FIFA World Cup 2018 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा कायम आपल्या क्रीडाप्रेमासाठी चर्चेत असतो. नुकतेच त्याने टेनिसपटू रॉजर फेडरर याचे टेनिस सामन्यातील क्रिकेट शॉट साठी कौतुक केले. त्यानंतर आता सचिनने आज होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात एका संघाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आज उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया असा सामना रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेत इंग्लंडचा संघ हा ‘अंडरडॉग’ समजला जात होता. मात्र त्यांनी दमदार खेळ करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. या इंग्लंडच्या संघाला आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचाही पाठिंबा मिळाला आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये ”यावेळी माझा पाठिंबा इंग्लडच्या संघाला आहे. कम ऑन इंग्लंड!” असा संदेश देत इंग्लडच्या संघाला चिअर करताना सचिन दिसत आहे. या व्हिडिओत सचिनने आपल्यातील फुटबॉलरचे गुणदेखील दाखवले आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 england croatia sachin supports england
First published on: 11-07-2018 at 11:21 IST