scorecardresearch

Premium

लोकसत्ता विश्लेषण : पत्नीचा पती आणि सासरच्या लोकांच्या मालमत्तेवर काही अधिकार आहे का?; जाणून घ्या…

स्त्रीला तिच्या पतीच्या मालमत्तेवर हक्क आहे किंवा नाही याबाबत भारतीय कायदा अगदी स्पष्ट आहे.

wife have any right over the property of the husband and family

भारतात कायद्याबाबत अनेक गैरसमज आहेत. त्या गैरसमजांमध्ये स्त्रीला तिच्या पतीच्या मालमत्तेत किंवा पतीच्या पालकांच्या मालमत्तेवर हक्क असल्याच्याही समावेश आहे. मात्र भारताचा कायदा या बाबतीत अगदी स्पष्ट आहे.

कायदा काय आहे?

Marco Troper death
यूट्यूबच्या माजी सीईओंच्या मुलाचा वसतीगृहात आढळला मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट
Health Special
Health Special : पॉझिटिव्ह पालकत्व म्हणजे काय?
loksatta analysis allegation of tribal reservation hit due to amendment in bindu namavali rule
विश्लेषण: आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागल्याचा आरोप का होतोय?
Samorchya bakavarun economics Budget NDA Government Budget discussions
समोरच्या बाकावरून: मनोरंजन करणारे अर्थमंत्र्यांचे दावे..

मालमत्तेच्या उत्तराधिकाराच्या बाबतीत, भारतीय उत्तराधिकार कायदा, हिंदू उत्तराधिकार कायदा आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्यामध्ये उत्तराधिकाराचे नियम लागू आहेत. कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता दोन प्रकारची असते. पहिला प्रकार म्हणजे त्याने स्वतः मिळवलेली मालमत्ता आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याला वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता.

लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, ज्या स्त्रीने विशिष्ट मालमत्ता मिळविलेल्या व्यक्तीशी विवाह केला आहे, तिला त्या व्यक्तीच्या मालमत्तेत हक्क आहे की नाही हे प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. हे स्पष्ट आहे की जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वतः कोणतीही मालमत्ता घेते तेव्हा त्या व्यक्तीचा त्या मालमत्तेवर पूर्ण अधिकार असतो. तो मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकतो मग त्याची मालमत्ता स्थावर असो वा जंगम. मग ते सोने-चांदी किंवा जमीन किंवा घर असो.

कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर त्या व्यक्तीचा अधिकार आहे आणि इतर कोणीही त्याच्या अधिकारात घुसखोरी करू शकत नाही. मालमत्ता स्वत: अधिग्रहित केली असल्यास, तरच त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर त्याचाच अधिकार असेल. तो मालमत्ता विकू शकतो, दान करु शकतो किंवा मृत्यूपत्रातही जोडू शकतो.

नवरा जिवंत असताना अधिकार नाही

विवाहित स्त्रीला तिचा पती जिवंत असेपर्यंत तिच्या पतीने मिळवलेल्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो. पतीच्या हयातीत पत्नीला संपत्तीवर कोणताही अधिकार नाही. तिच्या पतीच्या मृत्यूनंतरही, तिच्या पतीने संपत्ती दुसऱ्या व्यक्तीला मृत्युपत्रात दिली, तर त्या मृत्युपत्राच्या वारसाला मालमत्तेत हक्क असेल आणि पत्नीला मालमत्तेत कोणताही अधिकार नसेल.

लग्नाच्या वेळी अनेक स्त्रियांचा असा समज होतो की पुरुषाशी लग्न केल्यानंतर त्या महिलेने मिळवलेली संपत्तीही त्या महिलेचा हक्क बनली आहे. पण ही योग्य गोष्ट नाही. त्या महिलेला मालमत्तेत हक्क तेव्हाच मिळेल जेव्हा ती सह-मालक म्हणून मालमत्तेत जोडली जाईल.

