सौदी अरेबियाच्या संघामागे लागलेलं शुक्लकाष्ट काही केल्या कमी होण्याचं चिन्ह नाहीये. सलामीच्या सामन्यात यजमान रशियाविरुद्ध ५-० अशी हार पत्करावी लागल्यानंतर, फिफा विश्वचषकातलं सौदी अरेबियाचं आव्हान आता डळमळीत झालं आहे. त्यातचं सौदी अरेबियाच्या खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या पंखाला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाने टेकऑफ केल्यानंतर हा प्रकार घडला, त्यामुळे काही क्षणासाठी सर्वजण धास्तावले होते. मात्र काही वेळानंतर विमानाचं सुखरुप लँडींग करुन सर्व खेळाडूंना बाहेर काढण्यात आलेलं आहे. सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अपघातानंतर सौदी अरेबिया फुटबॉल फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, उरुग्वेविरुद्ध सामन्याआधी हा प्रकार घडला आहे. सर्व खेळाडूंना या अपघातानंतर सुरक्षितरित्या रोस्तोव ऑन डॉन या ठिकाणी आणण्यात आलं.

काही प्रसारमाध्यमांनी हा प्रकार पक्ष्याची विमानाच्या पंखाला धडक लागल्यामुळे झाल्याचं म्हटलंय. मात्र चौकशीअंती हा प्रकार तांत्रिक अडचणींमुळेच झाल्याचं समोर आलं आहे.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 saudi arabian team lands safely after airplane catches fire watch video
First published on: 19-06-2018 at 18:14 IST