scorecardresearch

विश्लेषण: जास्त पाणी पिणे तुमच्यासाठी ठरू शकतं घातक? जाणून घ्या ओव्हर हायड्रेशनमुळे उद्भवणाऱ्या समस्या

हळू हळू उष्णतेच पारा वाढत आहे. यामुळे सहाजिकच आपण जास्त पाणी पीत आहोत. परंतु, पाण्याचं अतिसेवनही धोकादायक ठरू शकते.

Dehydration and Over Hydration
(फोटो: Pixabay)

Dehydration and Over Hydration: संपूर्ण भारतात उष्णतेच्या लाटा (Heatwaves) येत आहेत यामुळे, शरीराचे तापमान वाढत आहे. उष्णतेमुळे शरीर हायड्रेटेड ठेवणे अर्थात शरीरात मुबलक प्रमाणत पाणी असणं गरजचे आहे. पाणी नेहमीचं आवश्यक आहे, कारण मानवी शरीरात ७० टक्के पाणी असते. उन्हाळ्यात डिहायड्रेशन खूप लवकर होते, आणि अशावेळी सर्व प्रकारचे ज्यूस, पाणी, इलेक्ट्रोलाइट पेयं आणि इतर पेयांचे सेवन अवश्य केले जाते. ओव्हरहायड्रेशनमुळे भ्रम निर्माण होणे, चक्कर येणे, मळमळ होणे आणि पाण्याची विषबाधा या सारखी परिस्थिती उद्भवते. यामुळेच, डिहायड्रेशन तुमच्यासाठी वाईट असले तरी, ओव्हरहायड्रेशनही तितकेच वाईट असू शकते. ओव्हरहायड्रेशन आणि जास्त पाणी पिण्याचे धोके अधिक सखोलपणे समजून घ्या.

ओव्हर हायड्रेशन म्हणजे काय?

तुमचे मूत्रपिंड सुरक्षितपणे जेवढं पाणी (लघवी) शरीरातून काढून शकते त्या पेक्षा जास्त अर्थात शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पिता तेव्हा ओव्हरहायड्रेशन होते. यामुळे तुमच्या शरीरात सोडियम आणि इतर आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होते, ज्यामुळे हायपोनॅट्रेमिया आणि पाण्याची विषबाधा सारख्या परिस्थिती उद्भवतात. हायपोनाट्रेमिया म्हणजे जास्त पाण्यामुळे तुमच्या रक्तातील सोडियमची पातळी कमी होणे. सोडियम तुमच्या पेशींमधील आणि बाहेरील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते. जेव्हा ते कमी होते, तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागतात जसे की,

  • डोकेदुखी
  • भ्रम
  • मळमळ
  • अस्वस्थता
  • थकवा
  • स्नायू आवळले जाणे

यावरवर उपचार न केल्यास, अधिक गंभीर समस्या जसं की, अगदी कोमाची स्थितीही निर्माण होऊ शकते.

ओव्हर हायड्रेशन आणि वॉटर पॉइझनिंग कशामुळे होतं?

पाण्याची विषबाधाआणि हायपोनेट्रेमिया सामान्यपणे पाणी पिताना होत नाही. पिण्याच्या पाण्यापेक्षा जास्त पाणी पिण्यासारख्या प्रकरणांमुळे किंवा लष्करी प्रशिक्षणात जास्त प्रमाणात पाण्यामुळे विषबाधा सारखी स्थिती निर्माण होते. क्रीडा शास्त्रज्ञ श्यामल वल्लभ ‘द क्विंट हिंदी’ शी बोलताना सांगतात की, “ पाण्यातून विषबाधा होण्याची फारशी प्रकरणे दिसत नाहीत. हे डिहाइड्रेशनच्या प्रकरणांपेक्षा खूपच कमी आहे.” लष्करी प्रशिक्षणात सैनिकांमध्ये पाण्याची विषबाधा झाल्याचेअनेकदा दिसून येते. यूएस आर्मीच्या अभ्यासात असे आढळून आले की तीन प्रशिक्षणार्थी पाण्याची विषबाधा झाल्यामुळे मरण पावले, तर वर्षभरात पाण्याच्या इनटॉक्सिकेशन आणखी १७ सैनिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

ओव्हरहायड्रेशन काही इतर काही कारणे असू शकतात:

जोरात/ फोर्सफुल व्यायामादरम्यान ओव्हरहायड्रेशन

लष्करी प्रशिक्षणात पाण्याची विषबाधा, व्यायामादरम्यान अतिउष्णता किंवा अतिहायड्रेशनमुळे तुमच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. घामाच्या वेळी शरीरातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करणाऱ्या पेयांऐवजी फक्त पाणी प्यायल्याने पाण्याचा इनटॉक्सिकेशन होऊ शकते.

उष्णतेशी संबंधित ओव्हर-हायड्रेशन

जेव्हा तापमान वाढते तेव्हा आपले शरीर थंड राहण्यासाठी घाम येतो. जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा तुम्ही शरीरातील भरपूर पाणी देखील गमावता, ज्यामुळे तहान लागते. तहान लागल्यावर आपण पाणी पितो. पण जेव्हा उष्णतेचा पारा ४० अंश सेल्सिअस ओलांडतो तेव्हा सतत पाणी पिण्याची इच्छा होते. मग एका ठराविक वेलेनातर, तुम्ही घामाने इतके इलेक्ट्रोलाइट्स आणि पाणी गमावता आणि त्यावर जास्त पाणी प्यायल्याने तुमचे इलेक्ट्रोलाइट्स आणखी कमी होत आहेत. यामुळे डोकेदुखी, चिडचिड, भ्रम आणि काही प्रकरणांमध्ये पाण्याची विषबाधाही होऊ शकते.

