केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) २३ ऑक्टोबर रोजी २० आयएएस कोचिंग संस्थांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखविल्याबद्दल नोटीस बजावली आणि जाहिरातींमध्ये चुकीचे दावे आणि अनुचित व्यापार पद्धती अवलंबल्याबद्दल या संस्थांची चौकशीही सुरू आहे. या बातमीला काही दिवस होऊन गेले असले तरी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी या विषयाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. त्यानिमित्ताने या विषयाचा घेतलेला हा आढावा ….

सीसीपीएने २० पैकी चार संस्थांना आतापर्यंत प्रत्येकी एक लाखांचा दंड ठोठावला आहे. या संस्थांनी त्यांच्या जाहिरांतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल दिशाभूल करणारी किंवा अपूर्ण माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला (CCPA) दिसून आले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव, फोटो आणि त्यांच्या रँकची माहिती देऊन या संस्थांनी जोरात जाहिरातबाजी केली. हे विद्यार्थी त्यांच्याच संस्थेतील असल्याचा भास या संस्थांनी निर्माण केला. मात्र सदर विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या कोर्ससाठी या संस्थेत प्रवेश घेतला होता, याची माहिती संस्थांनी उघड केलेली नव्हती. दि हिंदू या वृत्त संकेतस्थळाने याबद्दल सविस्तर लेख लिहून या विषयाचा धांडोळा घेतला आहे.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

हे वाचा >> यूपीएससी परीक्षा! दिल्लीत मिळणार विद्यावेतनासह मोफत प्रशिक्षण

सीसीपीएला काय आढळून आले?

कोचिंग संस्था कशाप्रकारे दिशाभूल करतात याची सविस्तर माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या आयुक्त निधी खरे यांनी दूरदर्शन न्यूजला दिली. त्या म्हणाल्या, प्रतेकवर्षी जेव्हा यूपीएससीकडून नागरी सेवांच्या परिक्षेचा निकाल जाहीर होतो, तेव्हा कोचिंग संस्थांकडून जाहिराती देण्याचा सपाटा लागतो. परिक्षेत सर्वाधिक गूण मिळवलेले विद्यार्थी आमच्याच संस्थेचे आहेत, हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांचे फोटो, नाव आणि त्यांचा रँक जाहीर केला जातो. मात्र सदर विद्यार्थ्यांनी या संस्थेत कोणता कोर्स घेतला होता, याची कोणतीही माहिती तिथे नमूद केलेली नसते.

यूपीएससीची परिक्षा तीन टप्प्यात होत असते. पूर्वपरिक्षा, मुख्य आणि मुलाखत, असे हे तीन टप्पे आहेत. सीसीपीएच्या लक्षात आले की, परिक्षेत यशस्वी होणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचा उल्लेख जाहिरातींमध्ये करण्यात येतो, त्या विद्यार्थ्यांनी केवळ मुलाखतीसाठीच संबंधित संस्थेत प्रवेश घेतला होता. कोचिंग संस्थाकडून मुलाखतीसाठीचे प्रशिक्षण मोफत देण्यात येते, कारण यातून या संस्थांना स्वतःचे हित साधायचे असते. ही महत्त्वाची माहिती जाहिरातीमध्ये उघड केलेली नसते. विद्यार्थ्यांनी नेमका कोणता कोर्स या संस्थेतून पूर्ण केला, याची माहिती देणे आवश्यक आहे. कोचिंग संस्थांनी महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवणे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यामुळे ही कृती “ग्राहक संरक्षण कायदा, २०१९” च्या कलम २(२८) नुसार शिक्षेस पात्र ठरते.

‘दिशाभूल करणाऱ्या जाहिराती’ म्हणजे काय?

ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २ (२८) मध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीची व्याख्या दिली आहे. त्यानुसार, अशी जाहिरात जी, १) वस्तू व सेवेचे खोटे वर्णन करते, किंवा २) ज्याद्वारे वस्तू व सेवेच्या दर्जाबाबत ग्राहकांना खोटे आश्वासन दिले जाते, किंवा ३) ज्याद्वारे वस्तू व सेवेसंदर्भातील महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवली जाते.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना कसे हाताळते जाते?

एखादी जाहिरात दिशाभूल करणारी असेल किंवा ग्राहक हक्कांचे उल्लंघन करणारी असेल, तर संबंधित जाहिरातीच्या निर्मात्याला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून नोटीस बजावली जाते. अशा वेळी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण त्यांना ती जाहिरात बंद करण्याची किंवा त्यात सुधारणा करण्याच्या सुचनाही करू शकते. तसेच संबंधित जाहिरातदाराला १० लाखांचा दंड आणि दोन वर्षांच्या तरुंगवासाची शिक्षा करण्याचा अधिकारही या प्राधिकरणाला असतो. याशिवाय संबंधित जाहिरातदाराला एक वर्षासाठी त्यांच्या वस्तू आणि सेवेचे उत्पादन बंद ठेवण्याचे निर्देशही दिले जाऊ शकतात. जर पुन्हा अशा जाहिराती केल्यास, ही बंदी तीन वर्षांपर्यंत वाढू शकते.

