आनंददायी आणि सुरक्षित प्रवासासाठी रहदारीचे नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र वाहनचालक व प्रवासी या नियमांकडे दुर्लक्ष करतात. वाहनचालकांनी रहदारीच्या नियमावलींचे पालन करावे यासाठी वाहतूक विभाग वेगवेगळ्या क्लृप्त्या करतो. व्हिएतनाम या देशात वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी तेथील सरकारने अनोखी नियमावली केली आहे. जर रहदारीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकाची माहिती दिल्यास त्याला आकारण्यात आलेल्या दंडाच्या १० टक्के रक्कम माहिती देणाऱ्याला मिळणार आहे. नव्या नियमावलीत दंडाची रक्कम वाढविण्यात आल्याने माहिती देणाऱ्यालाही भरघोस बक्षीस मिळणार आहे. भारतात मात्र या नियमावलीबाबत वेगळीच चर्चा रंगली. आपल्या देशात सर्रास वाहतूक नियमभंग होत असल्याने अशा माहिती देणारी व्यक्ती महिन्याला लाखो कमावू शकते, अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली. व्हिएतनाममधील अनोखी वाहतूक नियमावली आणि भारतात रंगलेल्या चर्चेविषयी… 

व्हिएतनाममध्ये काय बदल?

भारतामध्ये असुरक्षित वाहतूक ही ज्याप्रमाणे समस्या आहे, तशीच समस्या आग्नेय आशियातील व्हिएतनाम या देशात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहतूक कोंडी, अपघात अशा अनेक समस्यांना सामारे जावे लागत असल्याने व्हिएतनामच्या वाहतूक विभागाने वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र तरीही नियमभंग होतो. त्यामुळे दंडाची रक्कम दुपटीपेक्षा जास्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची माहिती देणाऱ्यास दंडाच्या रकमेच्या १० टक्के रक्कम मिळणार आहे. रस्त्यावरील रहदारीचे उल्लंघन कमी करण्यासाठी विशेष प्रोत्साहन लागू केले असून हा त्याचाच भाग आहे. देशाच्या सार्वजनिक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि वाहतूक शिस्त लागू करण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा एक घटक आहे. व्हिएतनाममध्ये आता दुचाकीस्वाराने सिग्नलचा नियम मोडल्यास त्याला ६० लाख डोंग (२०,००० रुपये) दंड आकारला जाणार आहे. (डोंग हे व्हिएतनामी चलन असून भारतातील एक रुपये म्हणजे व्हिएतनाममध्ये २९५.२४ रुपये होतात.) पूर्वी दुचाकीस्वाराने सिग्नल मोडल्यास त्याला १० लाख डोंगची दंडआकारणी होत असे. मात्र आता या रकमेत सहापटीने वाढ करण्यात आली आहे. कारचालकाने सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला आता दोन कोटी डोंग (७०,००० रुपये) असा घसघशीत दंड बसणार आहे. वाहन चालविताना मोबाइलचा वापर करत असलेल्या दंडाचीही रक्कम दुप्पट केली आहे. 

vasai municipal illegal constructions
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
reconstruction of 40 thousand row houses in navi mumbai news in marathi
बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; पार्किंगची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा निर्णय
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे
Pune Traffic, Pune Encroachment , Muralidhar Mohol,
पुणे : प्रशासन ऐकत नसल्याने भाजपचे मंत्री झाले हतबल ! म्हणाले…
Kalyan Dombivli municipal limits, illegal buildings in Kalyan Dombivli ,
कडोंमपामधील ५८ बेकायदा इमारतींना तूर्त दिलासा, महापालिकेच्या तोडकाम कारवाईला उच्च न्यायालयाची तूर्त अंतरिम स्थगिती
illegal slums, Former Assistant Commissioner ,
मुंबई : आदेश देऊनही बेकायदा झोपड्यांवर कारवाई नाही, महापालिकेचा माजी सहाय्यक आयुक्त अवमानप्रकरणी दोषी

हेही वाचा – Trump on Canada: कॅनडा अमेरिकेत विलीन होणार का? इतिहास काय सांगतो?

माहिती देणाऱ्याचा कसा फायदा?

वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांना भरमसाट दंड आकारण्या आला असला तरी, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाची माहिती देणाऱ्याला दंडाच्या रकमेच्या १० टक्के रक्कम मिळणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांची तक्रार करून नागरिक २०० डॉलर (सुमारे १७,००० रुपये) पर्यंत कमवू शकतात. व्हिएतनाममध्ये सरासरी मासिक उत्पन्न सुमारे ८० लाख डोंग (२७,००० रुपये) आहे, तिथे केवळ वाहतूक नियमभंग करणाऱ्याची माहिती देऊन १७ हजारापर्यंत रक्कम कमवता येणार आहे. वारंवार नियम मोडणऱ्या वाहनचालकांची माहिती दिल्यास ही रक्कमही अधिक मिळणार आहे. म्हणजेच सिग्नलचा नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वाराची माहिती दिल्यास दोन हजार रुपये आणि कारचालकाची माहिती दिल्यास सात हजार रुपये मिळतील. काही महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास तर दीड लाखांपेक्षा अधिक रुपये दंड आकारण्यात येणार असल्याने ही रक्कम अगदी १७ हजारापर्यंत जाऊ शकते. म्हजणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती देऊन नागरिक लाखो रुपये कमावू शकतात. 