किडनीचा आजार

तुम्हाला किडनीचा गंभीर आजार किंवा किडनीच्या इतर समस्या असल्यास, यामुळे तुमच्या शरीरात पाणी साचून राहू शकते. ईआर तज्ञ डॉ. अमित वर्मा म्हणतात, तुमची किडनी दर तासाला शरीरातून सुमारे अर्धा लिटर द्रव बाहेर काढू शकते. जेव्हा तुम्ही जास्त पाणी पिता, तेव्हा तुमचे मूत्रपिंड जास्त पाणी लवकर बाहेर काढू शकत नाहीत आणि त्यामुळे सोडियमचा साठा कमी होतो. जर तुम्ही किडनीच्या आजाराने त्रस्त असाल तर परिस्थिती आणखी बिकट होते. यामुळे स्नायुंचे आकुंचन, मळमळ, चक्कर येणे आणि उपचार न केल्यास, पाण्यातील विषबाधा होते.

MDMA सारख्या ऍम्फेटामाइन्सचा वापर

MDMA (ज्याला सर्वसामान्य भाषेत ई, एक्स्टेसी, कँडी म्हणतात) सारख्या शारीरिक हालचाल वाढवणाऱ्या ऍम्फेटामाइन्सच्या वापरामुळे थकवा, जास्त घाम येणे आणि जास्त तहान लागणे होऊ शकते. कधीकधी यामुळे अति-हायड्रेशन होते. अत्याधिक शारीरिक हालचाली आणि MDMA या दोन्हीमुळे तुमच्या शरीरात लघवीद्वारे बाहेर टाकले जाणारे पाणी वाढते, ज्यामुळे जलद इलेक्ट्रोलाइट पातळ होणे, पाण्याचे विषबाधा आणि मृत्यू देखील होऊ शकतो.

सायकोजेनिक पॉलीडिप्सिया

सायकोजेनिक पॉलीडिप्सिया हा एक मानसिक आजार आहे ज्यामुळे जास्त पाणी पिण्याची इच्छा होते. याला सामान्यतः याला शरीरातील पाण्याने होणारी विषबाधा असं देखील म्हणतात. या स्थितीत रुग्ण जास्त प्रमाणात पाणी पिण्यास सुरुवात करतो. रुग्ण पाण्याच्या विषबाधेचा बळी होईपर्यंत हे चालूच असते. जर रुग्णाला उपचार मिळाला नाही तर लवकरच हा रोग जीवघेणा ठरू शकतो किंवा रुग्णासाठी अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण करू शकतो. जबरदस्तीने जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने वर नमूद केलेल्या सर्व समस्या उद्भवू शकतात जसे की, मळमळ, भ्रम आणि चक्कर येणे.

अंतस्नायु द्रव वितरण

जर तुम्हाला रुग्णालयात दाखल केले असेल आणि तुम्हाला द्रव देण्यासाठी इंट्राव्हेनस ड्रिप लावली आहे तर, तुम्हाला जे फॉर्म्युलेशन दिले जाईल ते इलेक्ट्रोलाइट्स, द्रव आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे यांचे काळजीपूर्वक बनवलेले संतुलित संयोजन असेल. जर तुमच्याकडे द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सचे योग्य संयोजन नसेल, तर तुम्ही त्वरीत द्रवपदार्थाच्या नशेचा बळी होऊ शकता. द्रवपदार्थाच्या नशेच्या आहारी जाऊ शकता.

ओव्हर हायड्रेशन आणि पाण्याचे इनटॉक्सिकेशन कसं टाळायचं?

जर तुम्ही उष्ण तापमानामध्ये जास्त शारीरिक मेहनत करत असाल किंवा खूप वेळ उन्हात घालवत आहात तर, तुम्ही सतत पाणी पायायला हवं. पण तुम्ही नारळ पाणी, ताक, ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन, साखर आणि मीठ, लिंबू सरबत यांसारखी इलेक्ट्रोलाइट पेये पिऊ शकता आणि तुम्हाला कसे वाटतं याकडे लक्ष द्या. जर हे शक्य नसेल, तर साधे पाणी पिणे बंद करा आणि त्याऐवजी खारट मीठ टाकलेले पाणी प्या. तथापि, हे सर्व केवळ तात्पुरते उपाय आहेत आणि जर तुम्हाला शंका असेल की तुम्हाला पाण्याचा इनटॉक्सिकेशन किंवा पाणी विषबाधा आहे, तर तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे. डिहायड्रेशन आणि ओव्हरहायड्रेशन दोन्ही लोकांमध्ये समान लक्षणे दिसू शकतात. म्हणून वैद्यकीय तज्ञाचा सल्ला घेणे कधीही उत्तम पर्याय आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is drinking too much water bad for you know the problems caused by over hydration ttg