बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आलिया आणि रणबीर १४ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोन महिन्यांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबतची माहिती दिली. तिच्या या गुडन्यूजनंतर अनेकांनी तिच्या प्रेग्नेंसी आणि करिअरविषयी विविध प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. आलियाने वयाच्या २९ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतल्याने काही महिला तिचे कौतुक करत आहेत. तर काही वर्किंग वुमन्सने तिच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. आलियाच्या प्रेग्नेंसीनंतर आई होण्यासाठी योग्य वय कोणते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चला तर जाणून घेऊया.

एखाद्या मुलीसाठी आई होणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. पण एखादे विशिष्ट वय उलटून गेल्यानंतर बाळाचा विचार करणाऱ्या जोडप्यांमध्ये दोष आणि समस्या निर्माण होतात. यामुळे आईचे बाळाचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अनेकदा वयाच्या तिशी ओलांडण्यापूर्वी प्रेग्नेंसीचा विचार करावा, असा सल्ला दिला जातो. पण प्रेग्नेंसीसाठी योग्य वय काय? त्यावेळी कोणत्या चाचण्या करणे गरजेचे असते? वय उलटून गेल्यानंतर आई होता येऊ शकतं का? अशा अनेक प्रश्नांना ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी उत्तर दिली. त्या लोकसत्ता डॉट. कॉमशी बोलत होत्या.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?

डॉ. रेखा डावर या सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये कार्यरत आहे. या ठिकाणी त्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात तज्ज्ञ म्हणून काम करतात. त्यांना जवळपास ४४ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. डॉ. रेखा डावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आई होण्यासाठी एखाद्या स्त्रीचे वय हे २५ ते ३५ या दरम्यान असणे गरजेचे आहे. जर एखादी मुलगी २० किंवा २१ वर्षाच्या आधी आई झाली तर तिचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तर दुसरीकडे जर वयाच्या ३५ वर्षानंतर एखाद्या स्त्रीने आई होण्याचा निर्णय घेतला तरी त्याचेही गंभीर परिणाम होतात. यावेळी आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या काळात आई होणाऱ्या महिलेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे गर्भधारणेसाठी २५ ते ३५ हे वय अगदी योग्य असते. यावेळी शरीराची प्रजनन स्थिती ही चांगली असते.”

गर्भधारणेपूर्वी चाचण्या गरजेच्या

“वयाच्या २० वर्षाच्या आधी मुलं होऊच देऊ नये. कारण २० वर्षाच्या आधी ती बाई स्वत: परिपक्व झालेली नसते. पूर्वी आपल्याकडे लग्न लवकर व्हायची आणि पहिलं मुलंही लवकर व्हायचे. पण आता लग्नाचे वय हेच १८ आहे आणि लग्न झाल्यानंतर स्थिरस्थावर व्हायला हवे. त्यानंतर जेव्हा पती पत्नी हे दोघेही शारिरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार असतील तेव्हाच प्रेग्नेंसी ही योग्य ठरते. त्यापूर्वी काही चाचण्या किंवा प्री प्रेग्नेंसी टेस्ट करणे गरजेचे आहे. यामुळे जर तुम्हाला काही शारिरिक व्याधी म्हणजेच मधुमेह, अस्थमा, थायरॉईड यासारख्या आजारांवर योग्य तो उपचार करता येतो. म्हणूनच ही चाचणी फार आवश्यक असते.”

“पहिल्यांदा आई होण्यासाठी २० ते ३० हे वय योग्य असते. पूर्वी २० ते ३० वर्षात पहिली गर्भधारणा व्हायची. पण आता स्त्रियांचे करिअर, शिक्षण यामुळे त्या स्थिर झालेल्या नसतात. त्यामुळे अनेकदा लग्न हेच ३० वर्षाच्या नंतर होताना दिसत आहेत. त्यामुळे त्या स्त्रियांनी वयाच्या ३५ पर्यंत गर्भधारणा करावी. पण त्यांनीही प्रेग्नेंसीपूर्वीच्या चाचणी करणे गरजेचे आहे. पण ३५ वर्षानंतर मात्र आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला शारिरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व स्त्रियांनी ३५ वर्षांपूर्वीच गर्भधारणा करावी.”

वाढत्या वयासोबत गर्भधारणा ठरु शकते धोकादायक

“हल्लीच्या मुली या वयाच्या २५ नंतरच लग्न करतात. मग त्यांनी लगेचच गर्भधारणेचा विचार करणे काहीही चुकीचं नाही. जर ते चांगलेच स्थिरस्थावर असतील, त्यांची शाररिक स्थिती, मानसिक स्थिती आणि आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्यांनी लग्नानंतर अगदी सहा महिन्यात किंवा वर्षभरात बाळाचा विचार करणे चुकीचे ठरणार नाही. पूर्वी लग्नानंतर वर्षभरात मुलं झालंच पाहिजे, अशी समज होती. पण तसं काहीही नाही.”

“जेव्हा एखाद्या जोडप्याची आर्थिक, मानसिक आणि शारिरिक तयारी होते त्यानंतर प्रेग्नेंट राहण्यात काहीही चुकीचे ठरणार नाही. पण जर लग्न हेच ३५ मध्ये झालं तर आम्ही डॉक्टर म्हणून त्यांना लगेचच चाचणी करुन गर्भधारणेचा सल्ला देतो. कारण वाढत्या वयासोबत गर्भधारणा होणे ही गोष्टही फार धोकादायक ठरु शकते. त्याचे गंभीर परिणामही शरीरावर होऊ शकतात”, असाही सल्ला डॉ. रेखा डावर यांनी दिला.