संदीप नलावडे

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांची पुन्हा निवड झाली आहे. मूळचे कोकणातील असलेल्या वराडकर यांनी २०१७मध्ये आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर २०२०च्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र अडीच वर्षांनंतर वराडकर पुन्हा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवडून आले आहेत. वराडकर यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांना आलेले यश यांचा धांडोळा.

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
Parshottam Khodbhai Rupala
मोले घातले लढाया: उमेदवारी वादात

लिओ वराडकर यांची पंतप्रधानपदी निवड कशी?

आयर्लंडमध्ये ताओइसेच हे पद महत्त्वाचे मानले जाते. ताओइसेच हा पंतप्रधानपदासाठीचा आयरिश शब्द आहे. ४३ वर्षीय वराडकर यांचा ‘फाइन गाएल’ हा पक्ष आणि मायकल मार्टिन यांचा ‘फियाना फेल’ या पक्षांत परस्परसामंजस्याने सत्तेचे आवर्तन झाले आहे. २०२०च्या निवडणुकीत आयर्लंडमधील ग्रीन्स पक्षासह या दोन्ही पक्षांनी आघाडी केली. त्यांच्यातील समझोत्यानुसार पंतप्रधानपदाची सूत्रे आलटून- पालटून येतात. २०१७ मध्ये फाइन गाएल पक्षाची सूत्रे हाती घेतलेल्या वराडकर यांना पंतप्रधानपद मिळाले. एक नवीन आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. आयर्लंडच्या इतिहासात सर्वात तरुण पंतप्रधान असलेल्या वराडकर यांना २०२० मध्ये पंतप्रधानपद गमवावे लागले. २०२०च्या आघाडीच्य अटीनुसार फियाना फेलचे मायकल मार्टिन यांना पंतप्रधानपद मिळाले, वराडकर यांना उपपंतप्रधानपद मिळाले. अडीच वर्षांनंतर अटीनुसार पुन्हा पंतप्रधानपदी लिओ वराडकर विराजमान झाले.

वराडकर यांच्या भारतीय वंशाबाबत…

मूळ भारतीय वंशाचे असलेले लिओ वराडकर यांचे वडील अशोक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वराड गावचे. त्यांच्या पित्याचा जन्म मुंबईत झाला. व्यवसायाने डॉक्टर असलेले त्यांचे पिता अशोक वराडकर १९६०च्या दरम्यान ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. तिथे परिचारिका असलेल्या मिरिआम या आयरिश महिलेच्या ते प्रेमात पडले आणि त्यांनी १९७१मध्ये विवाह केला. लिओ यांचा जन्म १९७९ मध्ये डब्लिन येथे झाला. त्यांना सोफिया आणि सोनिया या दोन ज्येष्ठ भगिनी आहेत. आयर्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या लिओ यांनी २००३ मध्ये मुंबईतील केईएम रुग्णालयात इंटर्नशिप केली. २०१८ मध्ये वराडकर यांनी कोकणातील आपल्या मूळ गावी म्हणजे वराड गावाला भेट दिली होती. ग्रामदैवत वेतोबाचे दर्शन घेऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला होता.

विश्लेषण : ब्रिटनमधील परिचारिकांचा संप महत्त्वाचा का आहे? सुनक सरकारसमोर हे सर्वांत मोठे आव्हान का ठरते?

वराडकर राजकारणाकडे कसे वळले?

वैद्यकीय शिक्षण घेत असतानात वराडकर राजकारणाकडे वळले. वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच १९९९ मध्ये डब्लिनमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीला ते उभे राहिले. त्यावेळी ते वैद्यकीय शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षाला होते. या निवडणुकीत अपयश आले असले तरी २००४च्या निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. २००७च्या मध्यावर्ती निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते एंडी केनी यांनी त्यांची निवड उद्याेग, व्यापार आणि रोजगार खात्याच्या प्रवक्तेपदी केली. २०१० मध्ये दूरसंपर्क व ऊर्जा खात्याच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती झाली. २०११च्या मध्यावधी निवडणुकीत पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली.

