जुल महिना म्हणजे नवलाई! पाऊस सृष्टीला नवचतन्य बहाल करतो आणि इथे कॉलेजही नव्याने बहरू लागतात. आत्तापर्यंत मोठ्ठी सुट्टी उपभोगून कंटाळलेली दहावी पास मित्रमंडळी तर खास खुशीत असतात. कारण शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मुक्त जगात ते प्रवेश करणार असतात. आपण हवे त्या लेक्चरला बसायचे आणि हवे तेव्हा बंक मारायचा. मूड असेल तर अभ्यास करायचा आणि नसेल तर जायचे एखाद्या सिनेमाला. त्याशिवाय व्हॅलेन्टाइन डे, साडी डे, टाय डे, चॉकलेट डे असे कितीतरी ‘डे’ असल्याने कॉलेजमध्ये मज्जाच मजा!  
कॉलेज म्हणजे स्वातंत्र्य, धमाल, उत्सव.. असे एकांगी चित्र रंगवणारी मुले समस्या निर्माण करतात. बेफाम वागणे ही अपरिहार्यता आहे, असेच त्यांना वाटत राहतं. त्यामुळे १०वीमध्ये ८०-८५ टक्के मिळवलेली मुले ११वीमध्ये नापास होतात, तेव्हा त्यांच्या पालकांना मोठा धक्का बसतो.
कॉलेजमध्ये काही मुले बेफाम वागत असली तरी काही मुलांना महाविद्यालयाच्या जगात प्रवेश करण्याची मनोमन भीती वाटत असते. रॅिगगबद्दल वृत्तपत्रांत काहीबाही वाचलेले असते. मग हे आपल्याबाबत तर होणार नाही ना अशी धाकधूक असते. मराठी माध्यमात शालेय शिक्षण घेतलेल्या मुलांना इंग्रजी भाषेची भीती वाटत असते. साध्या आणि बुजऱ्या मुलांना फॅशन, डेज वगरे आपल्याला जमेल का, आपल्याला कुणी हसेल का, आपली चेष्टा करेल का, असे नेहमीच वाटत असते. अशा मुलांना स्वत:बद्दल एकप्रकारचा न्यूनगंड वाटत असतो. कोणाशी बोलावे, कोणाला विचारावे हे न समजल्यामुळे ती बिचारी गोंधळून जातात. ही भीती ते व्यक्त करत नाहीत, त्यामुळे ती एकलकोंडी होतात, स्वत:ला अलिप्त ठेवतात, सतत अतिसतर्क राहतात. मग इतर मुले त्यांना लक्ष्य करतात आणि त्यांची भीती सत्यात उतरल्याने ही मुले अधिकच कोषात जातात.
दोन्ही टोकाचे असत्य चित्र मुलांनी रंगवू नये यासाठी संवाद आवश्यक आहे. मजेला मर्यादेचे आणि सुरक्षिततेचे कुंपण नक्कीच घालायला हवं. कारण स्वातंत्र्य हे जबाबदारीशिवाय अपूर्ण आहे. आणि ही जबाबदारीची जाणीव पालक म्हणून आपण मुलांना करून द्यायला हवी. स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता लहानपणापासून हळूहळू निर्माण करायला हवी. बाहेर जाताना कोणते कपडे घालायचे इथपासून ते कोणत्या महाविद्यालयाला आणि कोणत्या विषयाला प्रवेश घ्यायचा हेच आपण त्यांना सांगत राहिलो तर एक दिवस अचानक आपण त्याला, ‘‘आता तू मोठा झाला आहे, तुझे निर्णय तू घे,’’ असे सांगणे चुकीचे ठरेल. तू स्वतंत्रपणे निर्णय घे. चुकला तर मी तुझ्या पाठीशी आहेच, असा विश्वास मुलांना द्या. आपला आश्वासक हात मदतीसाठी सदैव मागे आहे, हा विश्वास त्यांना वाटायला हवा. परंतु आपले मत त्यांच्यावर लादण्याचा अट्टहास नको. त्यांनासुद्धा अनुभवातून शिकू द्यावे. मित्रांचा प्रभाव या वयात साहजिकच सर्वाधिक असेल. त्यामुळे त्यांच्या मित्रांचा तिरस्कार न करता आपुलकी दाखवली तर आपण आणि मुले यांमधील भावनिक अंतर नक्की कमी होईल आणि मुलेसुद्धा योग्य मित्रांची पारख करायला शिकतील.
मुलांनीही नवीन मित्र जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा, ज्यायोगे ते आपल्या वयाच्या मुलांमध्ये रमू शकतील आणि कठीण प्रसंगी मदत मागू शकतील. रॅिगगसारख्या प्रसंगी शिक्षकांची आणि प्राचार्याची मदत मागायला काहीच हरकत नाही. महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये, स्पर्धामध्ये सहभागी करून घेण्यासाठी स्वत:ला शोधायला हवे. या स्पर्धामध्ये केवळ जिंकणे महत्त्वाचे नाही तर सहकार्य, सभाधीटपणा, चातुर्य, नियोजनक्षमता असे गुण वाढीस लागण्यासाठी हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे.
अमुक व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी या ओळखीपेक्षा मुलांना आता स्वत:ची स्वतंत्र ओळख हवी आहे आणि ती त्यांच्या विकासासाठी आवश्यकच आहे. स्वातंत्र्य आणि जबाबदारी याचा मेळ साधला तर कॉलेजचा हा अनुभव आपल्याला किती समृद्ध करेल आणि मग शाळेतल्या त्या सुरवंटाचं फुलपाखरू झाल्याशिवाय राहणार नाही.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
10 th Exam
दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…