काही जणांना राग फार येतो. पटकन चिडून ओरडणं, आपलं म्हणणे मांडताना इतरांच्या अंगावर धावून जाणं या व्यक्तींसाठी रोजची गोष्ट असू शकते. पण असा स्वभाव जसा त्या व्यक्तीचं नुकसान करु शकतो, तसंच तो त्याच्या प्रियजनांनाही दुखावणारा असतो. काय बरं करावं अशा व्यक्तींनी?..
प्रश्न- मी ३२ वर्षांचा आहे. मला राग पटकन येतो. लहानपणीच्या खेळात सुद्धा छोटी-छोटी भांडणे झाली तरी मी खूप चिडायचो, मित्रांच्या अंगावर धावून जायचो. पण माझा हा स्वभाव नंतर सुद्धा कायम राहिला. आईवडील, शाळा, कॉलेजमधील शिक्षक यांच्याशीही चढेल आवाजात हुज्जत घालण्यापर्यंत माझी मजल गेली आहे. मुद्दाम कुणाचा अपमान करण्याची माझी इच्छा नसते, पण एखादी गोष्ट पटली नाही आणि समोरचा ती पटवून घेऊ इच्छित नसेल की माझा आवाज चढू लागतोच! माझे नुकतेच ‘अ‍ॅरेंज मॅरेज’ झाले आहे. परवा घरातल्या कुठल्यातरी शुल्लक गोष्टीवरुन पत्नीचे आणि माझे मतभेद झाले आणि मी चिडून मोठमोठ्याने ओरडून तिच्याशी भांडलो. माझे ते रुप पत्नीला पूर्णच नवीन होते, ती बिचारी रडायलाच लागली! नंतर मला स्वत:ची फार लाज वाटली. माझे हा स्वभाव चुकीचा आहे हे मलाही कळते, पण त्याला उपाय काय?
उत्तर- मला खूपच छान वाटले तुमचा प्रश्न वाचून, कारण ‘माझा स्वभाव चुकीचा आहे, हे मलाही कळतंय’, हे तुमचं भरतवाक्य! सगळे रुग्ण तुमच्यासारखे असतील, तर आमचं काम किती सोपं होईल! अर्थात, ही जादू तुमचं जे प्रेम तुमच्या बायकोवर आहे, त्यामुळे झालीय असं दिसतंय, म्हणून आधी तिचे आभार मानू या. ती घाबरून रडू लागल्यावर तुम्हाला जी जाणीव झाली, अन् तुम्ही एकदम भानावर आल्यासारखं सल्ला घ्यायचं धाडस केलंत (जे ३२ वष्रे तुम्ही केलं नव्हतं), म्हणजे तुमचं तिच्यावर प्रेम आहे, हे महत्वाचं. त्यामुळं पहिला उपाय म्हणजे तिला सांभाळा. तुमच्या बरं होण्याच्या इच्छेच्या माध्यमातून तुमचा निरोगी भविष्याशी असलेला तो पूल आहे. तिला पण या प्रक्रियेत सामावून घेऊन नियमितपणे डॉक्टराना भेटत राहा. तुमच्यातला विश्वास टिकवून वाढवायचं काम ते छान करतील.
तुम्हाला उत्तम जाणीव आहे की दोष इतरांचा नसून आपला स्वभाव बदलायला हवाय. स्वभावावर काम करायला वेळ लागतो, हे पण लक्षात ठेवायला हवं. पण निराश होऊ नका. औषधांनी अन् योग्य सल्ल्यानं तुम्हाला भरपूर चांगला फरक थोड्याच दिवसात अनुभवाला येईल.
कुठल्याही भांडणात आपलाच विजय झाला पाहिजे, असं वाटणं, हे दृष्टीकोन खुला नसल्याचं निदर्शक असू शकतं. वयाबरोबर यात सुधारणा व्हायला हवी, ही तुमची अपेक्षा बरोबर असेल, पण ती सुधारणा आपोआप होत नाही. दुसऱ्याच्या चष्म्यातून एखाद्या विषयाकडे मोकळेपणाने बघून जरूर तिथे स्वतत बदल घडवायचा आपला स्वभाव नसू शकेल, पण आपलं म्हणणं दुसऱ्याला पटलंच पाहिजे, मग ती व्यक्ती अधिकारानं मोठी असली तरी, ही िहसाच म्हणायची की! ‘मुद्दाम कुणाचा अपमान करायची माझी इच्छा नसते’, हे सारखं स्वतला अन इतरांनाही स्पष्टपणे सांगायला हवे. नंतर आपल्याला स्वतची फार लाज वाटते, ही गोष्ट पण एका बाजूने आपली जाणीव चांगली आहे, हे दाखवत असेल, तरी असं वरचेवर होण्यानं तुमचा आत्मविश्वासही कमी होतो, अन् लोकांच्या मनातला तुमच्याबद्दलचा विश्वासही. म्हणून औषध घेणं आवश्यक आहे.
आता थोडं थिअरीबद्दल. मनातली भावना ही जैविक एनर्जी आहे. ती योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या पद्धतीनं अन् योग्य त्या वेळीच व्यक्त व्हायला हवी. म्हणजेच ती चांगली ‘चॅनलाईझ’ झाली पाहिजे. गॅस सििलडरचा स्फोट होउन उपयोग नाही, उलट ते घातकच ठरेल. पण योग्य उपयोग केला तर महिनोन् महिने तुमचा स्वयंपाक होईल. यालाच भावनिक बुद्धिमत्ता म्हणू या?
राग ही मुळात विधायक भावना आहे. इतरांच्या वागण्यात काय बदल व्हायला हवा, हे तुमचं मत त्यातून व्यक्त होत असतं. त्या मतावर दुसऱ्याला विचार
करून स्वतचं म्हणणं मांडता यायला हवं. तेवढी मुभा तुम्हाला त्याला देता यायला हवी. मग जर तुम्हाला पटलं की त्याचंही बरोबर आहे, तर तुम्हाला मोठ्या मनानं ते कबूलही करता यायला हवं. आक्रमक न होता, किंवा दुसऱ्याचा द्वेष-तिरस्कार न करता स्वतच्या भावना अन् गरजा व्यक्त करता आल्या, तर हा मोकळेपणा, स्पष्टवक्तेपणा म्हणता येईल. विवेकपूर्ण रागाचं इंधन वापरून तुमची गाडी सर्वदूर तुम्हाला घेऊन जाईल, नाहीतर स्वतचा अन दुसऱ्याचाही कपाळमोक्ष होऊ शकतो, हे ध्यानातच ठेवलं पाहिजे. मला तर कित्येकदा असं जाणवतं की, एक-दुसऱ्यावरचा राग अर्निबधपणे व्यक्त
होत गेला, तर या जगात अणुबॉम्बची गरजच काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

-डॉ. वासुदेव परळीकर
paralikarv2010@gmail.com

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on anger
First published on: 31-10-2015 at 03:52 IST