Who is Sabih Khan: मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या जगात ॲपल कंपनीला इतर कोणत्याही ओळखीची गरज नाही. या तंत्रज्ञानाच्या जगात आता एक नवीन नाव चर्चेत आलं आहे. ते म्हणजे सबीह खान. सबीह खान यांची जगातील लोकप्रिय अशा टेक कंपनीच्या नवीन सीओओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबीह खान हे मूळचे भारतीय आहेत. आयफोनचे उत्पादन कऱणाऱ्या ॲपल कंपनीने सबीह खान यांची त्यांच्या पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲपलने त्यांच्या एका निवेदनात म्हटले आहे की, जेफ विल्यम्स या महिन्याच्या अखेरीस ॲपलचे सीओओ म्हणून त्यांची भूमिका सबीह खान यांच्याकडे सोपवतील. खान ॲपलचे सीओओ अर्थात चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम करतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयफोन निर्माताप्रमुख टिम कूक यांना अमेरिकेतच मोबाईल उत्पादन करण्याची विनंती केली होती. मात्र, कूक यांनी ट्रम्प यांची ही विनंती अमान्य करत आयफोनचे उत्पादन चीनच्या बाहेरही वाढवले असतानाच कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत सबीह खान?

उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शहर मुरादाबाद इथे सबीह खान यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण पूर्ण करत असतानाच सबीह सिंगापूरला स्थायिक झाले आणि त्यानंतर ते अमेरिकेत गेले. टफ्ट्स विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी रेन्सेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. ॲपल कंपनीकडून नियुक्ती होण्यापूर्वी सबीह हे जीई प्लास्टिक्समध्ये कार्यरत होते. तिथे ते ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट इंजिनिअर आणि टेक्निकल प्रमुख म्हणून काम करत होते.
१९९५ मध्ये सबीह खान ॲपलच्या प्रोक्यरमेंट टीममध्ये सामील झाले. त्यानंतर हळूहळू त्यांची प्रगती होत २०१९ मध्ये ते वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करू लागले. गेल्या सहा वर्षांत त्यांनी ॲपलची उत्पादन पुरवठा साखळी हाताळत त्यामध्ये नियोजन, खरेदी, उत्पादन, लॉजिस्टिक्स, उत्पादन यांचा समावेश केला. सबीह यांनी गेल्या ३० वर्षांत ॲपलमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. कोविड-१९ च्या काळात त्यांनी उत्पादनात मोलाची कामगिरी बजावली.

सबीह खान यांची भूमिका आणि जबाबदारी

ॲपलने एका निवेदनात म्हटले आहे की, सबीह खान हे या महिन्याच्या अखेरीस सीओओ म्हणून पदभार स्वीकारतील. जेफ विल्यम्स यांच्या जागी सबीह खान यांची नियुक्ती झाली असली तरीही ते काही काळ ॲपलचे सीईओ टिम कुक यांना कंपनीच्या कामासंदर्भातील अहवाल देतील. तसंच ते कंपनीच्या डिझाइन आणि ॲपल वॉच या टीमची देखरेख करतील. त्यांच्या निवृत्तीनंतर या दोन्ही टीम थेट टिम कुक यांना रिपोर्टिंग करतील.

ठळक मुद्दे:

  • भारतीय वंशाचे सबीह खान अ‍ॅपलच्या सीओओ पदी
  • उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथे सबीह खान यांचा जन्म
  • शालेय शिक्षण सिंगापूर आणि त्यानंतर अमेरिकेत राहिले
  • अ‍ॅपलच्या आधी जीई प्लास्टिक्समध्ये कार्यरत होते
  • २०१९ मध्ये अ‍ॅपलमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत
  • कंपनीत अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या
  • गेली ३० वर्षे अ‍ॅपलमध्ये कार्यरत
मुरादाबाद ते ॲपलचे सीओओ, कोण आहेत सबीह खान? (Photo: Indian Express)

टिम कुक काय म्हणाले?

ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी कंपनीच्या पुरवठा साखळीतील मुख्य नियोजकांपैकी एक म्हणून सबीह खान यांचे कौतुक केले आहे. कुक म्हणाले की, “अमेरिकेत प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाच्या विकासात आणि उत्पादन युनिट्सच्या विस्तारात खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सबीह खान हे एक प्रतिभावान रणनीतीकार आहेत. त्यांनी कंपनीचा कार्बन फूटप्रिंट ६० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी करण्यातही योगदान दिले आहे. ते त्यांच्या मूल्यांसाठी आणि संवेदनशील नेतृत्वासाठी ओळखले जातात. ते मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करतात आणि मला विश्वास आहे की ते एक उत्कृष्ट सीओओ म्हणून स्वत:ला सिद्ध करतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सबीह खान यांनी मोठ्या मेहनतीने जागतिक पातळीवर नाव कमावले आहे. बॅरन्सच्या रिपोर्टनुसार, सबीह खान यांच्या आधी सीओओ पदावर असणाऱ्या जेफ विल्यम्स यांना १ मिलियन डॉलर म्हणजे ८ कोटी रुपये एवढं त्याचं मानधन होतं. बोनस आणि इतर सुविधा त्यात जोडल्यावर त्यांची एकूण कमाई १९१ कोटी इतकी होते. सबीह खान यांचं मानधनही याच आकड्याच्या आसपास असेल. मात्र, ॲपलने या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही.
सबीह खान यांनी ॲपलच्या ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग उपक्रमाला पुढे नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली असून पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी पुरवठादारांसोबत काम केले आहे. सबीह यांच्यामुळेच ॲपल जागतिक आव्हानांना तोंड देऊ शकले आहे