– आसिफ बागवान

कॅलिफोर्नियातील ॲपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये दरवर्षी सप्टेंबरमध्ये होणारी ॲपलची परिषद जगभरातील आयफोनप्रेमींचे आकर्षण केंद्र असते. या परिषदेत जाहीर होणारा नवीन आयफोन हा चर्चेचा विषय असतोच; पण त्यासोबत जाहीर होणारी अन्य उत्पादने किंवा तंत्रज्ञान हेदेखील लक्ष वेधून घेत असतात. ग्राहकांना काहीतरी नवीन देण्याचा ॲपलचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. हे नाविन्य केवळ ॲपलपुरतेच मर्यादित न राहता तंत्रजगतासाठीही भविष्यवेधक ठरते. अशाच वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांवर एक दृष्टिक्षेप…

आयफोन १४च्या ‘काचेवरील बेट’!

स्मार्टफोनच्या पृष्ठभागाला काठोकाठ व्यापून घेणाऱ्या डिस्प्लेची एक गंमत असते. डिस्प्ले कितीही मोठा आणि काठोकाठ पसरलेला असला तरी, त्यावरील कॅमेऱ्यासाठीची खाच खटकत राहते. ही खाच, ज्याला इंग्रजीत ‘नॉच’ म्हणतात, तिला कमीत कमी जागेत बसवण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी आजवर अनेक क्लृप्त्या लढवल्या. पण ॲपलने आयफोन १४मध्ये ही ‘खाच’ कमी करण्याऐवजी वाढवून तिला वेगळेच रूप दिले.

PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
artificial intelligence helping tackle environmental challenges
कुतूहल :  कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी निसर्गाची जोड
Zee Marathi Lakshmi Niwas serial promo
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची नवी मालिका ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, समोर आली संपूर्ण स्टारकास्ट
EVMs at 25 booths will be verified due to Rahul Kalates doubts about EVMs
राहुल कलाटेंची ईव्हीएमबाबत शंका; २५ बूथवरील ईव्हीएमची होणार पडताळणी!
What is the reason for waiting so long for the OTP message print exp
‘ओटीपी’ संदेशासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार? कारण काय? परिणाम काय?
OTP Messages
OTP Messages : १ डिसेंबरपासून OTP मेसेज मिळण्यास विलंब होणार? नेमकी कारणं काय? जाणून घ्या!

‘डायनॅमिक आयलँड’ असे ॲपलने या जागेला नाव दिले आहे. या जागेत वापरकर्त्यांना आयफोनचे नोटिफिकेशन पाहता येणार आहेत. त्यामध्ये कॉल, मेसेज, म्युझिक नोटिफिकेशन पाहता येतात. शिवाय मल्टीटास्कींगसाठी ही जागा उपयुक्त ठरणार आहे. ॲपलने तयार केलेले हे ‘काचेवरचे बेट’ इथेच थांबेल, असे नाही. येत्या काळात ॲपलखेरीज अँड्रॉइड फोनमध्येही अशी ‘बेटे’ तयार न झाल्यास नवलच!

‘अल्ट्रा’चे अचाट जग…

ॲपल यंदा ‘सीरिज आठ’चे आय वॉच सादर करताना, त्यात अधिक प्रीमियम श्रेणीत ‘सीरिज आठ प्रो’ जाहीर होण्याची चर्चा होती. पण ॲपलने ‘आय वॉच अल्ट्रा’ जाहीर करत थेट दोन पावले पुढे टाकली. खेळाडू, धावपटू, गिर्यारोहक, जलतरणपटू, पाणबुडे या साऱ्यांसाठी ‘ॲपल वॉच अल्ट्रा’ ही एक गरजच ठरावी! ‘वॉच’ची वैशिष्ट्ये पाहिल्यास या मंडळींच्या अनेक उपकरणांची गरज हे गॅजेट पार पाडेल, असे दिसते. यामध्ये ड्युअल फ्रिक्वेन्सी जीपीएस पुरवण्यात आली असल्यामुळे डोंगराळ भाग किंवा शहरातील दाटीवाटीच्या वस्तीतून वाट काढताना वापरकर्त्याला अचूक ठावठिकाणा मिळतो.

जवळपास दीडशे फूट खोल पाण्यात व्यवस्थित काम करू शकणाऱ्या या वॉचमध्ये पाण्याची खोली मोजण्याचीही क्षमता आहे. शिवाय पर्वतारोहण करताना समुद्रसपाटीपासूनची उंचीही यात मोजली जाते. डोंगरदऱ्यांत चुकामुक झाल्यास जवळपास सहाशे फूटपर्यंत एकमेकांना सिग्नल देणाऱ्या अलार्मची यात व्यवस्था आहे. यात १८ तास सलग कार्यरत राहणारी बॅटरी असून तिची टिकाऊ क्षमता दुप्पट करण्यासाठी ‘लो पॉवर मोड’ही आहे. शिवाय नेहमीच्या ॲपल वॉचमध्ये असणारी आरोग्यविषयक नोंदी टिपणारी वैशिष्ट्ये यात आहेत.

मोबाइल ते सॅटेलाइट

आयफोन १४मध्ये कनेक्टीव्हीटीसाठी ॲपलने सॅटेलाइटचाही पर्याय दिला आहे. तुम्ही एखाद्या आपात्कालिन स्थितीत असाल आणि मोबाइल नेटवर्कदेखील उपलब्ध नसेल तेव्हा आयफोन १४ सॅटेलाइटद्वारे संदेश पाठवण्याची सुविधा तुम्हाला देतो. याचा सर्वाधिक उपयोग बचावकार्यासाठी करण्यात येऊ शकतो. यासाठीचे सॉफ्टवेअर विकसित करताना ॲपलने अनेक बारकावेही टिपले आहेत. संदेश पाठवताना केवळ मदतीसाठीचा साधा संदेश न पाठवता, निवडक पर्यायी प्रश्नांची उत्तरे देऊन बचावपथकांना प्रत्यक्ष परिस्थितीची ढोबळ कल्पना देण्याची व्यवस्था या यंत्रणेत आहे. सध्या ही यंत्रणा आपात्कालीन परिस्थितीकरिता असली तरी, भविष्यात तिचा अधिक गोष्टींसाठी वापर होऊ शकतो.

अपघातसमयी ‘फोन’ कामी येतो!

आयफोन १४च्या सर्व मॉडेलसह ॲपल वॉचच्या सर्व मॉडेलमध्ये ॲपलने ‘क्रॅश डिटेक्शन’ यंत्रणा पुरवली आहे. वापरकर्ता चालवत असलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास तो ओळखून आपात्कालिन यंत्रणेशी संपर्क साधणारी संवेदक प्रणाली या सर्व गॅजेटमध्ये विकसित करण्यात आली आहे.

हेही वाचा : Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नवीन डिझाइनसह झाले लाँच; सर्व काही सविस्तर जाणून घ्या

वाहनाचा अपघात झाल्याचे ओेळखण्यासाठी बॅरोमीटर, जीपीएस आणि मायक्रोफोन या तीन यंत्रणा एकत्रितपणे काम करतात. बॅरोमीटर वाहनातील दबावानुसार अंदाज बांधते, जीपीएस वाहनाच्या वेगातील अचानक झालेला बदल टिपतो आणि मायक्रोफोनवर आघाताचा आवाज टिपला जातो. या तिन्हींच्या आधारे अंदाज बांधून आयफोन किंवा आय वॉचमधून आपात्कालिन व्यवस्थेशी संपर्क साधला जातो.

Story img Loader