महागाईने देशाचे कंबरडे मोडले आहे. भाजीपाल्यापासून ते अगदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्वच गोष्टी महागल्या आहेत. सोनी, अँपल, सॅमसंगसारख्या बलाढ्य कंपन्यांनी देखील आपल्या वस्तूंच्या किंमती वाढवल्या आहेत. यातील सोनी कंपनीने नुकतेच आपल्या ‘प्लेस्टेशन ५’ या गॅजेटची यूके आणि कॅनडासह इतर अनेक बाजारपेठांमध्ये किंमत वाढवली आहे. आर्थिक स्थिती आणि मंदी ही दोन प्रमुख कारणे कंपनीने किंमत वाढवण्यामागे सांगितली आहेत.

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
smart farm system marathi news
शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?
Hero MotoCorp sales
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Hero ची बाजारपेठेत ‘हिरोगीरी’; विक्रीत मोठी वाढ, बाईक खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा

अनेकांच्या मते, ‘सध्याची आर्थिक मंदी, महागाईमुळे’ तंत्रज्ञानशी निगडित उत्पादने अधिक महाग होत आहेत. टेक उत्पादने बाजारात आल्यानंतर क्वचितच त्यांची किंमत वाढवली जाते. आधीच अशा उत्पादनांची मागणी काही प्रमाणातच असते. त्यामुळे यात काही किरकोळ प्रमाणात किंमत वाढवण्यात आली आहे. ७ सप्टेंबर रोजी लाँच होणार्‍या आयफोन १४ सारख्या फोनच्या किंमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, असे संकेत दिले जात आहेत.

जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा आर्थिक अंदाज दर्शवला जो अपेक्षित अंदाजापेक्षा खूप कमी प्रमाणात होता. अमेरिका, चीन, यूरोप बाजारपेठा वाढीचा जो अंदाज अपेक्षित करत आहेत त्यापेक्षा ते मागे आहेत. या मंदीसाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरत आहेत जसे की, युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध, वाढती चलनवाढ, चीनमधील मंदी, चलनामध्ये घसरण आणि जगभरातील कडक आर्थिक धोरणे इत्यादी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना जगाच्या अर्थव्यवस्थेकडून यावर्षी केवळ ३.२ वाढीची अपेक्षा करत आहे. मागच्यावर्षी पेक्षा यंदा ६. १ टक्क्याने जगाची अर्थव्यवस्था घसरली आहे. पुढच्या वर्षीकडून केवळ २.९ टक्क्यांनी अर्थव्यवस्था वाढेल इतकीच अपेक्षा संघटनेने ठेवली आहे.

विश्लेषण : ईआरडी तंत्रज्ञान वनजीवनाच्या मुळावर?

महागाई हे क्रयशक्तीचे ( purchasing power) मोजमाप आहे. जेव्हा किंमती वाढतात, तेव्हा लोकांना ते परवडत नाही. अमेरिकेत कायम पेट्रोल आणि किराणा मालाच्या किंमती गगनाला भिडलेल्या असतात. चलन वाढीचा फटका इतर देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताला कमी बसला आहे. सोनीने त्याच्या कन्सोलच्या किंमतीत वाढ करण्यामागे महागाईचा उल्लेख केला आहे. जपानी टेक मेजरने अमेरिका आणि भारतात PS5 ची किंमत आत्तापर्यंत वाढवली नाही.

मेटा, पूर्वीचे फेसबुकने अलिकडेच त्यांच्या दोन वर्ष जुन्या Quest 2 व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटची किंमत $१०० ने वाढवली आहे. ग्राहकांचे स्वारस्य ठेवण्यासाठी टेक उत्पादनांच्या किंमती सुरवातीला ठेवल्या जातात, कालांतराने त्या कमी होतात. कारण त्यातील घटक खर्च कमी होतो आणि मोठ्या वापरकर्त्यांच्या बेससह सॉफ्टवेअर आणि सदस्यांकडून महसूल वाढला जातो. Carl Pei च्या मालकीचा Nothing हा स्मार्टफोन बाजारपेठेतील इतरांच्या तुलनेत नवीन आहे. तरी देखील त्यांनी भारतात आपल्या पहिल्या स्मार्टफोनची किंमत रु. १००० ने वाढवली आहे. नथिंग फोन (१) च्या बेसिक व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आहे, ज्याची किंमत आता ३३,९९९ रुपये असेल.

