सध्या पाकिस्तान आर्थिक, सामाजिक अस्थिरतेतून जात आहे. अशा स्थितीत तेथे अन्वर अल हक काकर हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार हाकत आहेत. देशात शातंतेत सार्वत्रिक निवडणुका घेण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र पाकिस्तामध्ये सध्या असलेली परिस्थिती पाहता ही निवडणूक वेळेवर घेणे शक्य आहे का? देशातील वेगवेगळे पक्ष काळजीवाहू सरकारवर टीका का करत आहेत? पीटीआय पक्षाची नेमकी भूमिका काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू या…

निवडणुकीची तारीख ८ फेब्रुवारी २०२४

अन्वर अल हक काकर यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून ९० दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घेणे अनिर्वाय आहे. त्यांनी ऑगस्ट महिन्यात काळजीवाहू पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता. काकर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्तानी निवडणूक आयोगाने ८ फेब्रुवारी २०२४ ही मतदानाची तारीख निश्चित केलेली आहे. मात्र सध्या पाकिस्तानसमोर आर्थिक अस्थिरता, राजकीय अस्थितरता, महागाई अशी अनेक संकट आ वासून उभी आहेत. त्यामुळे या देशात ठरल्याप्रमाणे वेळेवर निवडणूक होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

India response to Pakistan in the United Nations General Assembly
दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील! संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ajit Pawar demand to BJP regarding the post of Chief Minister print politics news
मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी
uttar pradesh bypoll
UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?
Jammu and Kashmir assembly elections
नंदनवनातील निवडणूक: जम्मू-काश्मीरमध्ये उद्या मतदान, १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक
j k assembly elections after 10 year likely to repeat ls 2024 turnout
Jammu And Kashmir Assembly Polls : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा रांगा लागतील!
jammu and kashmir polls 2024 bjp likely to get major seats in jammu
Jammu And Kashmir Assembly Polls: …तरीही जम्मूमध्ये मते भाजपलाच!
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू

सध्या इम्रान खान तुरुंगात

पाकिस्तान तहरिक ए इन्साफ अर्थात पीटीआय पक्षाचे सर्वेसर्वा आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तरुंगात आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचार तसेच अन्य आरोप आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून इम्रान खान तुरुंगात असल्यामुळे विद्यमान काळजीवाहू सरकारला या देशात पारदर्शकपणे निवडणुका घ्यायच्या आहेत का? असे विचारले जात आहे.

पाकिस्तामध्ये अनेक आघाड्यांवर अस्थिरता

इम्रान खान तुरुंगात असल्यामुळे येथे राजकीय अस्थिरता आहे. सध्याच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख काम हे सार्वत्रिक निवडणुका आयोजित करणे हे आहे. मात्र पारदर्शकपणे निवडणुका पार पडाव्यात यासाठी सध्याच्या काकर सरकारला अन्य अडचणींना, इम्रान खान यांना अटक केल्यामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेला सामोरे जावे लागत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी काकर यांनी प्रतिक्रिया दिली होती.

…तरी इम्रान खान यांची लोकप्रियता कायम

इम्रान खान सध्या तुरुंगात असले तरी ते सध्या सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पीटीआय पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांवर तसेच इम्रान खान यांच्या समर्थकांवर कारवाई करण्यात आली. असे असले तरी इम्रान खान यांची लोकप्रियता कायम आहे. इम्रान खान यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे अनेकजण सध्याच्या काळजीवाहू सरकारवर टीका करतात.

“सध्याचे सरकार अधिकारक्षेत्राच्या बाहेरचे काम करतंय”

राजकीय विश्लेषक तसेच अमेरिकेतील माजी पाकिस्तानी राजदूत मलिहा लोधी यांनी पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. “सध्याच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख काम सार्वत्रिक निवडणुका घेणे आहे आहे. मात्र सध्या हे सरकार त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेरचे काम करत आहे. काळजीवाहू सरकारला कोणताही मोठे निर्णय घेता येत नाही. याच कारणामुळे सध्याचे काळजीवाहू सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे,” असे त्या म्हणाल्या.

शासकीय अधिकारी देतात इम्रान खान यांना दोष

याबाबत मात्र शासकीय अधिकाऱ्यांकडून सारवासारव केली जाते. सध्या देश अनेक अडचणींतून जात आहे. सध्या या अडचणी दूर करणे गरजचे आहे. निवडणूक घेण्याआधी या अडचणी संपणे महत्त्वाचे आहे, असे या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. तसेच शासकीय अधिकारी आधीच्या इम्रान खान सरकारला जबाबदार धरताना दिसतात. सध्याची आर्थिक बिकट स्थिती इम्रान खान यांच्यामुळेच निर्माण झाली आहे, असे तेथील अधिकारी सांगतात.

