रेश्मा राईकवार

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची पंचवार्षिक निवडणूक ही कायमच वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप यांचा धुरळा उडवल्याशिवाय पार पडत नाही. यंदा निवडणुकीआधीच गटबाजी, भांडणं, कोर्टाच्या वाऱ्या, हाही अध्यक्ष आणि तोही अध्यक्ष असे सारेच प्रयोग झाले. तरीही सद्य:स्थितीत निष्क्रिय असलेल्या नाटय़ परिषदेची सूत्रे आपल्या हातात घेऊन पुन्हा एकदा नाटय़व्यवसायाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या या व्यवस्थेचा भाग होण्यासाठी माजी अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांच्यासह अनेक मान्यवर नाटय़कलाकार-निर्माते यांनी एकत्र येऊन बनवलेले ‘रंगकर्मी समूह’ पॅनेल हे दोन गट आमनेसामने ठाकले आहेत. नाही नाही म्हणता शेवटच्या क्षणी निवडणुकीला उभ्या राहिलेल्या प्रसाद कांबळी यांनी ‘रंगकर्मी समूहा’ने उद्योगमंत्री उदय सामंत यांचा राजकीय आधार घेतल्याचा आरोप करत स्वत:च्या पॅनलसाठी मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

ubt shiv sena leader jyoti thackeray in yavatmal washim constituency tour
मविआ उमेदवाराच्या कार्यपद्धतीने पक्षांतर्गत नाराजी? -शिवसेना उबाठाच्या उपनेत्या…
Campaigning by BJP outside the polling station Congress complaint to the Commission
मतदान केंद्राबाहेरच भाजपकडून प्रचार; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Rashmi Barve, Supreme Court,
रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका, आता निवडणुकीत…

ही निवडणूक कसली? मतदार कोण?

नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. या निवडणुकीत प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचे नव्याने उभे राहिलेले ‘रंगकर्मी समूह’ पॅनल अशा दोन गटांमध्ये चुरस होती. या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी समूहा’चे दहा उमेदवार निवडून आले, तर प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे चारच उमेदवार नियामक मंडळावर निवडून आले. आता १६ मे रोजी परिषदेच्या अध्यक्षपदासह काही महत्त्वाच्या पदांसाठी निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांच्यात चुरस असून परिषदेचे राज्यभरातील ६० सदस्य यासाठी मतदान करणार आहेत.

राजकीय पाठिंब्याची गरज काय?

‘ही नाटय़कलेच्या विकासासाठी काम करणारी सांस्कृतिक संस्था असताना यात राजकारण आणण्याची गरजच काय?’ हाच प्रश्न सध्या राजकीय पाठबळ घेणाऱ्या या दोन्ही पॅनलमधील सदस्यांकडूनही विचारला जातो आहे. निवडणुकीला महत्त्व येण्यामागचे मुख्य कारण परिषदेच्या याआधीच्या कार्यकारिणीच्या कारभारात दडले आहे. गेली तीन वर्षे परिषदेच्या अध्यक्षपदी असलेल्या प्रसाद कांबळी आणि सहकाऱ्यांना करोनाकाळातील मदत वाटप आणि मनमानी कारभाराबद्दल नियामक मंडळातील काहींनी धारेवर धरले होते. काही सदस्यांनी परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला. एक वेगळी कार्यकारिणी आणि अध्यक्षही निवडून झाले. मग प्रसाद कांबळी यांना कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबावा लागला. अखेर शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर हे वादविवाद शांत झाले. मात्र प्रसाद कांबळी निवडणूक लढवणार नाहीत या अटीवर आम्ही तेव्हा शांत राहिलो, असे असंतुष्टांचे म्हणणे आहे.

नाटय़संकुलाचा कळीचा मुद्दा..

करोनाकाळात ठप्प झालेला नाटय़व्यवसाय आणि त्यानंतर परिषदेतील कारभारावरून उठलेल्या वादंगामुळे नाटय़ परिषदेचे कामकाज बंदच असल्यागत आहे. शतकमहोत्सवी नाटय़ संमेलन गेली तीन वर्षे रखडले आहे. करोनानंतर नाटय़गृहांच्या भाडेदरात काही सवलत मिळवणे यासह नाटय़निर्मात्यांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र कळीचा मुद्दा ठरतो आहे तो नाटय़ परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाटय़संकुलाचा. करोना आणि त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ नसल्याने हे नाटय़संकुल गेली तीन वर्षे बंद आहे. हे संकुल पाडून तिथे बहुमजली नाटय़संकुल उभे करण्याचा प्रसाद कांबळी यांचा मानस आहे. हे खर्चीकच नव्हे तर अनेक समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे. खासगी बिल्डरकडून नाटय़संकुल बांधून घेण्यातही अनेक खाचाखोचा आहेत.

फोडाफोडीचे राजकारण.. इथेही?

 या सगळय़ा समस्यांवर तोडगा हवा असेल तर नाटय़ परिषदेला राजकारणातून मुक्त करण्यासाठीच ‘रंगकर्मी समूह’ प्रयत्न करत असल्याचे या पॅनेलच्या सदस्यांचे म्हणणे आहे. मात्र प्रसाद कांबळींनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर नव्याने उभ्या राहणाऱ्या पॅनलला प्रशांत दामले यांच्यासारखा लोकप्रिय चेहरा आणि उदय सामंत यांच्यासारख्या नेत्यांचे पाठबळ महत्त्वाचे वाटते आहे. नियामक मंडळाच्या निवडणुकीत ‘रंगकर्मी समूह’ला यश मिळाले असले तरी प्रसाद कांबळी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आशीष शेलार यांचा पाठिंबा घेतल्याने पु्न्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते हे लक्षात घेऊनच आपल्या सदस्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची धडपड सुरू झाली आहे. आशीष शेलार नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत उतरले असल्याने भाजपच्या विचारसरणीशी बांधिलकी मानणारे सदस्य प्रसाद कांबळी यांना मतदान करतील की काय, याही शंकेला वाव आहे.