तीन दशकापूर्वी थायलंड मधून तस्करी झालेल्या शिवाच्या मूर्तीचे अखेर स्वदेशी आगमन झाले आहे. तीस वर्षांपूर्वी ९०० वर्षे जुन्या दोन मूर्तींची तस्करी थायलंड मधून न्ययॉर्कमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही मूर्ती मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांच्या वाटाघाटीनंतर या कलाकृती मंगळवारी बँकॉकमधील राष्ट्रीय संग्रहालयात परत आल्या आहेत. गोल्डन बॉय आणि नीलिंग लेडी अशी या मूर्तीची नामविशेषणे आहेत.

अधिक वाचा: विश्लेषण: लुटारू ब्रिटिश(?): राजघराण्यानेच घातला होता दरोडा !

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप

थायलंडचे सांस्कृतिक मंत्री सुदावान वांगसुफाकिजकोसोल तसेच थायलंडमधील अमेरिकेतील राजदूत रॉबर्ट एफ. गोडेक यांनी या मूर्तींच्या घरवापसीचे स्वागत केले आहे. थायलंडच्या समृद्ध वारशाचे प्रतीक या शब्दांत त्यांनी या मूर्तींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “हा पुरावा थायलंडची ऐतिहासिक समृद्धी दर्शवणारा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय सांस्कृतिक वारसादेखील आहे,” असे सुदावान X वर म्हणाले. सध्या जगभरात सर्व मोठ्या संग्रहालयांमध्ये अवैध मार्गाने आलेल्या पुरावस्तूंची तपासणी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आग्नेय आशियायी देश आपल्या भूमीतून वसाहतवादाच्या कालखंडात लुटल्या गेलेल्या वस्तू परत मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच प्रयत्नांची कथा गोल्डन बॉय आणि नीलिंग लेडी सांगतात.

१२९ सेंटीमीटर उंच असलेल्या शिवाच्या मूर्तीची ओळख गोल्डन बॉय अशी करण्यात येते. ब्रिटीश-थाई आर्ट डीलर डग्लस लॅचफोर्ड याच्यावर या मूर्तीच्या तस्करीचा आरोप होता. १९८८ ते २०२३ या कालखंडात ‘मेट’मध्ये ही मूर्ती प्रदर्शित करण्यात आली होती. ५० वर्षांपूर्वी कंबोडियाच्या सीमेजवळ प्रसात बान यांग या प्रांतात ही मूर्ती सापडली होती. १९७५ साली थायलंडमधून या मूर्तीची तस्करी करण्यात आली. याशिवाय दुसरी परत आलेली मूर्ती ही घुडगे टेकलेल्या स्त्रीची मूर्ती आहे. ४३ सेंटीमीटर उंचीच्या मूर्तीची ओळख नीलिंग लेडी अशी आहे. या मूर्तीच्या तस्करीचा संबंधही लॅचफोर्ड याच्याशी आहे. थायलंडच्या ललित कला विभागाचे महासंचालक फनोम्बूत्रा चंद्रचोटी यांनी बँकॉकमधील राष्ट्रीय संग्रहालयात मूर्तींच्या घरवापसी समारंभात सांगितले की, “या कलाकृती परत मिळणे हा आमच्यासाठीचा सन्मानच आहे, या मूर्ती आता कायमस्वरूपी आपल्या मायभूमीत परतल्या आहेत.

कलाकृती आता का परत केल्या गेल्या?

ईशान्य बुरिराम प्रांतातील एका महिलेने ‘गोल्डन बॉय’ शोधल्याचा दावा केला आहे. तिच्यासाठी ती मूर्ती भगवान शंकराची आहे. तर इतर काहींसाठी ही मूर्ती ख्मेर राजा जयवर्मन सहावा याची आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी रताळ्यांसाठी जमीन खोदत असताना तिला ही मूर्ती सापडली होती. तिने सांगितले की ही मूर्ती घेऊन ती स्थानिक पोलिस ठाण्यात गेली होती. तेव्हा तिथला अधिकारी तिला बँकॉकला घेऊन गेला आणि त्याने ती मूर्ती १.२ दशलक्ष भाटला (baht) विकली (सुमारे ३३ हजार डॉलर्स). १९८८ साली मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या संग्रहालयात ही मूर्ती प्रदर्शनात ठेवण्यात आली. त्या वेळी या संग्रहालयाने या मूर्तीचे वर्णन आग्नेय आशियाई शिल्पकलेची महत्त्वाची भेट असे केले होते.

