सारांस्क : साखळीतील तिसऱ्या सामन्यापूर्वीच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या संघांमध्ये पनामा आणि टय़ुनिशिया या संघांचा क्रमांक लागतो. त्यामुळेच गुरुवारी होणाऱ्या अखेरच्या लढतीत विजय मिळवून सन्मान टिकवण्यासाठी पनामा आणि टय़ुनिशिया एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या लढतीत साहजिकच टय़ुनिशियाचे पारडे जड असून, विश्वचषकासाठी पहिल्यांदाच पात्र ठरलेल्या पनामा त्यांना धक्का देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

आक्रमणपटू वाहबी खाजरी आणि मध्यरक्षक फर्जानी सॅसी यांच्यावर टय़ुनिशियाची मदार आहे. दुसरीकडे पनामातर्फे विश्वचषकातील पहिला गोल करणारा फेलिप बेलॉयवर पनामाची भिस्त आहे.

सामना क्र. ४७

गट ग

टय़ुनिशिया वि. पनामा

स्थळ : मोर्दोव्हिया एरिना

वेळ : रात्री ११ :३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स

गट ग

साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यापूर्वीच ‘ग’ गटाचे चित्र स्पष्ट झाले आहे. दोन सामन्यांतून दोन विजयांनिशी इंग्लंड या गटात पहिल्या क्रमांकावर विराजमान असून तितक्याच विजयासह बेल्जियम सहा गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र विश्वचषकातील यापूर्वीच्या दोन सामन्यांत इंग्लंडने बेल्जियमवर सरशी साधली असल्यामुळे त्यांना गटात प्रथम स्थान देण्यात आले आहे. टय़ुनिशिया आणि पनामा यांचे आव्हान सलग दोन पराभवांमुळे संपुष्टात आले आहे.