पाच वेळचा जगज्जेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने अमेरिकेचा ग्रँडमास्टर हान्स निमनवर, तो फसवणूक (चिटींग) करून सामने जिंकत असल्याचा आरोप केला होता. बुद्धिबळविश्वात या प्रकरणाची बरीच चर्चा रंगली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाला (फिडे) मध्यस्थी करून या प्रकरणाची चौकशी करावी लागली होती. अखेरीस ‘फिडे’च्या नैतिकता आणि शिस्तपालन आयोगाला निमनविरुद्ध सामन्यांदरम्यान फसवणुकीचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. उलट कार्लसनलाच दंड ठोठावण्यात आला. असे का झाले आणि हे नक्की प्रकरण काय याचा आढावा.

या प्रकरणाला सुरुवात कुठून झाली?

कार्लसनने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ज्युलियस बेअर जनरेशन चषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेदरम्यान कार्लसनने निमनविरुद्धचा सामना केवळ एक चाल खेळून सोडला होता. हा त्याचा या स्पर्धेतील एकमेव पराभव होता. त्यापूर्वी त्याच महिन्यात झालेल्या सिंकेफील्ड चषक स्पर्धेतून कार्लसनने अचानक माघार घेतली. या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत निमनकडून कार्लसनला पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी निमनने बहुधा फसवणूक करून डाव जिंकला आणि याला वैतागूनच कार्लसनने माघार घेतली, असा तर्क लावण्यात आला होता. त्यापूर्वीच्या काही ऑनलाइन स्पर्धांमध्ये निमनने गैरप्रकारांचा अवलंब केल्याचे आढळून आले होते आणि त्याला ताकीदही देण्यात आली होती.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
chess candidates 2024 nepomniachtchi beats vidit gujrathi
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेशची दुसऱ्या स्थानी घसरण’ विदितला नमवत नेपोम्नियाशी आघाडीवर; नाकामुराकडून प्रज्ञानंद पराभूत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी

हेही वाचा : विश्लेषण: आदिवासी जिल्ह्यंतील बालमृत्यूंचे प्रमाण घटत का नाही?

निमनवर आरोप करताना कार्लसन काय म्हणाला होता?

सिंकेफील्ड स्पर्धेतून अचानक माघार घेताना कार्लसनने काहीही स्पष्टीकरण दिले नव्हते. मात्र, नंतर पत्रकाद्वारे त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘निमनने फसवणूक करून सामने जिंकत असल्याचे यापूर्वी मान्य केले होते. मात्र, अलीकडच्या काळात त्याने अधिकाधिक फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्याने सदेह (ओव्हर द बोर्ड) बुद्धिबळ स्पर्धांमध्ये केलेली प्रगती शंका निर्माण करणारी आहे. सिंकेफील्ड स्पर्धेतील आमच्या सामन्यादरम्यान तो दडपणाखाली अजिबातच दिसला नाही. तसेच महत्त्वाच्या चालींच्या वेळी तो फार विचार करून खेळत आहे, असेही मला जाणवले नाही. त्याने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना मला पराभूत केले, जे केवळ काही खेळाडूंनाच शक्य आहे,’’ असे कार्लसन म्हणाला होता.

निमनची भूमिका काय होती?

निमनने काही ऑनलाइन बुद्धिबळ सामन्यांमध्ये फसवणूक केल्याचे मान्य केले होते, पण सदेह स्पर्धांमध्ये आपण कायमच प्रामाणिकपणे खेळ केल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच कोणतेही पुरावे न देता आपल्यावर केलेल्या आरोपांनंतर निमनने कार्लसन, त्याची कंपनी मॅग्नस समूह आणि इतरांकडून १० कोटी अमेरिकन डॉलरच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. या सर्व प्रकरणात बुद्धिबळ खेळाची प्रतिमा डागाळत असल्याचे जाणवल्याने अखेर ‘फिडे’ने मध्यस्ती केली होती.

हेही वाचा : “पोस्टाला कोणतंही पार्सल उघडून पाहण्याचा अधिकार”; वाचा वादग्रस्त पोस्ट ऑफिस विधेयक काय?

‘फिडे’च्या चौकशीतून काय समोर आले?

‘फिडे’च्या नैतिकता आणि शिस्तपालन आयोगाला निमनविरुद्ध सामन्यांदरम्यान फसवणुकीचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ‘फिडे’च्या तपास समितीने गेल्या तीन वर्षांतील १३ सदेह स्पर्धांमधील निमनच्या कामगिरीचा सांख्यिकीय आढावा घेतला, ज्यात सिंकेफील्ड स्पर्धेचाही समावेश होता. ‘‘आम्ही ज्या सामन्यांचा सांख्यिकीय आढावा घेतला, त्यात ग्रँडमास्टर निमनने काहीही गैर केल्याचे आढळले नाही. तसेच सिंकेफील्ड स्पर्धेतील त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला असता त्याने फसवणूक केल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. निमनची गेल्या काही वर्षांतील कामगिरी ही त्याच्या अपेक्षित खेळाच्या पातळीशी सुसंगत आहे,’’ असे ‘फिडे’च्या अहवालात नमूद करण्यात आले.

हेही वाचा : विश्लेषण: धोनीची ७ क्रमांकाची जर्सी बीसीसीआयकडून ‘निवृत्त’! म्हणजे काय? यापूर्वी असा मान कोणाला?

कार्लसनला दंड का ठोठावण्यात आला?

कार्लसन चारपैकी तीन आरोपांमध्ये दोषी आढळला नाही, असे ‘फिडे’ने स्पष्ट केले. मात्र, कोणत्याही ठोस कारणाशिवाय स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याला १० हजार युरोचा दंड ठोठावण्यात आला. ‘‘कार्लसनने उपस्थित केलेली शंका रास्त होती, पण निमनने सदेह स्पर्धांमध्ये फसवणूक केल्याचे कधीही म्हटले नव्हते. निमनने ऑनलाइन सामन्यांत फसवणूक केल्याचे यापूर्वी मान्य केले होते आणि ‘चेस डॉट कॉम’च्या अहवालातून अशीच काहीशी माहिती समोर आली होती. त्यामुळे कार्लसनला निमन सदेह स्पर्धांमध्येही फसवणूक करत असल्याचे वाटले. मात्र, कार्लसनने कोणतेही ठोस कारण न देता सिंकेफील्ड स्पर्धेतून माघार घेतली आणि प्रतिस्पर्ध्याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका असल्यास त्याने योग्य ते पाऊल उचलताना आयोजकांना याबाबतची माहिती दिली पाहिजे होती. कार्लसन विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू मानला जातो आणि त्याने अशा प्रकारे माघार घेतल्याने अन्य बुद्धिबळपटूंसमोर वाईट उदाहरण उभे राहते. त्यामुळे त्याला १० हजार युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे,’’ असे ‘फिडे’ने सांगितले.