालेल्या स्फोटात चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा आत्मघाती हल्ला बीएलएच्या मजीद ब्रिगेडची महिला फिदायन हल्लेखोर शरी बलोच उर्फ ​​ब्रमश हिने केला आहे.

Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार
PNS Siddique naval base under attack
चीनची गुंतवणूक असलेल्या पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला; या आठवड्यातली दुसरी घटना
Why does Balochistan province want to secede from Pakistan Why did Balochistan attack Gwadar port
बलुचिस्तान प्रांताला पाकिस्तानपासून अलग का व्हायचे आहे? ग्वादार बंदरावर बलुचिस्तानींनी हल्ला का चढविला?
Gwadar port authority
चीनची भागीदारी असलेल्या पाकिस्तानमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला; आठ अतिरेक्यांचा खात्मा

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही पाकिस्तानातील एक अतिरेकी संघटना आहे, ज्याचा उद्देश बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करणे हा आहे. पाकिस्तानी लष्कर बलुचिस्तानमधील स्थानिक लोकांशी अमानुषपणे वागते, असे बीएलएचे म्हणणे आहे. बलुच नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने बलुचिस्तानच्या भल्यासाठी कधीही पावले उचलली नाहीत आणि केवळ लोकांचे केले आहे. पाकिस्तानसह अनेक देश याला दहशतवादी संघटना मानतात. बीएलए १९७० पासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. अलीकडच्या काळात बीएलएने पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत.

बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रांत आहे. त्याची सीमा इराण आणि अफगाणिस्तानशी जोडलेली आहे. सामरिक दृष्टिकोनातूनही हा परिसर पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा आहे. येथे तीन नौदल तळ आहेत. चगई अणुचाचणीचे ठिकाणही बलुचिस्तानमध्ये आहे. याशिवाय बलुचिस्तानमध्ये तांबे, सोने आणि युरेनियमचे साठे आहेत. या भागात साधनसंपत्तीची कमतरता नाही, पण त्याचा लाभ स्थानिकांना मिळत नाही. बलुच लोकांना शिक्षणाचीही सोयही नाही.

भारताच्या फाळणीच्या वेळी, ज्या संस्थानांवर थेट ब्रिटिश साम्राज्याचे नियंत्रण नव्हते, त्या संस्थानांना त्यांचे भविष्य निवडण्याचे स्वातंत्र्य असेल, असे ठरले होते. बलुचिस्तान हे असेच एक संस्थान होते. बलुचिस्तानचे तीन भाग पाकिस्तानमध्ये विलीन झाले. पण कलातच्या राजाने स्वतःला स्वतंत्र घोषित केले. फाळणीनंतर २५५ दिवसांपर्यंत ही स्वतंत्र व्यवस्था चालू होती.

त्यानंतर ३० मार्च १९४८ रोजी पाक लष्कराने कलातवर हल्ला केला. कलातचा राजा मीर अहमद यार खान याला उचलून कराचीत आणण्यात आले. तेथे त्यांना विलीनीकरणाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यास भाग पाडले. बलुच लोक हे विलीनीकरण बेकायदेशीर मानतात. गेली ७४ वर्षे सातत्याने स्वातंत्र्याची मागणी होत आहे. पाकिस्तानकडून ही मागणी दाबण्यात येते. याकाळात हजारो बलुच नागरिक मारले गेले किंवा बेपत्ता झाले आहेत.

दडपशाही आणि हिंसाचाराच्या मधूनच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेची निर्मिती झाली आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची गरज असल्याचे तिथल्या लोकांचे म्हणणे आहे. यामध्ये केवळ पाकिस्तानातीलच नाही, तर संपूर्ण ग्रेटर बलुचिस्तानची मागणी करण्यात येत आहे. या भागाची पहिल्यांदा भारतातील मुघलांनी आणि पर्शियाच्या सफाविद साम्राज्याने विभागणी केली होती. नंतर इराण-ब्रिटनने त्याची विभागणी केली. थोडासा भाग इराणमध्ये तर थोडासा अफगाणिस्तान गेला. उरलेला थोडासा भाग पाकिस्तानात आला. अनेक बलुचिस्तानी लोकांप्रमाणे, बीएलएलाही ऐतिहासिक बलुचिस्तान एकत्र करून एक वेगळे राज्य बनवायचे आहे.

बीएलएने २०२१ मध्ये किमान १२ हल्ले

बीएलए गनिमी हल्ले करण्यासाठी ओळखली जाते. २०२१ मध्ये बीएलएने किमान १२ हल्ले केले होते. २०२० मध्ये झालेल्या हल्ल्यात बीएलएने १६ पाकिस्तानी सैनिक मारले होते. बीएलए बलुचिस्तानच्या प्रदेशात अधिक सक्रिय आहे. परंतु पाकिस्तानच्या इतर भागातही त्यांच्या कारवाया होत असतात. बीएलएची स्थापना अधिकृतपणे २००० मध्ये झाली होती पण ते १९७३ पासून स्वतंत्र बलुचिस्तानच्या लढ्यात सहभागी आहे. भारत आणि अफगाणिस्तान बीएलएला पाठिंबा देत असल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे.

पाकिस्तानचा ध्वज उतरवल्यावर फडकावला बीएलएचा झेंडा

पाकिस्तानमध्ये कायदे-ए-आझम-रेसिडेन्सी हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी मोहम्मद अली जिना यांनी आयुष्याचे शेवटचे दिवस घालवले होते. १५ जून २०१३ रोजी या इमारतीवर रॉकेट हल्ला झाला होता. त्यानंतर इमारत कोसळली होती. याची जबाबदारी बीएलएने घेतली होती. बीएलएच्या सदस्यांनी स्मृतीस्थळावरून पाकिस्तानचा ध्वज हटवला आणि बीएलएचा ध्वज लावला. या इमारतीची नंतर पुनर्बांधणी करण्यात आली आणि १४ ऑगस्ट २०१४ रोजी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासाठी निवासस्थान उघडण्यात आले.