सचिन रोहेकर

डिसेंबरचा किरकोळ आणि घाऊक महागाई दराचा आलेख चढता होता. उल्लेखनीय म्हणजे ग्रामीण भारतापेक्षा शहरी भागाला या चढया महागाईची झळ अधिक बसताना दिसत आहे. महागाईच्या या भूतामागचे नेमके वास्तव काय?

Voting in second phase lower than expected in Vidarbha lok sabha election 2024
मतटक्क्याला झळा! विदर्भात दुसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान
Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..

चलनवाढीची सद्य:स्थिती कशी?

भारतातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई अर्थात किरकोळ चलनवाढीचा दर सरलेल्या डिसेंबर २०२३ मध्ये ५.७ टक्के असा चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. महिन्यापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर २०२३ मध्ये तो ५.५५ टक्क्यांवर होता. या दराचा हा चढता पारा मुख्यत: भाज्या, डाळी, कडधान्ये अशा खाद्य घटकांच्या किमतीत वाढीच्या परिणामी आहेत. किरकोळ चलनवाढीपाठोपाठ, डिसेंबरमधील घाऊक चलनवाढही नऊ महिन्यांच्या उच्चांकी पोहोचल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. सलग सात महिने शून्याखाली उणे स्थितीत असलेला हा दर नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच शून्याच्या वर म्हणजे ०.२६ टक्के नोंदवला गेला, तर पाठोपाठ डिसेंबरमध्ये तो ०.७३ टक्के असा नोंदवला गेला.

हेही वाचा >>> चंद्राबाबू नायडूंवर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप, काय आहे कौशल्य विकास महामंडळ घोटाळा?

घाऊकआणि किरकोळप्रकार काय?

ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आणि घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) असे महागाई दर किंवा चलनवाढीच्या मापनाचे दोन रुळलेले प्रकार आहेत. त्यांना अनुक्रमे किरकोळ आणि घाऊक चलनवाढ असेही म्हटले जाते. किरकोळ दरात ग्राहकांकडून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांच्या एका विशिष्ट सूचीच्या एकूण किंमतवाढीची भारित सरासरी असते. तर घाऊक विक्रेत्याकडून विक्री होणाऱ्या वस्तूंच्या किमतीतील सरासरी बदल हा घाऊक किंमत निर्देशांकातून पुढे येतो. किरकोळ चलनवाढ ही ग्राहकाच्या पातळीवर तर, त्याउलट घाऊक महागाई उत्पादनाच्या पातळीवर मोजली जाते. सेवांचा समावेश किरकोळ महागाईत असतो मात्र घाऊक महागाईत नसतो. या अर्थाने किरकोळ दर सामान्यांच्या जिव्हाळयाचा ठरतो आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून पतधोरण ठरवताना हाच दर लक्षात घेतला जातो. 

खाद्यवस्तूंच्या किमती का वाढत आहेत?

सरलेल्या डिसेंबरमध्ये महागाई दरात वाढीसाठी पूर्णत्वाने खाद्य आणि पेयवस्तूंच्या किमती, मुख्यत: भाज्यांची किंमतवाढ कारणीभूत ठरली. वार्षिक खरीप उत्पादनात झालेली घट, तसेच एल निनोच्या परिणामी तुटीच्या आणि अनियमित राहिलेल्या पावसाने रब्बीच्या पेरण्याही घटल्या आहेत. द्वैमासिक पतधोरणाची घोषणा करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही खाद्यवस्तूंच्या अनिश्चित किमतीमुळे महागाई वाढण्याचा इशारा दिला होता. रब्बी हंगामातील गहू, मसाले आणि डाळी यांच्या पेरण्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची, शिवाय जागतिक पातळीवर साखरेच्या भावात होत असलेली वाढ चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : सरकारी अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी लागणारी पूर्ण परवानगीची अट नेमकी काय आहे? जाणून घ्या..

सामान्यांच्या जीवनमानाशी मेळ किती?

महागाई किंवा चलनवाढीचा दर हा अर्थव्यवस्थेतील वस्तूंच्या किमती वाढण्याचा सूचक असतो. जाहीर होणारे आकडे आणि सर्वसामान्यांना महागाईच्या भडक्याचे प्रत्यक्षात बसणारे चटके यात खूप मोठी तफावत असते हेही तितकेच खरे. याला कारण म्हणजे किरकोळ चलनवाढीचा सर्वाधिक भर हा अन्नधान्यावर असतो. म्हणजे किमतवाढ जोखल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांच्या सूचीमध्ये अन्नधान्य घटकांचा निम्म्याहून अधिक वरचष्मा या दरात आहे. त्यामुळे कांदे-बटाटे, टॉमेटो, भाज्या, डाळी, अंडी-दुधाच्या किमती वाढल्या की त्याचे प्रतिबिंब किरकोळ चलनवाढीच्या आकडयांमध्ये उमटत असते. तर प्रवास भाडे, घर भाडे, आरोग्यनिगा, औषधोपचार, शिक्षण आणि बदलत्या जीवनशैलीनुरूप मनोरंजन, विरंगुळा म्हणून वापरात येणाऱ्या अन्य सेवा, उत्पादने या तीव्र रूपात किमती वाढत असलेल्या घटकांना ग्राहक किंमत निर्देशांकात पुरते प्रतिनिधित्व नाही आणि पर्यायाने प्रत्यक्ष दरात उमटणारे प्रतिबिंबही नगण्यच आहे. त्यामुळेच महागाईची प्रत्यक्ष बसणारी झळ आणि जाहीर होणारे आकडे यात मेळ नसल्याचे अनुभवास येते.

शहरवासीयांसाठी वाढता दर कसा?

अन्नधान्य घटकांमध्ये महागाईचा जोर असल्याने, ग्रामीण भागापेक्षा उपभोग्य खाद्यवस्तूंची खरेदी ही शहरवासीयांसाठी स्वाभाविकच जाचक ठरत आहे. कडधान्ये (२०.७३ टक्के), भाजीपाला (२७.६ टक्के), फळे (११.१४ टक्के) आणि साखर (७.१४ टक्के) अशी खाद्य घटकांतील डिसेंबरमधील किंमतवाढीची उच्च पातळी राहिली. तृणधान्ये आणि मसाल्यांच्या बाबतीतही डिसेंबरमध्ये अनुक्रमे ९.९ टक्के आणि १९.७ टक्क्यांची महागाई अनुभवास आली. याचा एकत्रित परिणाम म्हणून शहरी भागात खाद्य घटकातील महागाईचा दर १०.४ टक्के राहिला. त्याउलट ग्रामीण ग्राहकांनी तृणधान्ये (१०.३ टक्के), दूध, मसाले आणि साखर यांसारख्या काही उत्पादनांमध्ये जास्त महागाई सोसली. खाद्यतेलाच्या किमतीतील किंमतवाढही नोव्हेंबरपासून १५ टक्के पातळीवर कायम आहे.

sachin.rohekar@expressindia.com