हे वाचा >> ‘यूपीएससी’च्या मराठी टक्क्यात आणखी घसरण ; प्रशिक्षण संस्थांवर कोटय़वधी खर्चूनही अपयश; व्यवस्थापनात उणिवा

कोचिंग संस्थाची अर्थनीती कशी चालते?

२०२२ च्या निकालानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ९३३ विद्यार्थ्यांची यादी नागरी सेवेतील विविध पदासांठी जाहीर केली. तथापि, सीसीपीएच्या लक्षात आले की, कोचिंग संस्थांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची माहिती दिली. सर्व संस्थांच्या जाहिरांतीमधील उत्तीर्ण उमेदवारांची बेरीज केली असता ती संख्या ३,५०० पेक्षाही जास्त असल्याचे लक्षात आले. विद्यार्थ्यांनी एकाहून अधिक संस्थेत प्रवेश घेतला असेल तरच हे प्रमाण वाढू शकते.

चौकशी केल्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने चार संस्थांना दंड ठोठावला. त्यापैकी आयएएस बाबा या संस्थेवरील कारवाईला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच राऊ आयएएस स्टडी सर्कलने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे (NCRDC) या कारवाईविरोधात दाद मागितली आहे. इतर काही कोचिंग संस्थांच्या जाहिरातींचा सध्या तपास सुरू असल्याची माहिती द हिंदूने दिली आहे.

चौकशीदरम्यान, कोचिंग संस्थांवर केलेल्या आरोपांवर त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली. कोचिंग संस्थांनी जी बाजू मांडली त्यातून सीसीपीएने व्यक्त केलेला दावा काही प्रमाणात खरा असल्याचे समोर आले. उदाहरणार्थ, एका संस्थेने दावा केला की, ९३३ पैकी ६८२ विद्यार्थी त्यांच्या संस्थेतील आहेत. पण जेव्हा पडताळणी केली तेव्हा लक्षात आले की, ६७३ विद्यार्थ्यांनी या संस्थेत अभिरुप मुलाखती देऊन यूपीएससी परिक्षेच्या मुलाखतीची तयारी केली होती. केवळ ९ विद्यार्थ्यांनी परिक्षांची तयारी आणि सामान्य कोर्ससाठी संस्थेत अधिकृत प्रवेश घेतला होता. वजीराव आणि रेड्डी इन्स्टिट्यूटनेही त्यांच्या ६१७ विद्यार्थ्यांनी परिक्षेत यश मिळवल्याचे जाहीर केले होते, मात्र हे सर्व विद्यार्थी केवळ मुलाखतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थेत आल्याचे उघड झाले.

भारतात स्पर्धा परिक्षांच्या कोचिंगची मोठी बाजारपेठ

भारतीय जाहिरात मानक परिषद (ASCI) च्या सीईओ आणि सचिव मनिषा कपूर यांनी द हिंदूला माहिती देताना सांगितले की, अलीकडच्या वर्षांत शिक्षण क्षेत्र हे जाहिरीतीमधून उल्लंघन होणाऱ्या क्षेत्रापैकी एक क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. मागच्या दोन वर्षांपासून परिषदेने ३,३०० जाहिरातींची पडताळणी केली आहे. ज्यामध्ये स्पर्धा परिक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या कोचिंग संस्थांचाही समावेश आहे.

मनिषा कपूर पुढे म्हणाल्या की, आम्हीच सर्वात क्रमांक एकवर आहोत, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो आणि हमखास यश.. इत्यादी दावे करून नियमांचे उल्लंघन केले जाते. शिक्षण क्षेत्रात अलीकडे कमालीचा तणाव निर्माण झाला असताना अशाप्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती विद्यार्थी आणि पालकांसाठी आणखी अडचणी वाढविणाऱ्या ठरतात.

आणखी वाचा >> यूपीएससी, एमपीएससी प्रशिक्षण प्रवेश : परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द; महाज्योतीची कारवाई

पुण्यातील इन्फिनियम ग्लोबल रिसर्च एलएलपी या सल्लागार कंपनीच्या मते, भारतातील कोचिंग संस्थाच्या बाजाराचे वार्षिक उत्पन्न २०२३० पर्यंत १.७९ लाख कोटींवर पोहोचेल. २०२३-३० या काळात त्याची वर्षागणिक वाढ होत जाणार आहे, असाही या संस्थेचा अंदाज आहे.

सीसीपीएने कोचिंग सस्थांच्या व्यापाराबाबतचे आपले निरीक्षण नोंदविले. विद्यार्थी साधारण १० वर्षांचा असताना त्याच्या कोचिंगची सुरुवात होते आणि पुढचे दोन दशके तो कोणत्या ना कोणत्या कोचिंग संस्थेत शिक्षण घेतो. दिल्ली हे यूपीएससी परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हब बनले आहे. तर राजस्थानमधील कोटा येथे दरवर्षी दोन लाख विद्यार्थी आयआयटी-जेईईच्या पूर्वपरिक्षेची तयारी करण्यासाठी जात असतात.