उदाहरणार्थ, जर एखादे शेत एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असेल आणि एखाद्या महिलेने त्या व्यक्तीशी लग्न केले असेल, तर त्या व्यक्तीच्या नावावर शेताची मालक म्हणून पत्नीचे नाव देखील जोडायचे आहे. असे नाव देणगी पत्राद्वारे जोडले जाऊ शकते म्हणजे पती म्हणू शकतो की त्याने आपल्या पत्नीच्या नावे अर्धी संपत्ती केली आहे. नंतर त्याच्या पत्नीला त्या मालमत्तेत सह-मालकी मिळते पण देणगीशिवाय स्त्रीला कोणतेही अधिकार राहणार नाहीत.

स्त्रीला तिच्या पतीकडून फक्त पोटगीची रक्कम मिळू शकते. घटस्फोटाच्या वेळी, पत्नीला पोटगीची मिळू शकते पण ती मालमत्तेवर कोणताही दावा करू शकत नाही.

सासू सासऱ्यांच्या मालमत्तेवर हक्क

त्याचप्रमाणे विवाहित महिलेला सासूच्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर अधिकार नाही. जोपर्यंत सासू सारसे जिवंत आहे तोपर्यंत स्त्री कोणताही दावा करू शकत नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतरही स्त्री कोणताही दावा करू शकत नाही.

अशावेळी महिलेचा पती हा मालमत्तेचा वाटेकरी असतो, पण जर पती आधीच मरण पावला असेल आणि नंतर सासरच्या मंडळींचा मृत्यू झाल्यास, पत्नीला वारसाहक्क मिळतो आणि नंतर मृत व्यक्तीच्या विधवेला तिच्यासह तिच्या सासरच्या मालमत्तेत हक्क प्राप्त होतो. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याने इतर कोणत्याही व्यक्तीला मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही मृत्युपत्र केले नसेल.

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा हक्क

जेव्हा एखाद्या महिलेचा पती मृत्युपत्राशिवाय स्वतःची संपत्ती सोडून मरण पावतो, अशा स्थितीत त्याच्या मालमत्तेवर तिची पत्नी तसेच त्याची आई आणि त्यासोबतच त्याच्या मुलांचाही हक्क असतो. येथे उत्तराधिकाराच्या बाबतीत हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ चे नियम आणि मुस्लिमांच्या बाबतीत लागू असलेले मुस्लिम वैयक्तिक कायदा लागू आहे.

मालमत्तेचा वारसा या कायद्यांच्या नियमांनुसार ठरवला जातो. उदाहरणार्थ, समजा एका हिंदू व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या घराची किंमत १००००० आहे. आई, भाऊ, बहीण आणि विधवा पत्नी यांना सोडून तो माणूस मरण पावतो. आई, भाऊ, बहीण आणि विधवा पत्नी यांना सोडून तो माणूस मरण पावतो. या प्रकरणात, त्या व्यक्तीने घेतलेल्या मालमत्तेत त्याच्या भावाचा आणि बहिणीचा कोणताही हक्क राहणार नाही, पण त्याची विधवा आणि त्याची आई या दोघांनाही मालमत्तेत समान हक्क असेल. हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हा उल्लेख आढळतो, जिथे मृत्यूपत्र न बनवता हिंदू व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसांना मालमत्तेचा वारसा देण्याच्या संदर्भात उल्लेख केला आहे.

या सर्व गोष्टींवरून, कोणत्याही विवाहित महिलेचा तिचा नवरा आणि सासरच्या लोकांच्या मालमत्तेवर ती जिवंत असताना कोणताही हक्क नाही. पण ती व्यक्ती मरण पावली आणि किंवा मृत्युपत्राशिवाय मरण पावली तेव्हा ती स्त्री तिच्या पतीच्या मालमत्तेत तिच्या वारसासाठी दावा करू शकते. पण पती जिवंत असताना तिला कोणताही अधिकार नाही. पत्नी केवळ स्वत:साठी पोटगीचा दावा करू शकते, त्याशिवाय ती तिच्या पतीच्या मालमत्तेवर कोणताही दावा करू शकत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained wife have any right over the property of the husband and family abn

First published on: 31-12-2021 at 17:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×