-ज्ञानेश भुरे

टेनिस विश्वात गेली कित्येक वर्षे विविध विक्रम रचलेल्या रॉजर फेडररने वयाच्या ४१व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या सहाव्या वर्षी टेनिसची रॅकेट हाती धरल्यापासून तब्बल २४ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत १,५००हून अधिक सामने खेळल्यानंतर फेडररने दुखापती आणि शस्त्रक्रियांच्या आव्हानांमुळे पुढील आठवड्यात होणारी लेव्हर चषक स्पर्धा ही कारकीर्दीतील अखेरची असल्याचे स्पष्ट केले. यानिमित्ताने फेडररपर्वाचा हा आढावा.

cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world
ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप
With 200 runs per day in IPL is it time to rethink the pitch impact player rule
‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

फेडररला टेनिस विश्वातील सार्वकालीन सर्वोत्तम खेळाडू का मानले जाते?

फेडररने आपल्या दर्जेदार खेळाने टेनिसविश्वावर ठसा उमटवला. टेनिस विश्वात चार वर्षांत ११ ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे मिळवणारा फेडरर एकमेव टेनिसपटू आहे. विम्बल्डनशी त्याचे जसे अतूट नाते, तसेच अमेरिकन स्पर्धेतही त्याचे वर्चस्व दिसून आले आहे. अमेरिकन स्पर्धा सलग पाच वर्षे जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. कारकीर्दीत सर्वाधिक २० ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे मिळवणारा फेडरर पहिला टेनिसपटू होता. टेनिस कारकीर्दीत माती (क्ले), हिरवळ (ग्रास) आणि टणक (हार्ड) अशा तीनही प्रकारच्या कोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी फ्रेंच स्पर्धेत त्याला एकमेव जेतेपद मिळवता आले आहे. त्याने एकंदर कारकिर्दीत हार्ड कोर्टवर ७१, ग्रास कोर्टवर १९ आणि क्ले कोर्टवर ११ विजेतेपदे मिळवली. त्यामुळेच त्याचा टेनिसजगतातील सर्वकालिन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये समावेश होतो.

फेडररने कशा प्रकारे वर्चस्व राखले?

फेडररच्या वर्चस्वाला सुरुवात झाली ती २००३मधील विम्बल्डन विजेतेपदापासून. तेव्हापासून २०१०पर्यंत म्हणजे सात वर्षांत एकही वर्ष असे गेले नाही की फेडररने ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवले नाही. पुढे २०१२मध्ये पुन्हा एकदा फेडररने विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर चार वर्षे फेडररला दुखापतीने चांगलेच सतावले होते. अर्थात, त्यावर मात करत फेडरर उभा राहिला आणि पुन्हा एकदा २०१७मध्ये ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डनचे विजेतेपद त्याने मिळवले. २०१८मध्ये तो ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा विजेता ठरला. म्हणजेच १५ वर्षांत त्याने २० ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे पटकावली. 

वाढत्या वयाचा फेडररच्या कामगिरीवर कसा परिणाम झाला?

खेळाडूंसाठी वय हा केवळ एक आकडा असतो. जोपर्यंत तो शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त असतो, तोपर्यंत तो खेळत राहतो. पण, फेडररसाठी वय हे केवळ आकडा ठरले नाही. वाढत्या वयाचा त्याच्या खेळावर निश्चित परिणाम झाला. फेडरर ४१ वर्षांचा आहे. पण, विम्बल्डन २०२१पासून फेडरर कोर्टवर उतरलेला नाही. गुडघ्यावर एकामागून एक शस्त्रक्रिया कराव्या लागल्यापासून त्याचे पुनरागमन कायम लांबतच गेले.

फेडररच्या नावावर कुठली वेगळी नोंद आहे?

टेनिसविश्वात फेडररने अनेक पातळ्यांवर नावलौकिक मिळवला. खेळ आणि आपल्या वर्तनाने त्याने जगासमोर एक वेगळाच आदर्श उभा केला. अनेक नवोदित खेळाडूंसाठी तो प्रेरणास्थान ठरला. असंख्य विजेतेपदे, पुरस्कार आणि सन्मानही फेडररने मिळवले. पण, त्याच्या कारकिर्दीत असाही एक आगळा सन्मान आहे की, जो त्याला त्याच्या देशाने म्हणजे स्वित्झर्लंडने दिला. स्वित्झर्लंड सरकारने नाण्यावर त्याची छबी साकारली आहे. २० स्विस फ्रँकचे हे नाणे २०२०मध्ये स्वित्झर्लंडमध्ये चलनात आले. 

फेडरर आणि विम्बल्डनचे अनोखे नाते का?

फेडररची नाळ दोन जणांशी जोडली गेली. एक म्हणजे त्याचे कुटुंबिय आणि दुसरी नाळ जोडली गेली ती विम्बल्डनशी. फेडररच्या कारकीर्दीचा प्रवास विम्बल्डनपासून सुरू होतो. त्याने २००३मध्ये सर्वप्रथम विम्बल्डन विजेतेपद मिळवले आणि त्यानंतर सर्वाधिक आठ वेळा त्याने येथे विजेतेपद मिळवले. त्याच्या कोर्टवर समांतर जाणाऱ्या प्रत्येक फटक्यांचे विम्बल्डनचे तृणांगणही साक्षीदार आहे.

फेडररच्या तंदुरुस्तीमागचे रहस्य काय?

फेडररच्या निवृत्तीसाठी वय कारणीभूत असले, तरी तो वयाच्या ४०पर्यंत निश्चितपणे सर्वात तंदुरुस्त खेळाडू होता. विशेष म्हणजे त्याने कारकीर्द घडवताना कधीही आपल्या झोपेशी तडजोड केली नाही. तो दिवसातून चक्क १० तास झोप घेतो. दिवसभर खेळल्यानंतर शरीर थकते आणि त्याचा रक्तपेशीवर ताण पडत असतो. ते टाळण्यासाठी झोप आवश्यक असते, असे फेडररचे मत आणि त्याने त्याच्याशी कधी तडजोड केली नाही. याचप्रमाणे तो सामर्थ्य टिकावे, या हेतूने दोन-तीन तासांच्या फरकाने सतत काहीतरी खात असतो. दोरीच्या उड्या, धावणे, वेटलिफ्टिंग ही त्याची सवय आणि प्रत्येक मोठ्या स्पर्धेपूर्वी तो १० तास सराव करतो. 

टेनिस कोर्टबाहेरही शिस्तबद्ध…

फेडरर टेनिसमध्ये कितीही व्यग्र असला, तरी तो कमालीचा कुटुंबवत्सल आहे. टेनिसच्या धकाधकीतूनही तो कुटुंबाला कसा वेळ देता येईल, याकडे लक्ष देतो. त्यामुळेच तो कोर्टबाहेरच्या गॉसिपमध्ये कधीच तो सापडला नाही. विशेष म्हणजे प्रत्येक सामन्यापूर्वी आणि नंतर फेडररने कोणता पोषाख करायचा, हे त्याची पत्नी मिरका ठरवते आणि फेडररही तिच्या म्हणण्याला मान देतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो कमालीचा सहृदयी आहे. सामाजिक बांधिलकीचे भान राखताना तो एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर आपल्या कमाईतला काही भाग गरीब देशांमधील मुलांसाठी दान करतो.