गणेशोत्सवाच्या या उत्साहपूर्ण वातावरणात सर्वजण रंगलेले असतानाच कलाकारही यात सामील झाले आहेत. याच उत्साही वातावरणात प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. त्यासोबतच बाप्पाच्या आरतीतही ते सहभागी झाले.

नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अभिनेता संजय दत्तनेही हजेरी लावली. संपूर्ण मुंबईचं आणि अनेकांचच आराध्य दैवत असणाऱ्या लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्या दिवसापासूनच भक्तांची तुडूंब गर्दी पाहायला मिळतेय.
दरम्यान, आतापर्यंत बिग बी अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, सचिन तेंडुलकर यांनी राजाचं दर्शन घेतलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सवाची धूम पाहता बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी वाढणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला जातोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजाच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणावर देणगीसुद्धा जमा होत आहे. राजावर मनोभावे श्रद्धा असणाऱ्या एका भाविकाने ‘लालबागचा राजा’च्या चरणी तब्बल १ किलो १०१ ग्रॅम वजनाच्या गणपती आणि लक्ष्मीच्या भरीव सोन्याच्या मूर्ती अर्पण केल्या.