नागरिकांना बक्षीस देण्याचे कारण काय? 

व्हिएतनामने आपल्या कुप्रसिद्ध अशा बजबजपुरीच्या रस्त्यांवर रहदारीचे उल्लंघन कमी करण्यासाठी विशेष प्रोत्साहन लागू केले आहे. सार्वजनिक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि वाहतूक शिस्त लागू करण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा एक घटक म्हणून नवे नियम लागू केले असल्याचे व्हिएतनाम प्रशासनाचे म्हणणे आहे. अनेकदा वाहनचालक मोबाइलवर संभाषण करत वाहन चालवितात, तर सर्रास सिग्नलच्या नियमावलींचा भंग केला जातो. हे टाळण्यासाठी नव्या नियमावलीत काही अनोख्या पद्धती लागू केल्या आहेत. नियमभंग करताना वाहनाचे छायाचित्र काढून ते वाहतूक विभागाला पाठविले, तर त्याची सत्यता तपासून वाहतूक विभागाकडून माहिती देणाऱ्यास बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. हे करताना माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना वाहन चालकाला आपल्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे, कोणीतरी आपली छायाचित्रे काढू शकते, असू वाटेल आणि तो नियमभंग करणार नाही. नियमभंग केल्याची माहिती वाहतूक विभागाकडे पोहोचत असल्याने रहदारीच्या नियमांकडे वाहन चालक दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळे नियमावलीत बदल केल्याचे व्हिएतनाम प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा, काय होऊ शकतात याचे परिणाम?

भारतात काय चर्चा रंगली?

व्हिएतनामच्या वाहतूक विभागाने वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी अनोखी नियमावली जारी केली असली तरी तिची चर्चा भारतात समाज माध्यमांवर अधिक रंगली. भारतातही अशा प्रकारचे नियम लागू केले पाहिजे, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली. भरमसाट लोकसंख्या आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या यांमुळे भारतात सहज वाहतूक नियमभंग केला जातो. वाहतूक कोंडीची समस्या आणि अतिरिक्त घाई यांमुळे भारतीय वाहनचालक रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या दंडाची रक्कम वाढविल्यास आणि त्यांची माहिती देणाऱ्यासह १० टक्के रक्कम देण्याचे लागू केल्यास भारतीय लाखो रुपये कमावू शकतात, अशी चर्चा समाज माध्यमांत रंगली. ‘‘भारतात सर्रास वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होते. जर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याची माहिती दिल्यानंतर दिवसाला पाच हजार रुपये मिळाले तरी महिन्याला लाखो रुपये सहज कमावू शकतो,’’ असे एकाने ‘एक्स’ माध्यमावर ट्वीट केले. माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या आणि लक्षावधी रुपयांचे मासिक वेतन घेरणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी तर नोकरी सोडण्याचीही तयारी दर्शविली. रहदारीच्या रस्त्यावर, मुख्य चौकात, सिंग्नलजवळ तासभर जरी उभे राहिलो तरी वाहतूक नियम मोडणारे खूप वाहनचालक सापडतील. त्यांची माहिती देऊन महिनाभरात बँक खात्यात लाखो रुपये प्राप्त होऊ शकतात, अशी मजेशीर चर्चा समाज माध्यमांवर रंगली. एकाने तर रस्त्यावर मोबाइल घेऊन सिग्नलचा नियम मोडणाऱ्यांची छायाचित्रे काढत असल्याचे छायाचित्र प्रसारित केले. ‘व्हिएतनामचे नियम भारतात लागू केल्यास प्रत्येक व्यक्ती लखपती बनणार,’ असा आशावाद एका पत्रकार महिलेने व्यक्त केला. प्रख्यात अर्थतज्ञ आणि निती आयोगाचे सदस्य अरविंद विरमानी यांच्यासह अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी, देशातील रस्ते सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतात समान वाहतूक उल्लंघन नियम लागू करण्याची मागणी केली. 

चर्चेतून काय साध्य?

व्हिएतनामच्या नवीन रहदारी नियमांची संकल्पना मांडून नेटकऱ्यांनी त्यावर हलके-फुलके भाष्य केले असले तरी दोनही देशांतील वाहतुकींच्या समस्येवर त्यामुळे चर्चा झाली. असा कायदा भारतात लागू केला जाईल, असे कोणतेही संकेत नसतानाही भारतीय जनतेला त्रासदायक ठरलेल्या दीर्घकालीन मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि रस्ते सुरक्षा यांबाबत मजेशीर चर्चा झाली असली तरी या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर मतमतांतर झाले. या घडामोडीने दोन्ही राष्ट्रांमधील वाहतुकीची गोंधळलेली स्थिती तर अधोरेखित केली आहेच, शिवाय बेपर्वा वाहन चालवणे आणि रस्त्याच्या नियमांची खराब अंमलबजावणी यांवरही प्रकाश टाकला आहे.   .

sandeep.nalawade@expressindia.com

Story img Loader