देशांतर्गत भांडवली बाजारात एकीकडे मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू असताना, म्युच्युअल फंडातील शिस्तबद्ध गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक वाढते आहे. शिवाय बाजार पडझडीत समभाग संलग्न योजनांमधील म्हणजेच इक्विटी फंडातील गुंतवणूक वाढते आहे. यामागचे नेमके कारण काय आहे, कोणत्या फंडामध्ये सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित होत आहे, हे जाणून घेऊया

इक्विटी फंडामध्ये किती गुंतवणूक?

सेन्सेक्स-निफ्टीतील मोठ्या घसरणीचा महिना राहिलेला डिसेंबरमध्ये, गुंतवणूकदारांनी समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये मोठी गुंतवणूक सुरूच ठेवली असून, परिणामी डिसेंबर महिन्यांत ४१,१५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रवाह इक्विटी फंडांनी अनुभवला. भांडवली बाजाराचा कल प्रचंड नकारात्मक असूनही, इक्विटी फंडातील ओघ मासिक आधारावर १४ टक्क्यांनी वाढला आहे. समभागसंलग्न अर्थात इक्विटी योजनांनी डिसेंबरमध्ये ४१,१५६ कोटी रुपयांचा नक्त प्रवाह पाहिला, जो नोव्हेंबरमध्ये आलेल्या ३५,९४३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत १४.४ टक्क्यांनी वाढला आहे. याआधी ऑक्टोबर २०२४ मध्ये इक्विटी योजनांमध्ये ४१,८८७ कोटी रुपयांचा आजवरचा सर्वाधिक ओघ दिसून आला. उल्लेखनीय म्हणजे समभागसंलग्न फंडांमध्ये सकारात्मक प्रवाहाचा हा सलग ४६ वा महिना राहिला आहे.

Hexaware Technologies IPO news in marathi
टीसीएसनंतर ‘या’ आयटी कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात येतोय; जाणून घ्या किंमत
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
EPFO settles record over 5 crore claims in FY25
‘ईपीएफओ’कडून दोन लाख कोटी रुपयांचे दावे निकाली
Increase in foreign direct investment in insurance sector in the budget
कीमत जो तुम चाहो
Encouraging private sector investment
खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन
Companies urged to pay better salaries 53 percent of highly educated graduates protest
चांगले वेतन देण्याचे कंपन्यांना आर्जव; उच्चशिक्षित ५३ टक्के पदवीधरांची बोळवण
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड
Moody Analytics made a statement on fiscal and monetary policy print eco news
वित्तीय, पतधोरणात मोठ्या सुधारणेनंतरच ६.४ टक्के विकासवेग शक्य- मूडीज

हेही वाचा >>> हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?

कोणत्या फंडांकडे कल वाढतोय?

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता डिसेंबरअखेर ३०.५७ लाख कोटींवर पोहोचली. गेल्या काही महिन्यांपासून थीमॅटिक फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत, इक्विटी व्यवस्थापनामधील मालमत्ता २१.७९ लाख कोटी होती. वार्षिक आधारावर त्यात ४०.३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एका दशकापूर्वी, इक्विटी म्युच्युअल फंडातील मालमत्ता फक्त १.९ लाख कोटी रुपये होती. उल्लेखनीय म्हणजे, ऑगस्ट २०२३ मध्ये, इक्विटी योजनांमधील एकूण मालमत्तेने पहिल्यांदाच ३० लाख कोटींचा टप्पा ओलांडला. याचा अर्थ असा की, १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एकूण मालमत्ता दुप्पट झाली आहे. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये इक्विटी योजनांमधील मालमत्तेचा वाटा आता ४६ टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबर २०२४ च्या अखेरीस म्युच्युअल फंड घराण्यांकडील एकूण मालमत्ता ६६.९३ लाख कोटी रुपये आहे.

बाजारपेठेतील अस्थिर परिस्थिती असूनही, गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांची लोकप्रियता वाढते आहे. डिसेंबरमध्ये इक्विटी योजनांमध्ये निव्वळ गुंतवणूक १४ टक्क्यांनी वाढून ४१,१५६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

हेही वाचा >>> Saif Ali Khan Attack : सैफ अली खानची दरोडेखोराबरोबर झटापट कशी झाली? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

कोणत्या श्रेणीतील योजना लोकप्रिय?

११ इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणींमध्ये, मुख्यतः थीमॅटिक/सेक्टोरल फंडांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढते आहे. डिसेंबरमध्ये या योजनांमध्ये निव्वळ गुंतवणूक १५,३३१ कोटींवर पोहोचली, जी नोव्हेंबरमध्ये नोंदवलेल्या ७,६५८ कोटींपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. डिसेंबर २०२३ मध्ये या योजनांमध्ये गुंतवणूक ६,००० कोटी होती. थीमॅटिक फंडांमध्ये या जोरदार गुंतवणूकीमुळे डिसेंबरमध्ये त्याअंतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्ता ४.७२ लाख कोटींवर पोहोचली, जी नोव्हेंबरमध्ये ४.६१ लाख कोटी होती. डिसेंबर २०२३ मध्ये थीमॅटिक फंड एकूण मालमत्ता २.५८ लाख कोटी होती.

स्मॉल-मिडकॅप फंडांबाबत परिस्थिती काय?

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या (ॲम्फी) मते, या श्रेणीतील म्युच्युअल फंड योजनांमधील जोखमींबद्दल चिंता असूनही, डिसेंबरमध्ये गुंतवणूक विक्रमी उच्चांकावर पोहोचली, स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्येही गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात राहिले. डिसेंबर २०२४ मध्ये मिड-कॅप श्रेणीमध्ये ५,०९३ कोटी रुपयांचा निधी आला, तर स्मॉल-कॅप श्रेणीमध्ये ४,६६७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. सुरक्षित पर्याय म्हणून शिफारस केल्या जाणाऱ्या लार्ज-कॅप योजनांमध्ये डिसेंबरमध्ये २०१० कोटी रुपयांचा गुंतवणूक ओघ राहिला, नोव्हेंबरमध्ये त्यात २,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक झाली होती. ॲम्फीच्या आकडेवारीनुसार, लार्ज-कॅप आणि मिड-कॅप श्रेणीमध्ये ३,८११ कोटी रुपयांचा निधी आला.

तरीदेखील एकूण गंगाजळी का घटली?

रोखे संलग्न फंडातील निधी निर्गमनामुळे म्युच्युअल फंडातील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेवर परिणाम झाला आहे. परिणामी समभाग संलग्न फंडांमध्ये मोठा निधी ओघ असूनही, डिसेंबरमध्ये एकूण म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील मालमत्ता ६६.९३ लाख कोटींवर घसरली, जी एका महिन्यापूर्वी ६८.०८ लाख कोटी रुपये होती. ही घट प्रामुख्याने रोखे संलग्न योजनांमधून १.२७ लाख कोटी रुपयांच्या बहिर्गमनामुळे झाली. लिक्विड फंडामधून सर्वाधिक पैसे काढले गेले. मनी मार्केट आणि ओव्हरनाइट फंडामधून देखील मोठ्या प्रमाणात निधी बाहेर पडला.

मात्र २०२४ हे वर्ष म्युच्युअल फंड उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरले, कारण नोव्हेंबरमध्ये एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेने पहिल्यांदाच ६८ लाख कोटींचा टप्पा ओलांडला. वर्ष २०१९ ही मालमत्ता २६.५४ लाख कोटी रुपये होती. सध्याची वाढ केवळ पाच वर्षांत साध्य झाली होती.

 ‘एसआयपी’च्या माध्यमातून मासिक ओघ किती?

शिस्तशीर गुंतवणुकीचा लोकप्रिय मार्ग बनलेल्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’मधील मासिक योगदान नोव्हेंबरमधील २५,३२० कोटी रुपयांवरून, डिसेंबर २०२४ मध्ये २६,४५९ कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले. ‘एसआयपी’ खात्यांमध्येही निरंतर वाढ सुरू असून ती आता १३.६३ लाख कोटींहून अधिक झाली आहेत. विक्रमी मासिक योगदानासह गुंतवणूकदारांमध्ये शिस्तबद्ध गुंतवणुकीला वाढती पसंती मिळत असल्याचे यातून दर्शविले गेले आहे.

एसआयपीला प्राधान्य का?

भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहेत. अशा वेळी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे काहीही श्रेयस्कर ठरेल. कारण एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला थोडी थोडी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जात असल्याने बाजारातील घसरणीचा फायदा होऊन गुंतवणूकदाराला अधिक युनिट पदरात पाडून घेता येतात. याउलट एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर बाजार घसरल्यास गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच गुंतवणुकीचा शिस्तबद्ध एसआयपी  हा पर्याय अधिक फायदेशीर आहे.

ॲम्फीक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकट चालसानी यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमनाने अमेरिकेच्या व्यापार धोरणांत बदल होण्याची शक्यता आहे. परिणामी त्याचा जगभरातील भांडवली बाजारांवर परिणाम झाला असून व्यापारातील अनिश्चितता वाढण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारावर विश्वास कायम राखल्याचे आकडेवारी सुचविते.

Story img Loader