India government send buddha relics to Thailand भारताने थायलंडला पवित्र बौद्धधातू पाठवले आहेत, ते पहिल्यांदाच प्रदर्शनात ठेवले जाणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या एका खास विमानातून हे बौद्धधातू पाठवण्यात आले; त्यांना मलेशिया सरकारने ‘राज्य अतिथी’चा विशेष दर्जा दिला आहे. यापूर्वी हे बौद्धधातू मंगोलिया आणि श्रीलंकेला पाठवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या परराष्ट्र धोरणाला याचा कसा फायदा होईल? बौद्धधातू म्हणजे नक्की काय? भारतासाठी बौद्धधातू मलेशियात प्रदर्शित होणं किती महत्त्वाचं आहे? याबद्दल जाणून घेऊ.

बुद्धकालीन अवशेष

भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य अर्हत सारीपुत्र व अर्हत मौद्गलयान यांचे बौद्धधातू ‘कपिलवस्तू अवशेष’ म्हणूनही ओळखले जातात. हे बौद्धधातू अंदाजे इसनवी सनपूर्व चौथ्या/ पाचव्या शतकातील आहेत. सर्व बौद्धधातू त्या काळात बिहारच्या पिप्रहवा येथे सापडले. पिप्रहवाला कपिलवस्तूचे प्राचीन ठिकाण म्हणूनही संबोधले जाते. येथे सापडलेले बौद्धधातू १९७० च्या दशकात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (एसएसआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने शोधले होते. एएसआयने तत्कालीन पुरातत्व संचालक केएम श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली पिप्रहवा येथे उत्खनन केले. उत्खनन पथकाला मोठ्या पात्रामध्ये १२ पवित्र बौद्धधातू आणि लहान पात्रात १० पवित्र बौद्धधातू असलेले दगडी पात्र सापडले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, ‘सुकीति भतिनाम सा-भागिनीकनाम सा-पुता-दलनम् इयम् सलिला निधारे भद्धसा भगवते सकियानम्’ हा शिलालेख उत्खननात मिळालेल्या पात्रावर कोरलेला आहे. या शिलालेखात भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांच्या अवशेषांचा उल्लेख आहे.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
Cyber Crime
कंबोडियात पाच हजार भारतीयांवर सायबर अत्याचार, ५०० कोटींची फसवणूक, सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात!
चार बौद्धधातू मलेशियात २६ दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचा भाग असणार आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पिप्रहवा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात आहे. या २२ बौद्धधातूंपैकी २० बौद्धधातू दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात आणि दोन कोलकाता येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. भगवान गौतम बुद्धांचे वयाच्या ८० व्या वर्षी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण झाले. “कुशीनगरातील मल्लांनी गौतम बुद्धांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारातील त्यांचे पवित्र बौद्धधातू कुशीनगरचे ब्राह्मण पुजारी धोना यांनी गोळा केले. याचे विभाजन करून काही बौद्धधातू राजे आणि काही पुजार्‍यांना देण्यात आले. “मगधचे अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, कुशीनगरचे मल्ल, अलाकाप्पाचे बुलीस, पावाचे मल्ला, रामग्रामचे कोळिया आणि वेथदीपाचे ब्राम्हण यांच्यात हे बौद्धधातू वाटण्यात आले”, असे केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने म्हटले आहे.

आठ वेगवेगळ्या स्तूपांमध्ये पवित्र बौद्धधातूची स्मृती

बौद्धधातू ज्या ठिकाणी पाठवण्यात आले होते, त्या ठिकाणी नंतर स्तूप बांधण्यात आले. शारीरिक -स्तूप हे तथागत गौतम बुद्धांच्या अवशेषांवर अर्थात बौद्धधातूंवर उभारलेले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे की, हा सर्वात जुना बौद्ध विहार आहे. सम्राट अशोकाने (सुमारे २७२-२३२ इसवी पूर्व) बौद्ध धर्माचा कट्टर अनुयायी असल्याने बौद्ध धर्म लोकप्रिय करण्यासाठी आणि धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक स्तूप बांधले.

हे बौद्धधातू थायलंडचे राजा राम पंचम यांना दगडी पात्रामध्ये देण्यात आले. पुढे बौद्धधातू तीन भागांमध्ये विभागले गेले. ते थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका यांना भेट म्हणून देण्यात आले. थायलंडमध्ये हे पवित्र बौद्धधातू बँकॉकच्या सुवानबनफोटच्या शिखरावर असलेल्या चेडीमध्ये स्थापित केले गेले. दरवर्षी लोई क्राथॉन्ग या उत्सवादरम्यान, सात दिवस आणि सात रात्र बुद्धधातूची पूजा करण्याची परंपरा आहे.