‘फाइन गाएल’ पक्षाने लेबर पार्टीशी आघाडी केल्याने वराडकर यांच्या गळ्यात वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर त्यांनी आरोग्य, सामाजिक संरक्षण ही खाती सांभाळली. २०१७ मध्ये फाइन गाएल पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांची ताओइसेच म्हणजेच पंतप्रधानपदी निवड झाली. वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी त्यांनी हे यश मिळविले. मात्र त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. समलिंगी संबंधांबाबत वाद असताना वराडकर यांची ‘समलिंगी संबंधांचे उघड समर्थक’ अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे २०२० मध्ये त्यांना हे पद मिळविण्यात अपयश आले.

लिओ वराडकर यांची समलिंगी संबंधांबाबतची मते काय?

लिओ वराडकर यांची समलिंगी संबंधांचे उघडपणे समर्थन केलेले आहे. २०१५ च्या निवडणुकीत तर त्यांनी आपण समलिंगी असल्यो मान्य केले होते. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात कठोर, पुराणमतवादी नैतिक विचारसरणीचे वर्चस्व असलेल्या आयर्लंडमध्ये अशा प्रकारचे उघड समर्थन करणे सोपे नव्हते. कारण या ठिकाणी समलिंगी व्यक्तीला गुन्हेगाराच्या चष्म्यातून पाहिले जाते. मात्र तरीही वराडकराचा आयरिश राजकारणातील उदय उल्लेखनीय आहे. ‘‘मी समलिंगी असून यात गुप्त ठेवण्यासारखे काहीही नाही. हा माझ्या व्यक्तिरेखेचा भाग असून यामुळे माझ्याकडे चुकीच्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही,’’ असे वक्तव्य वराडकर यांनी केले होते.

विश्लेषण: ‘मुचाचोस’ गीत काय आहे? ते कसे ठरले अर्जेंटिना फुटबॉल संघाचे स्फूर्तिगीत?

वराडकर यांनी यश कसे मिळविले?

आयर्लंडचे पंतप्रधान असलेल्या मायकल मार्टिन यांच्याविरोधात जनमत गेले होते. करोना महासाथीतून बाहेर पडण्यासाठी तसेच युरोपीय महासंघातून २०१६ च्या सार्वमतानंतर बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनने घेतल्यानंतर वराडकर यांनी आपले नेतृत्व दाखविले होते. आयर्लंड संसदेच्या कनिष्ठ सभागृह डेलच्या विशेष सत्रादरम्यान सदस्यांनी त्यांच्या नामांकनाला मान्यता देण्यासाठी मतदान केल्यानंतर त्यांनी मार्टिन यांची जागा घेतली. २०२०च्या निवडणुकीनंतर फाइन गाएल, फियारा फेल आणि ग्रीन पार्टीने आघाडी सरकार स्थापन केल्याने अटीनुसार फाइन गाएल आणि फियारा फेल या पक्षांनी पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेतले. फियारा फेलच्या मार्टिन यांची अडीच वर्षे १६ डिसेंबर २०२२ला समाप्त झाल्याने फाइन गाएलचे वराडकर यांना पंतप्रधान पद मिळाले.

तीन युरोपिय देशांमध्ये भारतीय पंतप्रधान…

वराडकर यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने युरोपमधील तीन देशांचे नेतृत्व भारतीय वंशाच्या नागरिकाकडे असल्याचे दिसून येते. आर्थिक आघाडीवर अपयश आल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा लिझ ट्रस यांनी दिला होता. त्यांच्या जागी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड झाली. तर मूळचे गोव्याचे असलेले अँटोनियो कोस्टा हे २०१५ पासून पोतुर्गालचे पंतप्रधानपद सांभाळत आहेत.