जन्माच्या वेळी स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरामध्ये ३० वर्षांच्या ऐतिहासिक असंतुलनानंतर, तरुण पुरुषांची संख्या देशातील तरुण स्त्रियांपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. परिणामी, १९८० च्या नंतर जन्मलेल्या सुमारे सात ते आठ लाख “अतिरिक्त” दक्षिण कोरियन मुलांना लग्नासाठी दक्षिण कोरियन मुली शोधूनही मिळत नाहीये.

गेल्या चार दशकांमध्ये पूर्व आशियाई लोकसंख्येवर व्यापक संशोधन करणारे लोकसंख्याशास्त्रज्ञ सांगतात, “मला माहीत आहे की दक्षिण कोरियन मुलांच्या या वाढलेल्या संख्येचा मोठा प्रभाव संपूर्ण दक्षिण कोरियन समाजावर पडेल.”

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta chaturanga Discovery of Women Vote Bank
महिला व्होट बँकेचा शोध!
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

योगायोगाने चीन, तैवान आणि भारतातही असाच काहीसा ट्रेंड सुरू आहे. संशोधकांनुसार स्त्री-पुरुष गुणोत्तरामुळे ही वेळ आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लिंग असमानता:

बहुतेक देशांमध्ये मुलींपेक्षा जास्त मुले जन्माला येतात. सुमारे १०५ ते १०७ मुलांमागे १०० मुली असा जन्माचा दर आहे.

लिंग असमानता हे बहुधा स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात या जैविक वस्तुस्थितीचे उत्क्रांतीवादी रूपांतर आहे. कारण पुरुषांचा मृत्यू दर स्त्रियांपेक्षा जास्त असतो.

युनायटेड स्टेट्समध्ये १९५० मध्ये जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तर १०५ होते आणि २०२१ मध्येही ते १०५ च होते. जन्माच्या वेळीच्या लिंग गुणोत्तराच्या प्राप्त केलेल्या माहितीनुसार यूएसमध्ये हा आकडा स्थिर आहे. याउलट, दक्षिण कोरियामध्ये जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तर १९५० ते १९८० पर्यंत सामान्य श्रेणीत होते, परंतु हे १९८५ मध्ये ११० आणि १९९० मध्ये ११५ पर्यंत वाढले.

१९९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात या दरामध्ये थोडा चढ-उतार झाल्यानंतर, २०१० पर्यंत हा दर पुन्हा सामान्य श्रेणीत परतला. २०२२ मध्ये दक्षिण कोरियाचे जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तर १०५ होते, म्हणजेच सामान्य पातळीच्या आत होते. पण तोपर्यंत बराच उशीर झाला. परिणामतः दक्षिण कोरियात महिलांच्या कमी संख्येमुळे विवाह रखडू लागले.

बहुतेक देशांमध्ये मुलींपेक्षा जास्त मुले जन्माला येतात. सुमारे १०५ ते १०७ मुलांमागे १०० मुली असा जन्माचा दर आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अशी परिस्थिती उद्भवण्यामागे नेमके कारण काय?

गेल्या ३० वर्षांपासून दक्षिण कोरियाचे जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तर असमतोल असण्याला बरीच कारणे आहेत.

१९६० च्या दशकापासून २० ते ३० वर्षांच्या कालावधीत दक्षिण कोरियामध्ये जलद जननक्षमतेत घट झाली आहे. १९६० मध्ये प्रति स्त्री सहा मुलांवरून, १९७२ मध्ये चार मुलांवर, त्यानंतर १९८४ मध्ये दोन मुलांपर्यंत जननक्षमता कमी झाली. २०२२ पर्यंत दक्षिण कोरियाचा प्रजनन दर ०.८२ पर्यंत आला. हा दर जगातील सर्वात कमी प्रजनन दर आहे. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी कमीत कमी २.१ चा दर आवश्यक आहे.

तरीही, दक्षिण कोरियाची दीर्घकाळापासून मुलांना प्राधान्य देण्याच्या सुरू असलेल्या संस्कृतीत काही फरक पडला नाही. कमीत कमी एक मुलगा असणे या दक्षिण कोरियातील लोकांच्या इच्छेमुळे जननक्षमतेवर याचा परिणाम झाला. विशेषत: २१ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात.

एक अभ्यासानुसार, जेव्हा स्त्रियांना अनेक अपत्ये असतात तेव्हा त्यात किमान एक तरी मुलगा असतोच. फक्त दोन अपत्ये असणाऱ्यांपैकी मुलगा नसण्याची शक्यता सुमारे २५ टक्के असते आणि जेव्हा स्त्रियांना एकच मूल असते, तेव्हा मुलगा नसण्याची शक्यता ५० टक्क्यांपेक्षाही कमी असते. अशी माहिती समोर आली आहे.

