गेल्या काही दिवसांपासून चीनची अत्यंत वाईट अवस्था सुरू आहे. उद्योगधंद्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने चीनमधील अर्थव्यवस्थेत सातत्याने घसरण होत आहे. चीनमधील परदेशी कंपन्यांनी आता आपला व्यवसाय चीन सोडून इतर देशांमध्ये नेण्याचा विचार सुरू केला आहे. नुकतेच एक व्यावसायिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ३८ टक्के जर्मन कंपन्यांनी चीनमधून जपानमध्ये उत्पादन सुविधा स्थलांतरित करत असल्याचे सांगितले आहे. तर २३ टक्के कंपन्या प्रादेशिक व्यवस्थापन कार्ये चीनमधून जपानमध्ये हलवत असून, ज्यात त्यांना आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्थिरता ही प्राथमिक बाब महत्त्वाची वाटते आहे. जपानमधील जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि जर्मनीतील लेखा क्षेत्रातील दिग्गज KPMG यांनी एकत्रितरीत्या अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. २७ मार्च रोजी जाहीर झालेल्या सर्वेक्षणाला १६४ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता.

खरं तर जपानमधील हा अहवाल जपानबाहेरील व्यापार संघटनेने एका आठवड्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या अभ्यासाच्या निष्कर्षांच्या जवळ जाणारा आहे. त्यात भौगोलिक, व्यापार आणि आर्थिक अनिश्चितता टाळू इच्छिणाऱ्या परदेशी कंपन्यांसाठी जपान हे एक आकर्षक ठिकाण असल्याचं सांगितलं आहे. स्वस्त मजुरीचा खर्च आणि चीनची बाजारपेठ वाढणारी असल्यानं जर्मन कंपन्यांनी फार आधीपासूनच चीनच्या बाजारावर लक्ष केंद्रित केले आहे, असंही फुजित्सूच्या ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स युनिटचे मुख्य धोरण अर्थशास्त्रज्ञ मार्टिन शुल्झ म्हणाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्ध भडकले आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांसाठी चीनमधून अमेरिकेत माल निर्यात करणे अधिक कठीण झाले असून, चीनमधील राजकीय अन् भू-राजकीय समस्या वाढत असल्याची चिंता कंपन्यांना सतावते आहे.

How Israel is fighting war on four fronts
इराण, हेझबोला, हमास, हुथी… चार आघाड्यांवर लढण्याची इस्रायलची क्षमता किती? या संघर्षाचा अंत कधी?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
war Iran Israel
विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?
freedom party Austria
ऑस्ट्रियामध्ये राजकीय भूकंप… ‘नाझी’वादाची पार्श्वभूमी असलेला अतिउजवा पक्ष सत्तेच्या वाटेवर… युरोपचा राजकीय रंगमंच बदलणार?
Israel-Lebanon conflict,
लेबनॉनशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलनं फेटाळली; सर्वशक्तिनिशी हेजबोलाशी लढण्याचे लष्कराला आदेश!
pakistan beggars export in saudi
पाकिस्तानातून भिकाऱ्यांची निर्यात; सौदी अरेबिया प्रशासनाचं पित्त खवळलं, काय आहे प्रकरण?
thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
aI policy in India
भारतात ‘एआय’ धोरण राबवण्यात कोणत्या राज्यांची आघाडी? कोणती राज्ये पिछाडीवर? महाराष्ट्र कुठे?

चीन-अमेरिका तणाव वाढला

गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारातील मतभेद अधिकच शिगेला पोहोचले आहेत. अमेरिकेने चीनला सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलेल्या मायक्रोचिप्स मिळवण्यापासून रोखण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीनंतरच्या प्रशासनातील बदलामुळे व्यापार निर्बंध, शुल्क अजून वाढू शकते, त्याचीच चिंता आता परदेशी कंपन्यांना लागली आहे. त्यामुळेच जपानमधील कंपन्या पुन्हा स्वगृही परतत आहेत. जपानमध्ये उत्पादन सुविधा हलवून कंपन्या चीनवरचं अवलंबित्व काही प्रमाणात कमी करीत आहे, असंही शुल्झ सांगतात. अमेरिका आणि चीनमधील कोणत्याही संभाव्य व्यापार युद्धात जपानी कंपन्यांना सामील व्हायचे नाही. चीनमध्येही खर्च वाढत आहेत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेदरम्यान आम्हाला आमचं भविष्य दिसत नाही, असंही शुल्झ यांनी अधोरेखित केले. इतर चिंतांमध्ये परदेशी कंपन्यांना औद्योगिक हेरगिरी आणि चिनी अधिकाऱ्यांशी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे काही प्रकरणामुळे संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. जपान आणि चीन या दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या एका जर्मन कंपनीचे कार्यकारी अधिकारी म्हणाले की, चिनी अधिकाऱ्यांनी जपानी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले असेल किंवा त्यांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली असेल तर कंपन्यांनीसुद्धा प्रतिरोधक उपाय म्हणून तयार असणे आवश्यक आहे.