डिसेंबरमध्ये, संग्रहालयाने सांगितले होते की, ते थायलंडला गोल्डन बॉय आणि नीलिंग लेडी, तसेच कंबोडियाला १४ कलाकृती (बसलेल्या बोधिसत्व अवलोकितेश्वराचे धातूशिल्प आणि ७ व्या शतकातील दगडी बुद्धाचे शीर्ष) परत करू. या मूर्तींच्या तस्करीचा संबंध हा आर्ट डीलर डग्लस लॅचफोर्ड याच्याशी आहे. त्याच्यावर १९७० पासून जगभरातील ऑक्शन हाउसेस आणि वेगवेगळ्या संग्रहालयांमधून लुटलेल्या कंबोडियन पुरातन वस्तूंची तस्करी आणि विक्री केल्याचा आरोप २०१९ साली ठेवण्यात आला होता. २०२० साली त्याचे निधन झाले. तोपर्यंत त्याने आपला तस्करीतील सहभाग नाकारला होता. पुरातन वस्तूंच्या तस्करी संदर्भात संग्रहालयाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारच्या नव्या माहितीचे आम्ही स्वागत करतो. त्या संदर्भात आम्ही गांभीर्याने विचार करतो. त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वीही आम्ही भारत आणि नेपाळमधल्या पुरावस्तूंबाबत समजल्यावर त्या वस्तू परत केल्या होत्या. थाई पुरातत्वशास्त्रज्ञ थानॉन्गसाक हानवाँग यांनी सांगितले की, मेटकडून या मूर्ती परत मिळविणे हे साधे काम नव्हते. त्यासाठी त्यांनी गेली तीन वर्षे सततचा पाठपुरवठा केला. थाई सरकारने जगभरात विखुरलेल्या सुमारे ३० कलाकृती परत करण्याची औपचारिकपणे विनंती केली आहे आणि त्यांचे दूतावास आणखी १० वस्तू परत करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत, थानॉन्गसाक पुढे म्हणाले, “काही संग्रहालये याची माहिती देण्यास नाखूश आहेत.”

अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

इतर संग्रहालये काय करत आहेत?

अलीकडच्या वर्षांत पाश्चात्य संग्रहालयांमध्ये (अमेरिकेपासून ते युनायटेड किंग्डमपर्यंत, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील अनेक देशदेखील) जगभरातील वादग्रस्त प्रदेशांमधून कथितरित्या लुटलेल्या कलाकृती परत करण्याचा कल वाढला आहे. १९७० च्या युनेस्कोच्या अधिवेशनात बेकायदेशीरपणे निर्यात केलेल्या सांस्कृतिक वस्तू परत आणण्यासाठी कायदेशीर आधार दिलेला आहे. असे असले तरी , हा नियम १९७० पूर्वी झालेल्या घटनांसाठी उपयुक्त नाही. तसेच वसाहतवादी कालखंडात लुटल्या गेलेल्या वस्तूंचे संरक्षण करण्यात अयशस्वी ठरला आहे, हा मुद्दा युनेस्कोने देखील कबूल केला आहे.

संग्रहालयांच्या संग्रही असलेल्या वस्तूंमुळे देशादेशांमधील संबंध तणावाचे झाले आहेत. संबंधित देश आपल्या संस्कृतीची ओळख असलेल्या कलाकृती किंवा इतर पुरावस्तू परत करण्याची मागणी करत आहेत. ब्रिटीश म्युझियमला जगातील सर्वात मोठा चोरीचा माल ठेवणारे म्हणून संबोधले जाते, त्यांनी पुरातन वस्तू चोरून नेल्याचा त्यांच्यावर अनेक वर्षांपासून आरोप आहे आणि काही कलाकृतींवरील प्रश्नांबाबत त्यांनी गुप्तता बाळगली आहे. एप्रिलमध्ये, संग्रहालयाने आधुनिक घानाच्या प्रदेशातून १५० वर्षांपूर्वी लुटलेल्या डझनभर कलाकृती परत केल्या.

नेदरलँड्स, फ्रान्स आणि जर्मनीसह संपूर्ण युरोपमधील संग्रहालये आग्नेय आशियातून चोरीला गेलेल्या कलाकृती परत पाठवत आहेत. निरीक्षकांचे म्हणणे आहे की, कलाकृती परत करणे हा युरोपचा वसाहत कालखंडातील आपली मलिन प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सने लुटलेल्या सांस्कृतिक वारशाची प्रतीके परत करण्यासाठी “शक्य ते सर्व काही करू” असे म्हटले आहे. आशिया ते आफ्रिकेपर्यंत – कंबोडियाला ख्मेर कलाकृती परत करण्याचे वचन त्यांनी जानेवारीत दिले होते. पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे, कारण संग्रहालये आणि अधिकारी कलाकृतींच्या स्त्रोतांची पडताळणी करण्याच्या कामी काळ- काम- वेगाच्या गणितात मागे पडत आहेत. (अहवाल असे सांगतो की, एकट्या मेट्रेपोलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये १,००० हून अधिक वस्तू आहेत ज्या लुटन आणलेल्या किंवा तस्करीच्या मार्गाने आलेल्या असण्याची शक्यता अधिक आहे.)