जर तुम्ही नियमित विमान प्रवास करत असाल तर कधी न कधी तुम्हालाही फ्लाइट टर्ब्युलन्स जाणवले असेल. वातावरण खराब असताना टर्ब्युलन्सचा धोका निर्माण होतो. टर्ब्युलन्समुळे दरवर्षी एअरलाइन्स कंपनींना मोठ्या नुकसानाचाही सामना करावा लागतो.

वातावरणात बिघाड झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील अनेक उड्डाणे विलंबित किंवा रद्द करण्यात आली. उड्डाण करणे ज्यांना शक्य झाले त्यांच्यापैकी काहींना बोर्डिंग पासवर नसलेल्या गंतव्यस्थानांवर पोहोचवण्यात आले. उदाहरणार्थ स्टॅनस्टेड ते न्यूक्वे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे विमान शेवटी मलागाकडे वळवण्यात आले. हवामान खराब असताना उड्डाण केल्यास प्रवाशांना फ्लाइट टर्ब्युलन्सच्या अनुभवाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक एअरलाइन्स कंपन्या खराब वातावरण असताना उड्डाणे रद्द करतात. फ्लाइट टर्ब्युलन्स म्हणजे नक्की काय? यामध्ये आपल्या शरीरात कसे बदल होतात? आणि याचा उपाय म्हणून आपण काय करू शकतो?

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

फ्लाइट टर्ब्युलन्स का होते?

फ्लाइट टर्ब्युलन्स होण्याची अनेक कारणे आहेत. परंतु याचे प्रमुख कारण म्हणजे हवेतील बदल. जेव्हा हवेचा दाब विमानांच्या पंखांवर येतो तेव्हा विमान हलू लागतं. टर्ब्युलन्स शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर विमानाच्या पंखांवरील हवेचा समतोल बिघडल्याने विमानाच्या आतमध्ये जाणवणारे धक्के किंवा अस्वस्थता.

फ्लाईट टर्ब्युलन्सला वातावरणातील बदल आणि हवेतील बदल कारणीभूत असतो. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

असमान हवेच्या प्रवाहामुळे फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्स निर्माण होते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, तुम्ही घरामध्ये तुमचे हेअर ड्रायर चालू केले आणि ते स्थिर धरले तर हवा सतत वेगाने येत असते. परंतु, एकदा तुम्ही केस वाळवायला सुरुवात केली आणि हेअर ड्रायर इकडे तिकडे हलवायला लागले की हवेच्या हालचालीत असमानता निर्माण होते. टर्ब्युलन्समुळे तुम्हाला चिडचिड होऊ शकते, अस्वस्थ वाटू शकते आणि धक्के बसू शकतात. त्यामुळे फ्लाइट टर्ब्युलन्स होत असल्याचे तुम्ही सहज ओळखू शकता. टर्ब्युलन्सदरम्यान सीटबेल्ट लावून सीटवर बसून राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

टर्ब्युलन्स कसे ओळखता येते?

शरीर कोणत्याही वातावरणात होणारे बदल सहज ओळखू शकते. उड्डाण करताना विमान पुढच्या दिशेने सरकत असते. विमान टेक ऑफ करते, लँड करते, वळणे घेते या प्रत्येक हालचाली आपल्या शरीराला जाणवतात. टर्ब्युलन्समुळे मेंदूला प्राप्त होणाऱ्या संकेतांमध्ये व्यत्यय येतो. यामुळेच आपल्या ज्ञानेंद्रियांनाही योग्य संदेश पोहोचवण्यात अडचण निर्माण होते.

या सगळ्यात आपल्या अंतर्गत कानाची रचना मोलाची भूमिका बजावते. यात अनेक जटिल उपकरणे असतात, जे ऐकण्यापेक्षाही अधिक कार्य करण्यास सक्षम असतात. यामध्ये कानाच्या अंतर्भागातील नागमोडी नलिका (कॉक्लीया), तीन अर्धवर्तुळाकार कर्णपटल, युट्रिकल आणि सॅक्युल यांचा समावेश आहे . कॉक्लीयामुळे आपल्याला ऐकता येते. उर्वरित संरचना डोके आणि शरीरात संतुलन ठेवण्यात सहकार्य करते. यासह कर्णपटलाला जोडलेले युट्रिकल आणि सॅक्युल गती आणि प्रवेग ओळखू शकतात.

