अलीकडील काळात व्हॉट्सअ‍ॅप  गोपनीयतेबद्दल बऱ्याच काही चर्चा सुरू आहेत. खरं तर, या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने नुकतेच ऑनलाइन स्टेटस लपवणे, कोणालाही सूचित न करता ग्रुप चॅट सोडणे आणि बरेच काही यासारख्या गोपनीयता वैशिष्ट्यांची (फिचर्स) श्रेणी सादर केली आहे. ही वैशिष्ट्ये लवकरच प्रत्येक वापरकर्त्यापर्यंत पोहोचतील, याची कंपनीने आधीच पुष्टी केलेली आहे. व्हॉट्सअ‍ॅप गेल्या अनेक वर्षांपासून हायलाइट करत असलेले आणखी एक गोपनीयता वैशिष्ट्य म्हणजे “एंड-टू-एंड एन्क्रिप्शन”.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअ‍ॅप म्हणते की प्लॅटफॉर्मवर एक्सचेंज केलेल्या सर्व चॅट्स संरक्षित किंवा “एनक्रिप्टेड” आहेत. सोप्या शब्दात, व्हॉट्सअ‍ॅपनुसार प्लॅटफॉर्मवर पाठवलेल्या किंवा प्राप्त झालेल्या चॅट्स केवळ मेसेज पाठवणाऱ्याला किंवा प्राप्तकर्त्याला दिसतात इतर कोणालाही नाही. अगदी व्हॉट्सअ‍ॅप  किंवा त्याची मूळ कंपनी मेटाला देखील नाही. व्हॉट्सअ‍ॅप  नुसार, एंड-टू-एंड एनक्रिप्शन पॉलिसी अंतर्गत – सर्व मेसेज, फोटो, व्हिडिओ, व्हॉईस मेसेज, डॉक्युमेंट्स, स्टेटस अपडेट्स आणि प्लॅटफॉर्मवर एक्सचेंज केलेले कॉल सुरक्षित आहेत आणि कोणालाही त्याचा ताबा मिळवता येणार नाही. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन हे सुनिश्चित करते की मेसेज पाठवणारा आणि प्राप्तकर्ता यांच्यात चॅट सुरक्षित आहेत आणि व्हॉट्सअ‍ॅपसह कोणीही कोणत्याही वेळी संभाषणात प्रवेश करू शकत नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained whatsapp chats are end to end encrypted what exactly does this mean msr
First published on: 19-09-2022 at 20:31 IST