FIFA WC 2018 3rd Place BEL vs ENG : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात बेल्जीयमने इंग्लंडला पराभूत करत स्पर्धेचा शेवट गोड केला. बेल्जीयमनी पूर्वार्धात १ आणि उत्तरार्धात १ असे २ गोल केले आणि इंग्लंडला २-० असे पराभूत केले. इंग्लंडला या स्पर्धेतही आपल्यावर असलेला चोकर्सचा शिक्का पुसण्यात अपयश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याच्या सुरुवातीपासून बेल्जियमने आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. त्याचा फायदा त्यांना सामन्याच्या ४थ्या मिनिटाला मिळाला. मधल्या फळीतील नॅसेर शॅडली याने पास केलेल्या चेंडूवर म्युनियरने अप्रतिम गोल केला. या गोलमुळे बेल्जियमला सामन्याच्या प्रारंभी आघाडी मिळाली आणि मध्यंतरापर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवली.

उत्तरार्धात इंग्लंडला गोल बरोबरी करणे आवश्यक असल्याने इंग्लंडने बेल्जीयमच्या गोलपोस्ट वर आक्रमणे करण्याचे प्रयत्न सुरु केले. पण त्याचा काहीही उपयोग इंग्लंडला होऊ शकला नाही. याउलट बेल्जीयमकडून एडन हॅजार्डने ८२व्या आणखी एक गोल केला. त्यानंतर मात्र गोल संख्येत कोणत्याही संघाकडून भर घालण्यात आली नाही.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2 18 3rd place bel vs eng fifa world cup 2 18 bel vs eng belgium beat england 2
First published on: 14-07-2018 at 21:32 IST