पावलस मुगुटमल

उत्तरेकडील अनेक राज्यांत सध्या थंडीची लाट आहे. राजस्थान, हरियाणा, चंडीगड, पंजाब, दिल्ली आदी राज्यांतील मैदानी भागातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट दिसते आहे. या राज्यांच्या जवळच्या भागात बिहार, उत्तर प्रदेश ते थेट मध्य प्रदेशापर्यंत थंडीच्या लाटेचा परिणाम आहे. उत्तर भारतातील तापमानात घट झाली की त्या भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही तापमानाचा पारा खाली येतो आणि कडाक्याची थंडी अवतरते. सध्या त्याच परिणामांमुळे महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडी असली, तरी तिच्या वाटेत अनेक अडथळे आहेत. डिसेंबरातही काही काळ उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली होती. मात्र, महाराष्ट्रातील तापमान सरासरीखाली न गेल्याने फारशी थंडी जाणवलीच नाही. थंडीपुढील अडथळय़ांची ही मालिका सध्याही सुरूच आहे.

Imd predicts heatwave again in mumbai chances of rain in other parts of maharashtra
मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा; राज्याच्या अन्य भागांत पावसाची शक्यता
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
Red orange and yellow alert for rain in many parts of the state
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट

थंडीची ‘लाट’ कशाला म्हणतात?
रात्रीचे किमान तापमान मैदानी प्रदेशात १० अंशांखाली आणि सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा कमी झाल्यास ती थंडीची लाट समजली जाते. सरासरीपेक्षा ६ अंशांपेक्षा अधिकची घट तीव्र लाटेची स्थिती असते. किनारपट्टीच्या भागात थंडीच्या लाटेसाठी हे परिमाण किमान तापमान १५ अंशांखाली आणि सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील घट ४.५ असावी लागते.

यंदा थंडीत अडथळे कशामुळे?
हिमालयीन विभागात बर्फवृष्टी होत असताना वाऱ्यांची दिशा उत्तर-दक्षिण असल्यास उत्तरेकडील राज्यांपाठोपाठ महाराष्ट्र आणि त्यापुढेही तापमानात घट होत जाते. थंड वाऱ्यांच्या प्रवाहांचा प्रभाव वाढतानाच आकाशाची स्थिती निरभ्र राहिल्यास संबंधित भागात थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते.महाराष्ट्रात नोव्हेंबरला काही काळ आणि डिसेंबरमध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच दिवशी रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली जाऊन थंडी अवतरली होती. थंडीसाठी हक्काचा समजल्या जाणाऱ्या डिसेंबरातही कडाक्याची थंडी नोंदवली गेली नाही. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ऐन डिसेंबरमध्ये किमान तापमान १७ ते २० अंशांच्या आसपास राहिले. अनेकदा उन्हाचा तीव्र चटकाही जाणवला. मुंबई परिसरात तर या महिन्यात देशातील उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील राज्यांत काही काळ थंडीच्या लाटेची स्थिती असतानाही महाराष्ट्रात तापमानात वाढ कायम राहिली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ आणि राज्याच्या जवळपास निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे हे त्याचे प्रमुख कारण ठरले. कमी दाबाच्या क्षेत्रांनी उत्तरेकडील थंड प्रवाहाचा रस्ता रोखला आणि दक्षिणेकडून किंवा अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढविला. त्यातून महाराष्ट्रात पावासाळी स्थिती निर्माण झाली. त्यातून तापमानात वाढ होऊन थंडी झाकोळली.

सध्या देशातील हवामान कसे?
उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीची लाट असली (राजस्थानमधील भूभागाच्या क्षेत्रात चुरूसारख्या भागात दोनच दिवसांपूर्वी तापमान उणे होते) तरी देशभरात बहुतांश भागात थंडीच्या लाटेची स्थिती नाही. त्याचप्रमाणे उत्तरेकडील राज्यांतही थंडीच्या लाटेची स्थितीही फारकाळ टिकणार नसल्याचे दिसते आहे. उत्तरेकडेच काही भागांत आणि ईशान्येकडील भागामध्ये काही राज्यांमध्ये सध्या धुक्याची दाट चादर निर्माण होत आहे. बाष्पातून निर्माण होणारे धुक्याचे हे मळभ आणि काही भागांत निर्माण होणारी पावसाळी स्थिती थंडीवर परिणाम करते आहे. लागोपाठ येणाऱ्या पश्चिमी झंझावाताचा हा परिणाम आहे. उत्तरेकडील हवामानाच्या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेले पश्चिमी झंझावातातील वारे सध्या सातत्याने वाहत आहेत. एक झंझावात आल्यानंतर बर्फवृष्टीतून उत्तरेकडे थंडी निर्माण होते. पण, ती स्थिरावत असतानाच दुसरा झंझावात तयार होतो. त्यातून बाष्पयुक्त वारे वाहून थंडीचा प्रभाव घटतो आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?
महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये पावसाळी वातावरणाने थंडी झाकोळली. थंड वाऱ्यांचे प्रवाह विनाअडथळा महाराष्ट्राकडे आले असते तर बहुतांश भागांत थंडीची लाट आली असती. मात्र, सध्या दिवसभर आणि रात्रीही महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत आकाशामध्ये ढगाळसदृश, धुक्याचे मळभ आच्छादित आहे. त्यामुळे रात्री जमिनीतून निघणारी उष्ष्णता पूर्णत: वातावरणात उत्सर्जित होत नसल्याने रात्रीचे तापमान वाढते आहे. दिवसा जमीन खूप तापत नसल्याने धुक्याचा थरही शुष्क होत नाही. त्यामुळे तापमानात मोठी घट होत नाही.

पुढे हवामानाची स्थिती काय असेल?
उत्तरेकडील थंडीच्या लाटेची स्थिती दोन-तीन दिवसांत कमी होणार आहे. परिणामी या भागातील तापमानात २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राजवळील मध्य प्रदेशातील तापमानात मात्र घट होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रावर असलेले ढगाळसदृश धुक्याचे मळभ दोन-तीन दिवसांत दूर होण्याची शक्यता आहे. निरभ्र आकाशाची स्थिती राहून उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह काही प्रमाणात या काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दोन-तीन दिवसांत तापमानात घट होऊन काही प्रमाणात थंडी जाणवू शकेल.

pavlas. mugutmal@expressindia.com