नेटफ्लिक्सवर चित्रपट-वेब मालिका पाहणे आता अधिक परवडणारं झालं आहे. नेटफ्लिक्सने मासिक सदस्यता दर ६० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. भारतात आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी प्लानचे दर कमी केले आहेत. २०१६ पासून नेटफ्लिक्स भारतात सेवा देत असून पहिल्यांदाच आपल्या दरात कपात केली आहे. भारतातील ओटीटीमधील तीव्र स्पर्धा पाहता हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. नेटफ्लिक्सच्या दरांमुळे अनेक जण त्याकडे पाठ फिरवत होते. नेटफ्लिक्सची डिस्ने+ हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी एंटरटेनमेंटचे ZEE5 आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कचे SonyLIV यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा आहे. आता सर्वात स्वस्त प्लान १४९ रुपयांत उपलब्ध आहे. यापूर्वी या प्लानची किंमत १९९ रुपये इतकी होती.

एंट्री-लेव्हल बेसिक प्लॅनमध्ये ग्राहकांना वेब सीरिज आणि चित्रपट स्टँडर्ड डेफिनिशन (SD) मध्ये एकाच वेळी एकाच मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहता येतात. हा प्लान ४९९ प्रति महिना होता. तो आता १९९ रुपये करण्यात आला आहे. तर टू शेअरिंक स्क्रिन असलेला हाय डेफिनेशन प्लान ६४९ रुपयांवरून ४९९ रुपये करण्यात आला आहे. . तर अल्ट्रा हाय डेफिनेशन चार स्क्रिन शेअरिंग प्लान ७९९ रुपयांवरून ६४९ रुपये करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सची मोबाइल प्लान भारतात जुलै २०१९ पासून १९९ रुपये प्रति महिना होता. आता हा प्लान १४९ रुपये प्रति महिना उपलब्ध असेल. नवीन किंमत युजर्सच्या पुढील बिलिंग सायकलपासून लागू होईल.

iranian rapper toomaj salehi news in marathi
विश्लेषण: इराणी रॅपर तुमाज सालेहीला फाशीची शिक्षा का झाली? त्याचा नेमका गुन्हा काय?
Despite being in the grand alliance Bachu kadu in Amravati against BJP Navneet Rana
महायुतीत असूनही अमरावतीत बच्चू कडू भाजपच्या नवनीत राणांच्या विरोधात… ते सतत वादग्रस्‍त का ठरतात?
With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
supreme court on NOTA (1)
NOTAला सर्वाधिक मतं मिळाली तर कोण विजयी होतं? का पुन्हा निवडणूक होते? जाणून घ्या नकाराधिकाराचा अर्थ
फक्त मोबाईलबेसिक प्लानस्टँडर्ड प्लानप्रिमिअम प्लान
मासिक प्लान (जुन्या किंमती)१४९ (१९९)१९९ (४९९)४९९ (६४९)६४९ (७९९)
रिझॉल्यूशन४८० पी ४८० पी १०८० पी
4K+एडीआर
डिव्हाइसफोन, टॅबलेटफोन, टॅबलेट, कम्प्यूटर, टीव्ही फोन, टॅबलेट, कम्प्यूटर, टीव्ही फोन, टॅबलेट, कम्प्यूटर, टीव्ही
एकाच वेळी किती डिव्हाइसवर पाहू शकता

अ‍ॅमेझॉन प्राइम

  • वार्षिक पॅकेज ५०० रुपयांनी वाढवलं असून आता त्याची किंमत १४९९ रुपये इतकी आहे. यापूर्वी हे पॅकेज ९९९ रुपयांना मिळत होतं
  • मासिक पॅकेज १२९ रुपयांवरून १७९ रुपये करण्यात आलं आहे.
  • त्रैमासिक पॅकेज ३२९ रुपयांवरून ४५९ रुपये करण्यात आलं आहे.

डिस्ने+हॉटस्टार

  • मोबाईल फोनसाठी सर्वात स्वस्त म्हणजे ४९९ रुपयांचा प्लान आहे. यात एचडी क्वालिटी आहे.
  • दोन डिव्हाइससाठी ८९९ रुपयांचा प्लान आहे. यात दोन डिव्हाइस टॅबलेट, टीव्ही किंवा मोबाईल असू शकतो
  • चार डिव्हाइसाठी १४९९ रुपयांचा प्लान आहे. एकदा वापरकर्त्यांनी संख्या ४ पेक्षा जास्त झाली तर मागील लॉगइन पैकी एक आपोआप लॉगआउट होते.