थायलंड येथे बौद्धधातूंसाठी विशेष पॅगोडा

यातील चार बौद्धधातू मलेशियात २६ दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचा भाग असणार आहेत. मलेशियाला नेताना अर्हत सारीपुत्र आणि अर्हत मौद्गलयान यांचे अवशेष सांचीहून दिल्लीला आणण्यात आले. बँकॉकच्या राष्ट्रीय संग्रहालयात हे बौद्धधातू सुरक्षितपणे ठेवले जाणार आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “थायलंड सरकारने पवित्र बौद्धधातूंना संरक्षित ठेवण्यासाठी बँकॉकमध्ये एक सुंदर पॅगोडा बांधला आहे. याच ठिकाणी हे बौद्धधातू प्रदर्शित केले जातील.” हे प्रदर्शन थायलंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे.

मोदी सरकारसाठी महत्त्वाचे

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, हे पाऊल मोदी सरकारच्या ‘लूक ईस्ट’ धोरणाचाच एक भाग आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, मोदी सरकारने यापूर्वी हे बौद्धधातू मोठ्या प्रमाणात बौद्ध लोकसंख्या असलेला दुसरा देश असलेल्या मंगोलियाला पाठवले होते. भारताची ‘सॉफ्टपॉवर’ (सांस्कृतिक देवाणघेवाणीतून वाढणारा प्रभाव) विकसित करण्यावर मोदी सरकार भर देत आहे, त्याचेच हे एक उदाहरण आहे. केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी मंगोलिया येथे बौद्धधातू पाठवत असताना म्हटले होते की, सामाईक भौतिक सीमा नसतानाही हा देश भारताचा तिसरा शेजारी देश आहे आणि मंगोलियाच्या लोकांसाठी ही विशेष भेट आहे. मंगोलिया आणि भारत एकमेकांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शेजारी म्हणून पाहतात.

२०२२ मध्ये बौद्धधातू मंगोलियन बुद्ध पौर्णिमेच्या उत्सवाचा भाग म्हणून ११ दिवसांच्या प्रदर्शनासाठी मंगोलियाला नेण्यात आले होते. किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील २५ सदस्यांचे शिष्टमंडळ बौद्धधातूंसह मंगोलियाला गेले. त्यावेळी त्यांनी सी-१७ ग्लोब मास्टर या विशेष विमानात प्रवास केला होता. बौद्धधातू नंतर गंडन मठाच्या बत्सागान मंदिरात प्रदर्शित करण्यात आले होते.

बौद्धधातू २०१२ मध्ये श्रीलंकेला पाठवण्यात आले होते. श्रीलंकेला हे बौद्धधातू अनेक ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. परंतु, नंतर या बौद्धधातूंना पुरातन वास्तू आणि कला खजिन्याच्या ‘एए श्रेणी’ अंतर्गत पुनर्वर्गीकृत केले गेले. यात असे नमूद करण्यात आले की, नाजूक असल्यामुळे ते भारताबाहेर नेऊ नयेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार मोदी सरकारच्या विशेष विनंतीनंतर हे बौद्धधातू मंगोलियाला पाठवण्यात आले होते.

हेही वाचा : Farmers Protest: आंदोलनात जीव गमावलेला २२ वर्षीय तरुण कोण होता? पोलिसांनी मृत्यूचा दावा का फेटाळला?

केंद्रीय सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन म्हणाले की, भारताचे थायलंडशी असलेले प्राचीन संबंध पाहता, हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल. “…भारत आणि थायलंड यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी हे पाउल महत्त्वाचे ठरेल. थायलंडमध्ये भारतीय संस्कृतीचे साम्य दिसून येते. थायलंडमधील बौद्ध लोक या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील”, असे मोहन यांनी सांगितले. यापूर्वीही बौद्धधातू विविध देशांमध्ये पाठवण्यात आले होते. २००७ मध्ये सिंगापूर, १९९५ मध्ये दक्षिण कोरिया आणि थायलंड, १९९४ मध्ये सिंगापूर, १९९३ मध्ये मंगोलिया आणि १९७६ मध्ये श्रीलंकेला पाठवण्यात आले होते.