AI Overviews to AI Mode: गेल्या महिन्यात भारतात एआय ओव्हरव्ह्यू फीचरची घोषणा करण्यात आली. यावेळी गूगलने सांगितले होते की, दर महिन्याला १.५ अब्जांहून अधिक युजर्स या फीचरचा वापर करत आहेत. गूगल जसे एआय ओव्हरव्ह्यूवरून एआय मोडकडे वळत आहे, तिथे असा प्रश्न निर्माण होतो की यामुळे लोकांच्या इंटरनेट ब्राउझिंगच्या पद्धतीमध्येही बदल होईल की नाही. कारण या गूगलने एआय मोडने पारंपरिक पद्धतीच्या सर्च परिणामांना पूर्णपणे बदलण्याचा उद्देश समोर ठेवला आहे आणि या परिणामांमध्ये बदल करत एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक छोटा लेख तयार करणारा चॅटबॉट वापरला जातो.

गूगलचं म्हणणं आहे की असं होणं शक्य नाही. मात्र, गूगलचाच एआय बॉट जेमिनाय या मताशी असमहत आहे. जेमिनाय सांगते की, एआय ओव्हरव्ह्यू एक अशी सुविधा आहे, जी अनेक गूगल सर्च पेजेसवर एआयनिर्मित सारांश उत्तर दाखवते. ही वेबसाइट ट्राफिकला प्रामुख्याने ऑर्गेनिक लिस्टिंगला जास्त नुकसान पोहोचवत आहे याचे महत्त्वाचे पुरावे आहेत.

प्यू रिसर्च सेंटरचा अभ्यास

या वर्षाच्या सुरुवातीला ९०० अमेरिकन नागरिकांनी त्यांची वेब ब्राउजिंग माहिती प्यू रिसर्च सेंटरसह शेअर करण्यास समहमती दिली. यातील सुमारे दहापैकी सहा प्रतिसादकर्त्यांनी मार्च २०२५ मध्ये किमान एक गूगल सर्च केला, ज्यामध्ये एआय-जनरेटेड सारांश होता. हे आणखी महत्त्वाचे ठरते कारण गूगलने अलीकडेच अमेरिकन बाजारात एआय मोड ही नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे पारंपरिक सर्च परिणाम पूर्णपणे मागे टाकले जातात. हळूहळू ओव्हरव्ह्यूकडून पूर्णपणे एआय मोडकडे जाण्याचा गूगलचा मानस आहे.

प्यू अभ्यासाचे निष्कर्ष काय आहेत?

  • एआय सारांश असलेल्या सर्च पेजेसवर युजर्सने परिणामांच्या लिंकवर किंवा एखाद्या वेबसाइटवर क्लिक करण्याची शक्यता त्या पेजेसच्या तुलनेत कमी होती, ज्यामध्ये एआय सारांश नव्हता.
  • ज्या युजर्सना एआय सारांश मिळाला, त्यांनी त्यांच्या सर्चच्या फक्त आठ टक्के व्हिजिट्समध्ये पारंपरिक सर्च लिंकवर क्लिक केले, तर ज्यांना सारांश मिळाला नाही त्यांनी १५ टक्के व्हिजिट्समध्ये क्लिक केले होते.
  • एआय सारांशात दिलेल्या स्रोतांवरदेखील फारच कमी क्लिक झाले, म्हणजे अगदी १ टक्का.
  • एआय सारांश असलेल्या पानांवर युजर्स ब्राउजिंग सत्र पूर्णपणे संपवण्याची शक्यता जास्त होती, तर पारंपरिक सर्च निकाल असलेल्या पानांवर ही शक्यता फक्त १६ टक्के होती.
  • बहुतांश सर्चमध्ये युजर्सने कुठेही क्लिक केलं नाही किंवा गूगलवरच पुढे सर्चही केलं नाही. सुमारे दोन-तृतीयांश सर्च असे झिरो-क्लिक सर्च होते.
  • एआय सारांश आणि पारंपरिक सर्च निकालांमध्ये सर्वाधिक वापरलेले स्रोत म्हणजे विकिपीडिया, यूट्यूब आणि रेडिट होते. दोन्हीत मिळून १५ ते १७ टक्के लिंक होत्या.
  • गेल्यावर्षी गूगलने रेडिटसोबत ६० दशलक्ष डॉलर्स किमतीचा एक कंटेंट लायसन्सिंग करार केला होता, त्यामुळे गूगलला रेडिटच्या डेटाचा रिअल टाइम अॅक्सेस मिळतो.

महत्त्वाचे मुद्दे:

अभ्यासातील एआय सारांश ६७ शब्दांचा होता. सर्वात लहान सारांश ७ शब्दांचा होता आणि सर्वात मोठा ३६९ शब्दांचा होता. यामध्ये काय, कोण, कधी, का अशा प्रश्नवाचक शब्दांनी सुरुवात होते. १० किंवा अधिक शब्द असलेल्या सर्च प्रश्नांमध्ये ५३ टक्के इतका एआय सारांश दिसून आला. मात्र, १ ते २ शब्दांच्या प्रश्नांमध्ये फक्त ८ टक्के. क्रियापद आणि नाम असलेल्या पूर्ण वाक्यांपासून बनलेल्या प्रश्नांपैकी ३६ टक्क्यांमध्ये एआय सारांश दिसून आला.

एआय ओव्हरव्ह्यूज वेबसाइट ट्राफिकला नुकसान का पोहोचवते?

अनेक अभ्यासांनुसार, गूगलचे एआय ओव्हरव्ह्यूज वेबसाइट ट्राफिकला नुकसान पोहोचवतात यामागे अनेक कारणं आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • एआय ओव्हरव्ह्यूचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्च पेजवरच त्वरित आणि सविस्तर उत्तर देणं. त्यामुळे युजर्सना इतर वेबसाइटवर क्लिक करण्याची गरज वाटत नाही, याला झिरो-क्लिक सर्च म्हणतात.
  • आय ओव्हरव्ह्यू सर्च परिणामांच्या अगदी वरती दिसतात, त्यामुळे पारंपरिक सर्च निकाल मागे ढकलले जातात.
  • हे ओव्हरव्हयू वेगवेगळ्या वेबसाइट्सवरील माहिती एकत्र करून संक्षिप्त स्वरूपात देतात.
  • त्यात स्रोत दिलेले असले तरी मुख्य मुद्दे आधीच समोर दिले जातात, त्यामुळे युजर्सना त्या स्रोतावर जाण्याची गरजच राहत नाही.
  • फॅशन, ट्रॅव्हल, दीय, कुकिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये ट्राफिकमध्ये मोठी घसरण झाली आहे.
  • जेव्हा प्रश्न माहितीपूर्ण आणि ब्रँड नसलेले असतात, तेव्हा एआय ओव्हरव्ह्यू अधिक सक्रिय होतात आणि अशा परिस्थितीत सीटीआर अर्थात क्लिक थ्रू रेट सर्वाधिक कमी होतो.
  • गूगलचा एआय मोड हाच ट्रेंड आणखी बळकट करू शकतो.