12 December 2019

News Flash

FIFA World Cup 2018 EGY vs URU : निर्णायक क्षणी गोल करत उरुग्वेची इजिप्तवर मात

FIFA World Cup 2018 EGY vs URU : उरुग्वेने अंतिम काही क्षणात गोल करत इजिप्तवर १-० अशी मात केली.

८९ व्या मिनिटाला गोल करणारा जोस जिमेन्झ

FIFA World Cup 2018 EGY vs URU : फिफा विश्वचषक २०१८ स्पर्धेत आज स्पर्धेचा दुसरा सामना उरुग्वे आणि इजिप्त या दोन संघांमध्ये रंगला. क्रमवारीत १४व्या स्थानी असलेला उरुग्वे हा इजिप्तला सहज नमवेल, असे फुटबॉलप्रेमींनी गृहीतच धरले होते. स्पर्धेचं सलामीचा सामना ज्या पद्धतीने एकतर्फी झाला, तसाच हा सामना होणार, अशी फुटबॉलप्रेमींची आणि उरुग्वेच्या फुटबॉलचाहत्यांची होती. मात्र या सामन्यात इजिप्तच्या झुंझार वृत्तीचे दर्शन घडले. पण स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सलाहची कमतरता इजिप्तला चांगलीच जाणवली.

हा सामना उरुग्वेने अंतिम काही क्षणात गोल करत जिंकला. पण, त्यांना इजिप्तवर केवळ १-० अशी मात करता आली. उरुग्वेच्या जोस जिमेन्झने सामन्याच्या ८९ व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे हा सामना टायब्रेकरपर्यंत नेण्याची नामुष्की ईजिप्तवर ओढवली नाही. उरुग्वेने या विजयाबरोबर स्पर्धेत आपले खाते उघडले. मात्र, ज्या मोठ्या विजयाची अपेक्षा त्यांना होती. तसे काही इजिप्तने घडू दिले नाही.

 

क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या उरुग्वेला विजयासाठी ४५व्या स्थानावरील इजिप्तने चांगलेच झुंझवले. परंतु, सामन्याच्या अंतिम टप्प्यात उरुग्वेला १-० ने आघाडी घेता आली आणि त्यांनी आपल्या नावाला साजेसा खेळ केला.

म्हणून दोघांचे ३ गुण असूनही रशिया गटात अव्वल; तर उरुग्वे दुसऱ्या स्थानी

दरम्यान, या विजयामुळे अ गटात उरुग्वेला ३ गुण मिळाले. मात्र उरुग्वेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. यजमान रशियालादेखील कालचा सामना जिंकल्यानंतर ३ गुण मिळाले. दोघांचेही गुण सामना असले तरीही उरुग्वेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. कारण राहिल्याने सौदी अरेबियाला पराभूत केले त्या सामन्यात त्यांनी सौदी अरेबियाविरुद्ध ५ गोल केले होते. पण उरुग्वेला मात्र केवळ १ गोल करताआला . त्यामुळे GD (गोल डिफरन्स) नुसार रशिया अव्वल स्थानी कायम आहे. तर, उरुग्वे दुसऱ्या स्थानी आहे.

First Published on June 15, 2018 7:46 pm

Web Title: fifa world cup 2018 egy vs uru uruguay won 1 0
Just Now!
X