गुढी पाडवा जसजसा जवळ येत आहे तसा उत्साहही वाढत आहे. नवीन वर्ष, नवे संकल्प, आप्तेष्टांच्या गाठीभेटी, शोभा यात्रा, गोडाचे जेवण हे सगळं आठवलं की कधी एकदा तो दिवस येतोय असंच होतं. अभिनेत्री प्रिया मराठेच्याबाबतीतही काहीसे असेच झाले आहे. यावर्षी गुढी पाडव्याचे तिचे काय संकल्प आहेत ते तिच्याचकडून जाणून घेऊ..

मी आता माझ्या कुटुंबासोबत राहत नाही त्यामुळे मी अशा दिवसांची आतुरतेने वाट बघत असते, जेव्हा आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र भेटत. प्रत्येकजण आपल्या कामात व्यग्र असल्यामुळे प्रत्येकवेळा सगळ्यांनाच भेटणं शक्य होतं असं नाही. पण सणासुदीच्या दिवसांत तरी आम्ही ठरवून भेटण्याचा प्लॅन बनवतो. माझ्या सासरी पुण्यालाही गुढी उभारली जाते. पण कामाच्या व्यापामुळे प्रत्येकवर्षी तिथे जायला मिळतेच असे नाही. त्यातही आम्ही एखादा दिवस जरी वेळ मिळाला तर सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत येतो. पण, यावर्षी मी गुढी पाडव्याला ठाण्याला जाणार आहे. माझ्या माहेरी अगदी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली जाते आणि नंतर सगळ्यांना कडुलिंबाचं पानं खावं लागतं. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आमच्याकडे श्रीखंड पुरीचा बेत असणार आहे.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Benefits of Millets
नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणती बाजरी खावी? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?

ठाण्यातली शोभा यात्राही बघण्यासारख्या असतात. विविधं रांगोळी, फुलांनी सजवलेले पथकाचे ट्रक, लेझीम या सर्व गोष्टी डोळ्यांचे पारडे फिरवणारे असतात. फार वर्षांपूर्वी मीही शोभायात्रेमध्ये सहभागी व्हायचे. पण आता ते शक्य होत नाही. आता फक्त शोभा यात्रा बघायलाच जातो. यावर्षीही  माझा शोभायात्रा बघायला जाण्याचा बेत आहे. नववर्षाचा संकल्प असा काही वेगळा नाही. पण हे येणारं वर्ष माझ्या मित्र-मंडळी, परिवार सर्वांचेच आरोग्य चांगले राहावे. चांगले विचार मनात यावे, भरपूर काम करायला मिळावं अशीच माझी इच्छा आहे.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर