USA R Bonney Gabriel Miss Universe 2022 : जगभरातील ८४ स्पर्धकांना मागे टाकत यूएसएच्या आर’बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) हिने ७१ व्या मिस युनिव्हर्स पेजेंटचे विजेतेपद पटकवले आहे. गॅब्रिएलच्या रूपात जगाला नवी मिस युनिव्हर्स मिळाली आहे. १५ जानेवारीला न्यू ऑर्लिन्स येथे पार पडलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात यंदाचा मिस युनिव्हर्स किताब जाहीर करण्यात आला.

भारताच्या हरनाझ कौर सिंधू हिने नव्या मिस युनिव्हर्सला मानाचा मुकुट देऊन गौरवले. व्हेनेझुएलाची अमांडा डुडामेल पहिली तर डॉमिनिकन रिपब्लिकची आंद्रेना मार्टिनेझ दुसरी उपविजेता ठरली. तर, भारतीय दिविता रायने टॉप १६ मध्ये स्थान मिळवले.

आर’बोनी गॅब्रिएल नेमकी आहे तरी कोण? –

आर’बोनी गॅब्रिएलचा जन्म सॅन अँटोनेयो, टेक्सास येथे २० मार्च १९९४ रोजी झाला. ती रेमिजिओ बोनझोन उर्फ आर. बोन गॅब्रिएल यांची मुलगी आहे जे मूळचे फिलिपियन आहेत. जे नंतर अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. त्यांच्या आईचे नाव डाना वॉलकर आहे, ज्या की अमेरिकन आहेत.

गॅब्रिएल ही अमेरिकेतील ह्यूस्टन टेक्सासची रहिवासी आहे. अन्य गॅब्रिएलने २०२२ मध्ये मिस टेक्सासचा किताब जिंकून इतिहास रचला होता. ती मूळ फिलिपीन्स असणाऱ्यांपैकी पहिली अमेरिकन होती जिने हा किताब जिंकला होता. इतकंच नाही तर आर बोनी गॅब्रिएल ही एक प्रोफेशनल फॅशन डिझायनरदेखील आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून तिने शिवणकाम सुरू केले होते. यानंतर तिने आपल्या छंदाला अनुसरून शिक्षण घेतले आणि २०१८ मध्ये यूनिवर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास येथून फॅशन डिझाइनमध्ये पदवी मिळवली.

फॅशन डिझायनिंगसोबतच आर बोनी गॅब्रिएलने मॉडेलिंगमध्येही आपला करिष्मा दाखवला आहे. मिस युनिव्हर्स होण्याअगोदर आर बोनी गॅब्रिएलने मिस यूएसचा किताबही जिंकला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गॅब्रिएलला कपडे रिसाइकल करण्याचाही छंद आहे. २०२२ मध्ये मिस टेक्सास अमेरिकेसाठी तिने जो पोशाख परिधान केला होता, तो एका जुन्या कोटपासून तयार करण्यात आला होता, ज्याचे डिझाइनिंग तिने स्वत: केले होते.