सॅमसंग, जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन आणि मेमरी चिप बनवणारी कंपनी आहे. त्यांचे फ्लॅगशिप-ग्रेड फोल्डेबल स्मार्टफोन्स – Galaxy Z Fold ४ आणि Flip ४ हे फोन भारतात थोड्या जास्त किंमतीत आणत आहे. फोल्ड ४ आणि फ्लिप ४ ची किंमत अनुक्रमे १,५४,९९९ आणि ८९,९९९ रुपयांपासून सुरू होते . फोल्ड ३ आणि फ्लिप ३ अनुक्रमे १,४९,९९९ आणि ८४,९९९ रुपयांपासून सुरू होते. Galaxy Watch ५ ची किंमत देखील जास्त आहे, जी कंपनीने Galaxy Watch ४च्या किंमतीपेक्षा ४००० रुपये जास्त आहे.

मायक्रोसॉफ्टनेही भारतात त्यांच्या Xbox Series X आणि S मालिकेच्या किमती वाढवल्या आहेत. फ्लॅगशिप सीरीज एक्स कन्सोल, ज्याची किंमत आधी ४९,९९० रुपये होती, आता ती ५२,९९० रुपयांना विकली जाते. S मालिकेची किंमत रु. ३४,९९० वरून ३६,९९० रुपये झाली आहे. Xbox Series X/Series S च्या किमती अनेक बाजारपेठांमध्ये बदलेल्या नाहीत. या कन्सोलच्या भारतातील किमती प्रत्यक्षात वाढल्या आहेत. चलनातील चढउतारांना प्रतिसाद म्हणून टेक कंपन्या विशिष्ट बाजारासाठी किंमतींमध्ये बदल करतात .भारतीय रुपयाने या वर्षी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सुमारे ७ टक्के मूल्य गमावले आहे.

सॅमसंग, मेटा किंवा सोनी सारख्या मोठ्या कंपन्यांकडे अशी काही संसाधने आहेत, जी किमती स्थिर ठेवू शकतात. उदाहरणार्थ, प्लेस्टेशन ५ सोनीचे सर्वात विकले जाणारे उत्पादन आहे याची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने हे आता विकणे कठीण झाले आहे. सोनी सारख्या कंपन्या उत्पादन खर्च आणि सप्लाय चेनच खर्च वाढवत असल्याने अत्याधुनिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये चिप्स सारख्या प्रमुख घटकांचा स्रोत मिळणे कठीण होत आहे. मेमरी चिपच्या किमती गेल्या महिन्यापासून घसरत आहेत. चीनमध्ये मालवाहतूक शुल्कात झालेली वाढ, कोविड-१९ चा उद्रेक आणि टाळेबंदी यांचाही परिणाम होत आहे.

विश्लेषण : ट्विटरनं भारत सरकारच्या एजंटला युजर्सची सर्व माहिती पुरवली? नेमकं घडतंय काय? आपली माहिती खरंच सुरक्षित आहे का?

आयफोन १४ किंमत वाढणार?

७ सप्टेंबरला नवीन आयफोन लाँच होणार आहे. त्याची किंमत किती असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विश्लेषक आणि ट्रेड इनसाइडर्स आधीच ‘आयफोन १४’ च्या किंमतीत $१०० वाढ होईल अपेक्षा वर्तवत आहेत. ॲपल कंपनी आयफोनची किंमत जशी आहे तशीच ठेवू शकते. परंतु क्युपर्टिनोने आपल्या ग्राहकांना वाढीव किंमत दिली तरीही, या निर्णयाचा विक्रीवर परिणाम होणार नाही. संयम चौरसिया हे कॅनालिसचे तंत्रज्ञान बाजार विश्लेषक आहेत. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना तेअसं म्हणाले की, ‘आयफोनचा ग्राहकवर्ग अतिशय संपन्न आहे, आणि महागाई किंवा इतर कोणत्याही जागतिक ट्रेंडचा खरेदीवर परिणाम होणार नाही’. तसेच ते पुढे म्हणाले ‘अ‍ॅपलने आयफोनच्या किमती वाढवल्या तरी लक्ष्यित ग्राहक नेहमी आयफोन खरेदी करतील आणि त्यामुळेच ॲपल कंपनीच्या मार्केट शेअरवर कोणताही परिणाम होणार नाही.’