scorecardresearch

Premium

विश्लेषण: Gratuity मिळवण्याचे नियम आणि मोजण्याची पद्धत माहितीये का?

Gratuity संदर्भात काही महत्वाचे नियम आहेत, जे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे.

(प्रातिनिधीक छायाचित्र)
(प्रातिनिधीक छायाचित्र)

जो कोणी कोणत्याही कंपनीत दीर्घकाळ काम करतो तो ग्रॅच्युइटी मिळवण्यास पात्र ठरतो. Gratuity कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिली जाते. परंतु ही ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी तुम्हाला किमान ठराविक वेळेपर्यंत काम करावं लागेल, असा नियम आहे. याशिवाय तुम्हाला Gratuity मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी आणखी काही नियम पाळावे लागतील. या नियमांबद्दल तुम्हाला माहीत नसेल, तर ही बातमी वाचाच. आज आम्ही तुम्हाला ग्रॅच्युइटी संदर्भात सर्व नियम सांगणार आहोत.

खरं तर कोणत्याही कंपनीत ठराविक काळ काम केल्यास कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी मिळतो, त्याचप्रमाणे ग्रॅच्युइटीही दिली जाते. ग्रॅच्युइटी हे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारे बक्षीस आहे. जर कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर त्याला एका निश्चित फॉर्म्युलानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल. ग्रॅच्युइटीचा कायदा काय आहे आणि त्याची गणना कशी केली जाते, हे देखील आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

how to make makhana raita recipe
Recipe : पौष्टिक खा तंदुरुस्त राहा; ‘मखाणा रायते’ बनवण्याची सोपी रेसिपी पाहा….
benefits of eating foxtail millets
foxtail millet : मधुमेह ते कोलेस्ट्रॉल सर्वांवर गुणकारी ‘बाजरी’! पाहा डॉक्टरांनी सांगितलेले फायदे…
virtual autopsy technology in post mortem marathi news, post mortem marathi news, virtual autopsy technology marathi news
विश्लेषण : शवविच्छेदनाचे ‘व्हर्च्युअल ऑटोप्सी’ तंत्रज्ञान काय आहे?
serious security flaw
विश्लेषणः वैयक्तिक डेटाचे संरक्षण तुम्ही कशा पद्धतीनं कराल? जाणून घ्या

ग्रॅच्युइटी कधी मिळते?

ग्रॅच्युइटी हा तुमच्या पगाराचा छोटा भाग आहे जो कंपनीकडून तुमच्या पगारातून कापला जातो. नियमांनुसार एखाद्या कंपनीत किमान ५ वर्षे काम केल्यास कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळते. तुम्ही ५ वर्षांनी कंपनी सोडल्यास तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळते. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, १९७२ नुसार, ज्या कंपनीत दररोज किमान दहा कर्मचारी काम करतात त्या कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा लाभ मिळतो. ग्रॅच्युइटीच्या नियमांची पूर्तता केल्यानंतर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली किंवा सेवानिवृत्त झाल्यास किंवा कोणत्याही कारणाने नोकरी सोडल्यास त्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.

ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते?

ग्रॅच्युइटी मोजण्यासाठी एक विशेष सूत्र आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा शेवटचा पगार १५ ने गुणाकार करून आणि २६ ने भागून तुम्ही कंपनीत काम केलेल्या वर्षांच्या संख्येसोबत गुणाकार करावा लागेल. म्हणजेच, जर तुम्ही एखाद्या कंपनीत २० वर्षे काम केले असेल आणि तुमचा शेवटचा पगार ७५,००० रुपये असेल, तर तुम्हाला सुमारे ८.६५ लाख रुपये ग्रॅच्युइटी म्हणून मिळतील. ग्रॅच्युइटी मोजण्याच्या सूत्रामध्ये, प्रत्येक महिन्यातील फक्त २६ दिवस मोजले जातात, कारण महिन्यातील ४ दिवसांच्या सुट्ट्या गृहीत धरल्या जातात. याशिवाय एका वर्षात १५ दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटी मोजली जाते.

ग्रॅच्युइटीच्या फॉर्म्युल्यानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ काम केले असेल तर ते एक वर्ष म्हणून मोजले जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने ७ वर्षे ८ महिने एखाद्या कंपनीत काम केले असेल, तर त्याचा कार्यकाळ ८ वर्षे मोजला जातो. जर ७ वर्षे ३ महिने एखाद्या व्यक्तीनं काम केलं असेल तर ते फक्त सात वर्षच मोजले जातात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know about gratuity calculation rules and everything hrc

First published on: 30-03-2022 at 19:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×