जपान आर्थिक अन् राजकीयदृष्ट्या स्थिर

खरं तर जपान आर्थिक अन् राजकीयदृष्ट्या स्थिर आहे. जपानी कंपन्या उर्वरित आशियामध्ये चांगल्या प्रकारे पसरलेल्या असून, त्यांनी आशियातील इतर देशांशी व्यवसाय जोडून वृद्धिंगत केला आहे. खरं तर आशियातील काही देश भागीदारीसाठी महत्त्वपूर्ण असून, जागतिक पुरवठा साखळींतही त्यांचं चांगलं योगदान आहे,” असंही शुल्झ म्हणाले. जर्मन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असलेल्या बॉशचे जपानमधील अध्यक्ष क्लॉस मेडर यांनी म्हटले आहे की, कंपनीच्या वेळ आणि प्रयत्नांच्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीसाठी चीन आणि जपान दोन्हीकडे आकर्षक कारणे आहेत. चीन ही कारसाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि जपानी ऑटोमोबाईल कंपन्या अजूनही जागतिक बाजारपेठेतील सर्वात मोठा हिस्सा नियंत्रित करतात. बॉशचे स्थानिक बाजारपेठेसाठी स्थानिक पातळीवर उत्पादन करण्याचे तत्त्व आहे, असेही मेडर म्हणाले. स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये उत्पादन सुविधा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जपान हे भाषेतील अडथळे अन् इतर वैशिष्ट्यांसह प्रवेश करण्यासाठी कठीण बाजारपेठ आहे, परंतु एकदा तुम्ही बस्तान बसवलेत आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला तर तुम्ही दीर्घकाळ टिकणारी भागीदारी तयार करू शकता,” असेही मेडर यांनी सांगितले. जपानमधील उपस्थिती देखील महत्त्वपूर्ण आहे, कारण येथील अनेक भागीदार जगाच्या इतर भागांमध्ये सक्रिय आहेत. विशेषत: आग्नेय आशिया, युरोप, चीन आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये संबंध टिकवून ठेवण्यासाठी त्या कंपन्यांच्या मुख्यालयाच्या जवळ असणे महत्त्वाचे आहे, असेही मेडर यांनी स्पष्ट केले. मेडर हे गेल्या १२ वर्षांपासून जपानमध्ये आहेत.

हेही वाचाः विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?

आशियातील इतर कंपन्यांशी जपानी कंपन्यांचे चांगले संबंध

जपानमधील जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे सीईओ मार्कस शुअरमन म्हणाले की, अभ्यासाचे परिणाम आशियातील सर्वात जुन्या औद्योगिक देशांशी कंपन्यांच्या कनेक्शनचे महत्त्व अधोरेखित करतात आणि व्यवस्थापन कार्यांचा वाढता कल येथे पाहायला मिळतो. सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्यांनी सांगितले की, आर्थिक स्थिरता, व्यावसायिक संबंधांची स्थिरता आणि सुरक्षितता आणि सामाजिक स्थिरता ही त्यांची जपानमध्ये असण्याची प्रमुख प्रेरणा होती. लोकशाही तत्त्वांवर आधारित स्थिर राजकीय वातावरण आणि बौद्धिक संपदेचे कायदेशीर संरक्षण ही प्रमुख कारणे नमूद करण्यात आली आहेत.

हेही वाचाः आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या

जपानमध्ये अनेक प्रमुख जागतिक खेळाडू कंपन्या आहेत, त्यामुळे इतर कंपन्यांसाठी ती जमेची बाजू आहे. आर्थिक स्थिरतेच्या बाबतीत जपान उत्कृष्ट असून, किंमत अन् खर्चाची पातळी वाजवी आहे. कार्यबलसुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, कमाईची क्षमता सकारात्मक आहे. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वाढलेला वापर वृद्ध लोकसंख्येशी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदतगार ठरत आहे. जपानमध्ये वेतन खूप स्पर्धात्मक आहे आणि जर्मनीच्या तुलनेत २० टक्के ते ३० टक्के कमी आहे, जे जपानला अधिक आकर्षक करते,” असेही ते म्हणाले. जर्मन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना जपानपेक्षा चीनमधील पदांवर बदली करून पाठवणे कठीण आहे, कारण अनेक कर्मचारी चीनमध्ये जाण्यास टाळाटाळ करतात. जपानमधील राहणीमानाची परिस्थिती अन् जपानमधील एकूण वातावरण अधिक आकर्षक आहे, विशेषत: ज्यांच्या कुटुंबात मुले आहेत, त्यांच्यासाठी ते फारच चांगले आहे, असंही शुअरमन सांगतात.