भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) २०२५ मध्ये होऊ घातलेल्या गगनयान मोहिमेत मानवसदृश्य महिला रोबो- व्योमित्रा (अर्थ: अंतरिक्ष मित्र) सहभागी असेल. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये इस्रोच्या इनर्शिअल सिस्टिम युनिटने तयार केलेल्या व्योमित्राच्या कवटीच्या रचनेला नुकतीच अंतिम मंजूरी देण्यात आली.

ह्युमनॉइड्स म्हणजे काय?

ह्युमॅनॉइड्स (किंवा अर्ध-ह्युमॅनॉइड्स) ही रोबोटिक सिस्टीमस आहेत, जी माणसांसारखी दिसतात. व्योमित्र या सिस्टिमला मानवी हलणारे हात, धड, चेहरा आणि मान आहे. ह्युमनॉईडस् अवकाशात स्वतंत्रपणे काम करतात. सर्वसाधारणपणे, रोबोटिक सिस्टीमचा वापर अंतराळवीरांना अंतराळात परत परत करावी लागणारी आणि/ किंवा धोकादायक कार्ये करण्यात मदत करण्यासाठी केला जातो, जसे की सौर पॅनेल स्वच्छ करणे किंवा अंतराळ यानाच्या बाहेर असलेल्या सदोष उपकरणांची दुरुस्ती आदी. ही सिस्टीम अंतराळवीरांचे संरक्षण करते आणि त्यांना वैज्ञानिक मोहिमेवर काम करण्यास अनुमती देते.

अधिक वाचा: ३५७ वर्षे झाली, छत्रपती शिवरायांचा किल्ला मजबूत; पण पुतळा मात्र कोसळला…

इस्रो पुढच्या वर्षी अंतराळात ह्युमनॉइड का पाठवणार?

पुढील वर्षाचे मिशन प्रामुख्याने व्योमित्राच्या तंत्रज्ञानाची पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे आहे. या मिशनमध्ये ह्युमनॉइड त्याच्या रोबोटिक हातांचा वापर क्रू कन्सोलवर ऑपरेशन्स करण्यासाठी, क्रू मॉड्युलमधील विविध सिस्टम्सचे दृश्यमानपणे निरीक्षण करण्यासाठी आणि पृथ्वीवरील मिशन कंट्रोल टीमशी संवाद साधण्यासाठी कसा करतो हे पाहण्यात येईल. २०२५ च्या उत्तरार्धात भारताच्या नियोजित पहिल्या क्रू मिशनच्या अगोदर, अंतराळ प्रवासाचा मानवांवर होणारा संभाव्य परिणाम मोजण्यासाठी ISRO रोबोच्या तंत्रज्ञानाच्या कामगिरीचे मूल्यमापन करेल.

इस्रोने व्योमित्रासाठी मानवी कवटीची रचना कशी केली?

नुकत्याच डिझाईन केलेल्या व्योमित्रच्या कवटीत रोबोचे प्रमुख घटक असतील. हे डिझाईन ॲल्युमिनियम मिश्र धातू (AlSi10Mg) वापरून तयार करण्यात आले आहेत. उपग्रह प्रक्षेपणा दरम्यानच्या तीव्र कंपनाचा भार सहन करण्याची त्याची क्षमता आहे. या ॲल्युमिनियम मिश्र धातुची क्षमता २२० मेगापास्कल्स (१ MPa = १ दशलक्ष पास्कल) पेक्षा अधिक आहे. उच्च काठिण्य पातळी, तरीही वजनाला हलका आणि उष्णता प्रतिरोधक ही या मिश्र धातूची गुणवैशिष्ट्ये आहेच. त्याचा वापर सामान्यतः ऑटोमोटिव्ह इंजिन आणि अंतरिक्ष क्षेत्रातील अनेक गोष्टींसाठी त्याचा वापर केला जातो. ह्युमनॉइड कवटीचा आकार २००मीमि x २०० मीमि तर वजन फक्त ८०० ग्रॅम आहे.

अधिक वाचा: आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विशिष्ट धातूच्या वापरामुळेच त्याचे वजन लक्षणीयरीत्या कमी करण्यास मदत झाली आहे. शिवाय याची रचना तीन स्तरांमध्ये थ्रीडी प्रिंटिंग पद्धतीने करण्यात आली आहे. अंतराळामध्ये जाणाऱ्या बाबींचे वजन कमी असेल तर इंधनामध्ये खूप मोठी बचत होते. या ह्युमनॉइडच्या मेंदूच्या रचनेच अशाप्रकारे वजनाला हलका तरीही काठिण्यपातळी अधिक असलेला हा मिश्र धातू वापरल्याने त्याचा फायदाच या मोहिमेत अधिक होणार आहे.