Ganesh Chaturthi Fashion Trends Outfits for Women: गणेश चतुर्थी उद्यावर येऊन ठेपली आहे आणि भारतात सगळीकडेच या सणाचं उत्साहाचं वातावरण दिसू लागलंय. १० दिवसांचा गणेशोत्सव हा केवळ गणपती बाप्पांवरील श्रद्धा दाखवण्यासाठी नसून कुटुंब आणि मित्र एकत्रपरिवारासोबत एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा प्रसंग असतो. या काळात भक्त घरी गणपतीची मूर्ती आणतात, तसंच विविध ठिकाणी दर्शनाला जातात, मोदकासारखे पारंपरिक पदार्थ बनवतात आणि नटून थटून उत्सवात सहभागी होतात.

नेमका उद्यावर गणेशोत्सव आलाय आणि या स्त्रियांचं अजूनही काही ठरतंच नाही. या गणेशोत्सवात नेमकं काय घालायचं याचं गोंधळात आपल्या काही बहिणी आणि मैत्रिणी आहेत. सध्याचा ट्रेंड फॉलो तर करायचाय पण वेळ खूप कमी आहे. यासाठी आपण आज असे काही सेलिब्रिटी इन्स्पायर्ड लूक्स पाहणार आहोत जे तुम्ही ट्राय करू शकता आणि सगळ्यात हटके दिसू शकता.

साडी (Saree for Ganeshotsav)

साडी हा भारतीय महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कोणताही सणवार असो, साडीची फॅशन कधीच जुनी होऊ शकत नाही. गणेशोत्सवाच्या या भक्तीमय वातावरणात तुम्ही नक्कीच साडीची निवड करू शकता.

तुमच्या संस्कृतीचा सन्मान करा आणि स्टेटमेंट लूकसाठी पारंपरिक साडी नेसू शकता. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने हाताने विणलेली केशरी आणि गुलाबी पैठणी साडी नेसली आहे, ही सहावारी साडी आहे जी तिने पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी पद्धतीत नेसलेली आहे.

(Photo Courtesy- @aliaabhatt)

पारंपारिक सूट (Traditional Suit)

साडीसोबतच पारंपरिक सूटही सणासाठी उत्तम पर्याय ठरतो. करिना कपूर खानने लाल रंगाचा सूट परिधान केला आहे, ज्यासोबत बांधणीचा दुपट्टा आहे, जो एक रिच लूक देतो.

(Photo Courtesy- @kareenakapoorkhan)

अनारकली ड्रेस (Anarkali Dress)

अनारकली हा एक टाइमलेस ड्रेस आहे, जो कित्येक वर्षे ट्रेंडमध्ये असूनही तितकाच शोभून दिसतो. जर तुम्ही अजूनही गोंधळात असाल तर हा पर्याय तुमच्यासाठीच आहे. सध्या पेस्टल रंगाचा ट्रेंड असल्याने तुम्ही तसे अनारकली सूट निवडू शकता. वर्क असलेल्या अनारकलीवर नेकलेस परिधान न करता हेवी इयरिंग्सची निवड केली तर लूक परिपूर्ण दिसण्यास मदत होईल.

(Photo Courtesy- @therealkarismakapoor)

या दोन्ही लूकमध्ये करिश्मा कपूरने सुंदर भरतकाम केलेले आणि सजवलेले अनारकली कुर्ते घातले आहेत आणि त्यासोबत खास दागिन्यांनी लूक पूर्ण केला आहे.

शरारा सेट (Sharara Set)

अनारकली सारखाच शराराचा ट्रेंड कधीही जुना होत नाही. तुम्ही ट्रेंडी शरारा सेट परिधान करून तुमचा लूक हटके करू शकता. तृप्ती डिमरीने लेव्हेंडर रंगाचा शरारा पॅन्ट आणि शॉर्ट कुर्ती असलेला ड्रेस घातला आहे, ज्यात ती खूप स्टायलिश दिसते.

(Photo Courtesy- @tripti_dimri)

इंडो-वेस्टर्न, फ्यूजन (Indo-Western, Fusion)

आजकाल पारंपरिक पोशाखासह त्याला मॉडर्न टच देऊन स्त्रिया आधुनिक लूकला प्राधान्य देतात. सध्या फ्यूजन ट्रेंडिंग आहे, त्यामुळे अनेक सेलिब्रिटीज सणासुदीत अशा मॉडर्न येट ट्रेडिशनल पोशाखात दिसतात. यात क्रॉप टॉप आणि त्याखाली प्लाझो किंवा धोती स्कर्ट परिधान करून हा लूक क्रिएट करू शकता. येथे मृणाल ठाकूरने फुलांच्या डिझाइनचा लाल रंगाचा फ्युजन ड्रेस घातला आहे आणि ती खूप सुंदर दिसतेय.

(Photo Courtesy- @mrunalthakur)