सौदी अरेबियाने व्यक्तीला नागरिकत्व बहाल करण्याच्या नियमांत मोठे बदले केले आहेत. सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज यांच्या आदेशानंतर या नियमांत बदल करण्यात आला आहे. सौदी अरेबिया भारतासह अन्य देशांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. याच पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने नागरिकतेच्या नियमांत बदल केल्यामुळे त्याचा भारतावर काय परिणाम होणार? असे विचारले जात आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने नागरिकत्वाचे बदलले नियम आणि या बदललेल्या नियमांमुळे भारतावर होणारा परिणाम, या बाबी जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या नियमात काय आहे?

राजा सलमान यांच्या आदेशानुसार नागरिकत्व कायद्याच्या कलम ८ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. याच दुरुस्तीच्या आधारे परदेशातील पुरुषाशी लग्न केलेल्या सौदी अरेबियातील महिलेच्या मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळू शकेल. मात्र त्यासाठी काही अटी लागू असतील.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारतीय रेल्वेकडे एवढी जमीन का आहे? किती जागेवर अतिक्रमण?; जागा परत मिळवण्यासाठी काय करावे लागणार?

सौदी अरेबियात नागरिकतेविषयीचे निमय काय आहेत?

सौदी अरेबियात नागरिकतेसाठी काही नियम आहेत. या नियमांनुसार पुरुष मूळचा सौदी अरेबियाचा नागरिक असेल तर त्याच्या मुलांना आपोआपच त्या देशाचे नागरिकत्व मिळते. मात्र एखाद्या मुलाचे वडील परदेशी असतील तर त्याला नागरिकत्व मिळण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल. सोबतच त्या मुलाचा जन्म आखाती देशांमध्ये झालेला असावा. त्या मुलाचे चारित्र्य स्वच्छ असावे. त्याच्यावर कोणताही खटला नसावा. सोबतच सौदी अरेबियाचे नागरिकत्व हवे असेल तर अरबी भाषा येणे बंधनकारक आहे. या सर्व अटींची पूर्तता होत असेल तर मुलाला १८ वर्षांनंतर सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळू शकेल.

नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?

ज्या लोकांना सौदी अरेबियाचे नागरिकत्व हवे आहे. तसेच त्यांनी सर्व अटी-शर्ती पूर्ण केलेल्या आहेत, अशा व्यक्ती तेथे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी तेथील गृहमंत्रालयाच्या http://www.absher.sa या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. सर्व अटी पूर्ण होत असतील तर त्या प्रमाणे सौदी अरेबियाचे नागरिक म्हणून ओळख मिळू शकते.

हेही वाचा >>> विश्लेषण : अमेरिका ते कॅनडा, जगात कोणकोणत्या देशांत आहे समलिंगी विवाहाला मान्यता?

बदललेल्या नियमांमुळे भारतावर काय परिणाम होणार?

सौदी अरेबियामध्ये लाखो भारतीय नागरिक राहतात. यातील अनेकांनी मूळच्या सौदी अरेबियातील महिलांशी लग्न केलेले आहे. याआधी या देशाचे नागरिकत्व मिळवणे खूप कठीण होते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना तर जास्तच अडचणींना समोरे जावे लागत असे. एखाद्या पुरुषाने विदेशी महिलेशी लग्न केल्यास त्या विदेशी महिलेला लगेच सौदी अरेबियाचे नागरिकत्व दिले जायचे. मात्र एखाद्या महिलेने परदेशी पुरुषाशी लग्न केल्यास, त्या पुरुषाला नागरिकत्व मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. मात्र आता नागरिकतेच्या नव्या नियमांमुळे अनेकांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : सिगारेट बनवताय तर थोटकाची विल्हेवाटही लावा; स्पेनचा सिगारेट कंपन्यांना दणका; जाणून घ्या नवीन कायदा

भारतातील जे लोक सौदी अरेबियात जाऊन स्थायिक झालेले आहेत, त्यांच्या मुलांनाही तेथील नागरिकत्व मिळवण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. मात्र सौदी अरेबियाने बदललेल्या नियमांमुळे अनेकांना फायदा होईल, होऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saudi arabia changed citizenship rules know detail information prd
First published on: 13-01-2023 at 15:42 IST