दृष्टी ही सर्व ज्ञानेंद्रियांपैकी सर्वात मौल्यवान आहे. मेंदूच्या एक तृतीयांश भागाचे कार्य दृष्टीवर अवलंबून असते. यात होते असे की, विमान प्रवासात आपण जे डोळ्यांनी बघतो ते दृष्य कानाला ऐकू येणाऱ्या गोष्टीपेक्षा फार वेगळे असते. उदाहरणार्थ आपल्या डोळ्यांनी आपण समोरील सीट बघत असू किंवा आपल्या समोर कॉकपीट असेल आणि विमान वळणे घेत असेल किंवा वातावरणामुळे धक्के बसत असतील तर नेमकं काय घडत आहे हे आपण पाहू शकत नाही. या परिस्थितीत डोळे मेंदूला वेगळा संदेश देतात आणि कान वेगळा, अशात मेंदूला योग्य संदेश पोहोचण्यात व्यत्यय येतो आणि आपल्याला अस्वस्थता जाणवू लागते.

मेंदूला संदेश पोहोचण्यात येणाऱ्या अडचणीमुळे अस्वस्थता निर्माण होते. ज्यामुळे अनेकदा चक्कर येणे, घाम येणे तसेच मळमळ आणि उलट्या यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे दिसून येतात. मोशन सिकनेसची समस्या टर्ब्युलन्समुळे अधिक वाढू शकते. टर्ब्युलन्समुळे तुमच्या हृदयाची गतीदेखील वाढते. ही गती शरीराला होणारा ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे उड्डाण करताना सामान्यपेक्षा जास्त असते.

या परिस्थितीत वैमानिकांचे काय?

वैमानिक हजारो तास यात काम करतात. त्यामुळे काही काळानंतर या गोष्टींचा फारसा प्रभाव त्यांच्यावर पडत नाही. यासह त्यांच्याकडे काही अतिरिक्त संसाधनेदेखील आहेत, जी बहुतेक प्रवाशांकडे नसतात. त्यांच्याकडे कॉकपिटच्या खिडक्यांमधून समोर मोठे दृश्य असते. त्यामुळे त्यांना संदर्भ लावता येतो. ते पुढे काय आहे हे लगेच पाहू शकतात.

वैमानिकांच्या कॉकपिटच्या खिडक्यांमधून समोर मोठे दृश्य असते. (छायाचित्र संग्रहित)

जर वातावरण ढगाळ असेल किंवा दृश्यमानता कमी असेल, तर विमानातील उपकरणे विमानाच्या स्थितीचा अतिरिक्त दृश्य संदर्भ प्रदान करतात. याचा अर्थ असा नाही की, सर्व वैमानिकांना टर्ब्युलन्सची सवय असते. काही अभ्यासात असे दिसून आले आहे की, ७१ टक्के प्रशिक्षणार्थी वैमानिकांना यामुळे अनेक आजारही होतात.

टर्ब्युलन्समुळे होणारी अस्वस्थता कशी कमी करावी?

खिडकी असणारी सीट यात तुमची मदत करू शकते. खिडकीतून पाहता येणाऱ्या बाहेरील दृश्यामुळे आपल्या मेंदूला शांतता प्रदान होते.

खिडकीतून पाहता येणाऱ्या बाहेरील दृश्यामुळे आपल्या मेंदूला शांतता प्रदान होते. (छायाचित्र-इंडियन एक्स्प्रेस)

शक्य असल्यास विमान तिकीट बुक करताना अशी सीट निवडा जिथे टर्ब्युलन्सचा प्रभाव कमी जाणवेल. ही सीट विमानात समोर किंवा विमानांच्या पंखांजवळ असते. टर्ब्युलन्सचा प्रभाव विमानाच्या पुढील भागात कमी जाणवतो. विमानांच्या पंखांजवळील सीटवरही याचा प्रभाव कमी जाणवतो, कारण विमानाचे पंख विमानाला संतुलित ठेवण्यास मदत करतात.

टर्ब्युलन्सवेळी तुम्हाला घाबरल्यासारखे जाणवल्यास दीर्घ श्वासोच्छ्वास करावा. दीर्घ श्वासोच्छ्वास नक्कीच फायद्याचे ठरते. यावेळी नाकाने श्वास घेऊन तोंडाने श्वास सोडावा. यात श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मज्जासंस्था शांत होते. जर तुम्हाला मोशन सिकनेसचा त्रास होत असेल आणि फ्लाइटदरम्यान टर्ब्युलन्सबद्दल काळजी वाटत असेल, तर काही अँटीहिस्टामाइन्ससह उपायकारी औषधेही उपलब्ध आहेत.

हेही वाचा : ज्ञानवापी मशीद संकुलात ३१ वर्षांनंतर झाला शंखनाद, हिंदूंना मिळाला पूजेचा अधिकार; ‘व्यासजी का तहखाना’ काय आहे?

शेवटी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, जरी टर्ब्युलन्स आपल्याला अस्वस्थ करणारे असले तरी विमाने त्यातून निर्माण होणाऱ्या शक्तींचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेली असतात. प्रवाश्यांना उड्डाण करताना क्वचितच एखाद्या गंभीर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागतो. वैमानिक सक्रियपणे मार्गांची योजना आखतात, ज्यामुळे टर्ब्युलन्सचा धोका कमी होतो.