श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त आज अर्थवशीर्ष पठण करण्यात आले. पहाटे झालेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये उत्सव मंडपासमोर ३१ हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केले. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाच ३५ वं वर्ष आहे.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगांनी भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करत महिलांनी गणरायाला अभिवादन केले.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात

गणेश नामाच्या जयघोषाने महिलांनी केलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामुळे पुणेकरांची आजची पहाट मंगलमय झाली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यावेळी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव आदी मान्यवरही उपस्थित होते.