आरोग्यासाठी फळे ही सर्वात उत्तम हे आता सर्वानीच मान्य केले आहे. आंबा, सफरचंद, संत्री, केळी, किलगड अशा आपल्याकडच्या फळांचे गुण सर्वसाधारणपणे माहिती असतात. मात्र गेल्या दोनेक वर्षांत थायलंड- मलेशिया-चीनवरून येत असलेल्या विदेशी फळांनी बाजारात लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. ही फळे कोणी खावी, कोणी खाऊ नये याविषयी अनेकांच्या मनात शंका असतात. त्यांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किवी
हा मूळचा चीनचा रहिवासी. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी किवीच्या तपकिरी रंगाशी साम्य असल्याने या फळाचे नाव किवी ठेवण्यात आले. न्यूझीलंड, फ्रान्स, इटली, जपान व अमेरिकेत जास्त लागवड होते. आता भारतातही उत्तर व ईशान्येकडील भारतातील राज्यात लागवड करून निर्यातही केली जाते. साधारणत ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किवीचा हंगाम असतो.
हिरव्या रंगाच्या किवीला थोडेसे गोड, आंबट, आम्लयुक्त अशी मजेशीर चव लागते. हे फळ छोटे आणि अंडाकृती असते. त्वचा अस्पष्ट तपकिरी रंगी आणि अर्धपारदर्शक असते. आतून हिरवट द्रव असलेल्या गरामध्ये पांढऱ्या पेशींची जुळवाजुळव आढळते व काळ्या रंगाच्या खाण्यायोग्य बिया असतात.  
कोणी खावे ?
’किवीमध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे व शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम करते, तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर  टाकण्यास मदत करते.  संधिवात , आमवात, दमा यासारख्या रोगांवर किवी हे फळ गुणकारी ठरते . ह्या फळामध्ये तंतूचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेहींसाठीही उपयोगी ठरते.
’किवीमध्ये नसíगकरित्या रक्त पातळ कमी करण्याचे गुणधर्म असल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्या, तसेच हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे.
’पाणी व पोटॅशियम अधिक असल्याने लघवीच्या जागेवर खाज येत असल्यास किवा जळजळ होत असल्यास किवी खाल्ल्याने  फायदा होतो.
’किवीत ‘के’ जीवनसत्त्व असल्याने फळाचा गर एखाद्या चटका लागलेल्या भागावर लावल्यास जखम लवकर भरून येते. पचन नीट होण्यास हे फळ मदत करते
कोणी खाऊ नये ?
पित्ताशय व मूत्रपिंडांशी संबंधित आजार असलेल्यांनी फळ खाणे टाळावे. काही लोकांना किवीची अ‍ॅलर्जी असू शकते. तोंडाला खाज येते.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of fruit diet
First published on: 18-04-2015 at 01:17 IST