तंत्रज्ञानाच्या युगात बॅटरीचं महत्त्व वाढलं आहे. कारण बॅटरीशिवाय कोणतंही उपकरण चालणं कठीण आहे. मग तो स्मार्टफोन असो की मग इलेक्ट्रिक वाहन. या उपकरणात बॅटरी खूप महत्त्वाची असते. मात्र अनेकदा वापर वाढल्याने त्यातील उर्जा संपते आणि वारंवार चार्जिंग करावी लागते. चार्जिंगचा करण्याचा प्रकार हा वेळकाढूपणाचा असतो. मात्र भविष्यात ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. कारण ही बॅटरी २ ते ५ वर्षे नाही तर २८ हजार वर्षांपर्यंत काम करेल. आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची पोर्टेबिलिटी, इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता आणि मंगळ अंतराळ मोहिमेवर मानवाला घेऊन जाण्याची २१ व्या शतकातील शर्यत यामुळे गेल्या काही वर्षांत बॅटरी तंत्रज्ञान संशोधनात वाढ होत आहे. नॅनो डायमंड बॅटरी टेक्नॉलॉजीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नेमकं तंत्रज्ञान कसं आहे जाणून घेऊयात

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

नॅनो डायमंड बॅटरी टेक्नॉलॉजी (NDB)

हाय पॉवर डायमंड आधारित अल्फा, बीटा आणि नुट्रॉन वोल्टाइक बॅटरीवर सध्या काम सुरु असल्याचं techbrief.com नं आपल्या अहवालामध्ये सांगितलं आहे. पूर्ण जीवनभर या बॅटरीचा वापर होणार असून पर्यावरणस्नेही आहे. ही बॅटरी एका न्यूक्लियर जनरेटरसारखं काम करणार आहे. एनडीबी टेक्नॉलॉजीपॉवर सोर्ड इंटरमीडिएट आणि हाय लेवल रेडिओ आयसोटॉप्सवर आधारित आहे. सिंथेटिक हिऱ्याच्या काही लेव्हल सिक्योरिटीच्या माध्यमातून शील्डेड केली जाते. सेल्फ चार्जिंग प्रोसेसमुळे बॅटरी २८ हजार वर्षांपर्यंत चालू शकते असा दावा करण्यात येत आहे. या माधम्यातून कोणतंही डिव्हाइस किंवा मशिन चार्ज केली जाऊ शकते. सेल्फ चार्जिंगसाठी फक्त नैसर्गिक हवेची गरज असते. या वापर अंतराळ मोहिमेत उपयोगी ठरणार आहे.

नॅनो डायमंड बॅटरी कशी तयार होते?

नॅनोडायमंड बॅटरी हा एक नवीन प्रकार आहे. उच्च संवेदनशीलता आणि उत्कृष्ट सायकलिंग क्षमता आहे. नॅनो डायमंडचा सक्रिय कॅथोड मटेरियल म्हणून वापर केला जातो आणि संपूर्ण सिलिकॉन कोटिंग तंत्रज्ञानाने बनवलेल्या लिथियम-आयन बॅटरीप्रमाणेच कार्यक्षमतेसह सर्व प्रकारचे ऑर्गेनिक पॉलिमर बाइंडर वापरतात. डायमंड बॅटरी अण्विक कचऱ्यापासून तयार केली जाते. DW च्या रिपोर्टनुसार पूर्ण जगात ३ लाख टनाहून अधिक आण्विक कचरा उपलब्ध आहे. या बॅटरींना आण्विक रिएक्टरमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गीत ग्रॅफाइट घटकांना गरम करून तयार केलं जातं. यामुळे कार्बन गॅसमध्ये परावर्तित होतो. यावर दवाब टाकून कृत्रिम हिरा तयार केला जातो. हे हिरे वीज सप्लाय करण्यास सक्षम असतात. या हिऱ्यांचा वापर सर्व प्रकारच्या बॅटऱ्यांमध्ये केला जाऊ शकतो. बॅटरी निर्मितीवर कंपन्या काम करत आहेत. या वर्षाच्या शेवटी बॅटरी बाजारात येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रिस्टल विद्यापीठाच्या पर्यावरणासाठी कॅबोट इन्स्टिट्यूटच्या भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञांच्या टीमने प्रथम रेडिओएक्टिव्ह डायमंड बॅटरी विकसित केल्या होत्या.

विश्लेषण: Okinawa ने ३,२१५ इलेक्ट्रिक स्कूटर्स परत मागवल्या, कारण…

बॅटरीचा वापर कुठे कुठे होणार?

रोजच्या वापरातील डिव्हाईसमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. सेंसर, घड्याळ, स्मार्टफोन या उपकरणात याचा वापर करता येईल. तसेच अंतराळ मोहिमेत या बॅटरीचा सर्वाधिक उपयोग होणार आहे. अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या रॉकेट, सॅटेलाइटमध्ये वापर होऊ शकतो. तसेच दुर्गम भागात याचा वापर करता येईल. किरणोत्सर्गी डायमंड बॅटरी अधिक सोयीस्कर असतात, कारण त्यांचे आयुष्य पारंपरिक बॅटरीपेक्षा जास्त असते. NDB Inc. ने प्रस्तावित केल्याप्रमाणे ती सार्वत्रिक बॅटरीमध्ये विकसित केली जाऊ शकली तर, स्मार्टफोनच्या आयुष्यापेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या स्मार्टफोनच्या बॅटरीज आपल्याला मिळतील. तसेच एका फोनवरून दुसर्‍या फोनवर बॅटरी बदलू शकतो. आता सिम कार्ड हस्तांतरित करतो, अगदी तसंच.

बॅटरी धोकादायक?

अहवालानुसार या बॅटऱ्यांमधून काही प्रमाणात किरणोत्सार होतो परंतु त्यांच्यात गळतीची शक्यता कमी आहे. त्यामुळे या बॅटऱ्या घातक नसतील. तसेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या बॅटऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य असून त्यांचा पुनर्वापरही शक्य आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nano diamond battery technology solve the problem of frequent charging find out rmt
First published on: 20-04-2022 at 15:41 IST