“…म्हणून सरकार मोठे आर्थिक निर्णय घेत आहे”

सध्याचे काळजीवाहू सरकार मोठे आर्थिक निर्णय घेत आहे. यावर इस्लामाबाद येथील पत्रकार आस्मा शिराझी यांनी प्रतिक्रिया दिली. “याआधीच्या सरकारपेक्षा सध्याचे काळजीवाहू सरकार अधिक शक्तिशाली आहे. त्यामुळेच हे सरकार मोठे आर्थिक निर्णय घेत आहे,” असे त्या म्हणाल्या.

खान यांच्या पक्षावर कारवाई

तुरुंगात असले तरी इम्रान खान यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. याच कारणामुळे तुरुंगातून बाहेर येत इम्रान खान यांनी निवडणूक लढवल्यास ते सहज विजयी होतील. ते बहुमतात सरकार स्थापन करतील, अशी अनेकांना भीती आहे. मात्र इम्रान खान फेब्रुवारीमध्ये होणारी निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. खान यांच्याविरोधात एप्रिल २०२२ मध्ये अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर खान यांचे सरकार कोसळले होते. तेव्हापसून इम्रान खान तसेच त्यांचा पीटीआय हा पक्ष पारदर्शक पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी करतो आहे. पंतप्रधानपद गेल्यानंतर इम्रान खान यांना ५ ऑगस्ट २०२३ रोजी अटक करण्यात आली होती.

इम्रान खान आणि लष्करप्रमुख यांच्यात वाद

खान यांना यापूर्वी ९ मे २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. या अटकेदरम्यान त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर येत आंदोलनं केली होती. या आंदोलनात त्यांच्या समर्थकांनी सार्वजनिक मालमत्ता तसेच लष्करावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे इम्रान खान आणि विद्यमान लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर हे समोरासमोर आले होते.

“सध्या पीटीआयवर कारवाई केली जातेय”

इम्रान खान यांच्या अटकेवर खान यांचे आंतरराष्ट्रीय माध्यम सल्लागार झुल्फिकार बुखारी यांनी प्रतिक्रिया दिली. “सध्या पीटीआय या सर्वांत मोठ्या पक्षावर कारवाई केली जात आहे. या पक्षावर कारवाई करणे म्हणजे एकाप्रकारे निवडणुकीपूर्वी अस्थिरता निर्माण करण्यासारखेच आहे. आगामी निवडणुका या पारदर्शकपणे होणार नाहीत हे स्पष्टच आहे,” असे झुल्फिकार बुखारी म्हणाले.

“हल्ल्यात समावेश नसलेल्यांची सुटका करावी”

पीटीआयवर होत असलेल्या कारवाईवर आस्मा शिराझी यांनी भाष्य केले. “सध्या पीटीआय या पक्षाचे राजकीय स्थान कमी होत चालले आहे. त्यामुळे ९ मे रोजीच्या हल्ल्यात समावेश नसलेल्यांची सुटका करायला हवी किंवा त्यांना पारदर्शकपणे न्यायालयीन लढा लढण्याची संधी दिली गेली पाहिजे,” असे आस्मा म्हणाल्या.

पाकिस्तानमध्ये पारदर्शक निवडणूक शक्य आहे का?

पाकिस्तानमधील राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार सध्या काळजीवाहू सरकार ज्या उपायोजना राबवत आहे, त्याने काहीही फरक पडणार नाही. पारदर्शक सार्वत्रिक निवडणूक झाली तरच येथे आर्थिक तसेच अन्य बाबींमध्ये स्थिरता येऊ शकते. “निवडणुकीत जर सर्वसमावेशकता आणि विश्वासार्हता नसेल तर पाकिस्तानमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. पारदर्शकपणे निवडणुका घेणे हे काळजीवाहू सरकारची प्रमुख जबाबदारी आहे,” असे राजकीय विश्लेषक मलिहा लोधी यांनी सांगितले. “सध्या देशातील दोन प्रमुख पक्षांकडून निवडणुकीसंदर्भात आक्षेप व्यक्त करण्यात येत आहेत. ही चांगली बाब नाही,” असेही त्या म्हणाल्या.

सरकारने सर्व आरोप फेटाळले

दरम्यान, सध्याच्या काळजीवाहू सरकारने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री मुर्तझा सोलांगी यांनी निवडणुकीआधी हेराफेरी होत असल्याचा आरोपाला कोणताही आधार नाही, असे म्हटले आहे.