कुटुंबांमध्ये मुलगा जन्माला यावा याची खात्री करण्यासाठी अनेक दक्षिण कोरियन लोक गर्भातील लिंग ओळखण्यासाठी सहज उपलब्ध असलेल्या तंत्रांकडे वळतात. उदाहरणार्थ, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात केली जाणारी स्क्रीनिंग टेस्ट. दक्षिण कोरियामध्ये कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य असलेल्या गर्भपाताचा गैरवापर कुटुंब त्यांच्या मुलांचे लिंग ओळखण्यासाठी करतात. याची त्यांना सर्रास परवानगीही दिली जाते.

दक्षिण कोरियामध्ये १९८० च्या जवळपास सुरू झालेल्या आणि सुमारे २०१० पर्यंतच्या काळात मुलींपेक्षा जास्त मुले जन्माला आली. जेव्हा हीच अतिरिक्त मुले प्रौढ होऊन लग्नाच्या वयाची झाली आणि लग्नासाठी दक्षिण कोरियाच्या मुली शोधू लागली, तेव्हा त्यांना मुली मिळाल्या नाहीत.

१९८० आणि १९९० च्या दशकात जन्मलेली अतिरिक्त मुले आता लग्नाच्या वयाची आहेत. यातील बरेच मुले लग्न करून कुटुंब सुरू करण्याचा विचार करत असतील. पुढील दोन दशकांत आणखी बरेच जण लग्नाच्या वयात पोहोचतील.

ज्या समाजात शतकानुशतके लग्न हा जीवनातला महत्त्वाचा भाग मानला जातो, ज्या समाजात प्रत्येकाने लग्न करून संसार करणे अपेक्षित आहे, त्याच समाजात आता याचा परिणाम होताना दिसत आहे. कोरियाच्या अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, २०२३ मध्ये १९ ते ३४ वयोगटातील ३६ टक्क्यांहून अधिक दक्षिण कोरियन मुलांना लग्न करायचे आहे.

परदेशात होतोय वधूचा शोध

परदेशी जन्मलेल्या महिलांचे स्थलांतर हा असमतोल दूर करण्यात मदत करू शकते.

लोकसंख्याशास्त्रज्ञ गाय एबेल आणि नॉयंग हिओ यांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, दक्षिण कोरिया सरकार आर्थिक सहाय्य करून आधीच ईशान्य चीनमधील कोरियन महिलांचे आणि काही कमी श्रीमंत देश जसे की, व्हिएतनाम, फिलीपिन्समधील महिलांना लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे आणि दक्षिण कोरियाला स्थलांतरित होण्यास मदत करत आहेत.

जर या अतिरिक्त मुलांनी स्थलांतरित महिलांशी लग्न केले नाही, तर त्यांना स्वतःचे जीवन आणि उपजीविका लग्नाशिवाय पुढे नेण्याला पर्याय राहणार नाही. काही जण सिओलमधील “बॅचलर गेट्टो”मध्ये आणि दक्षिण कोरियाच्या बुसान आणि डाएगू यांसारख्या इतर मोठ्या शहरांमध्ये स्थायिक होऊ शकतात. या शहरांमध्ये व्यावसायिक सेक्स आउटलेट अधिक प्रचलित आहेत. चीनमधील बीजिंग, शांघाय आणि ग्वांगझूसारख्या इतर आशियाई शहरांमध्ये अशा जागा आधीच पाहिल्या गेल्या आहेत, जेथे पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे.

जैविकदृष्ट्या जन्माच्या वेळच्या सामान्य लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त असलेली संख्या आणि त्याचा समाजावर होत असलेल्या परिणामाला दक्षिण कोरियन लोक स्वतः जबाबदार असल्याचे अभ्यासक सांगतात.

हेही वाचा: विश्लेषण : ‘सपिंड’ विवाह म्हणजे काय? दिल्ली उच्च न्यायालयाने यावर बंदी का घातली? जाणून घ्या सविस्तर..

जन्माच्या वेळेच्या लिंग गुणोत्तरातील भूतकाळातील असमतोलतेचा परिणाम आता होत असल्याचे दिसून येत आहे. या लिंग गुणोत्तरामुळे विवाहाला मुली न मिळणे, ही समस्या दक्षिण कोरियात पुढील अनेक वर्षे राहणार आहे.