आपले दात चांगले, तर आपले आरोग्य चांगले! दातांची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. पण बहुधा आपण दांतांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. डॉक्टरकडे न जाता बहुधा दातांची दुखणी अंगावरच काढली जातात. दातांचे दुखणे नको आणि औषधोपचार नकोच नको असे वाटते. पण दंतोजींकडे दुर्लक्ष कराल, तर इतर अनेक आजारांना निमंत्रण द्याल. त्यामुळे दातांचे आरोग्य महत्त्वाचे असते.
दातांचे ब्लीचिंग
दातांच्या ब्लीचिंगच्या सर्वसाधारणपणे दोन पद्धती आहेत-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोल्ड ब्लीचिंग
यात दाताचा मोल्ड तयार करून घेतला जातो आणि त्या साहाय्याने एक विशेष ब्लीचिंग ट्रे तयार केला जातो. दाताचा हा ब्लीचिंग ट्रे वापरून घरच्या घरीदेखील दातांचा रंग अधिक पांढरा करता येणे शक्य होते. मात्र या पद्धतीत एनॅमलमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन दात संवेदनशील बनण्याची शक्यता अधिक असते. याचा परिणाम १- २ वर्षे टिकतो.
     
  लेझर टूथ ब्लीचिंग
यात दातासाठी विशेष जेल वापरून लेझर मशीनच्या साहाय्याने दातांचे ब्लीचिंग केले जाते. यात एनॅमलवर विपरित परिणाम न होता ब्लीचिंगचा परिणाम साडेतीन ते * वर्षे टिकू शकतो. असे असले तरी ब्लीचिंगनंतर दातांची देखभाल करणे आणि चांगल्या मौखिक सवयी पाळणे आवश्यकच ठरते.
टूथपेस्टपेक्षा दात कसे घासता हे महत्त्वाचे!
* ‘ही टूथपेस्ट वापरा आणि दात दररोज एक शेड पांढरे करा!,’ अशा जाहिराती नेहमी पाहायला मिळतात. पण आपण टूथपेस्ट कोणती वापरतो यापेक्षा ब्रश कोणता वापरतो आणि दात कसे घासतो हे अधिक महत्वाचे आहे.
* ब्रश कोणत्या कोनातून दातांवर कसा फिरवावा हे आपल्या दंतवैद्यांकडून समजून घ्यावे.
* दात घासण्यासाठी पेस्ट हे फक्त फेस करणारे साधन आहे. त्यात दातांवरील किटाणू मारणारे घटक आणि दातांना पांढरेपणा देणारे काही क्षार असतात हे खरे. पण जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे दात घासले आणि ते लगेच चमकू लागले असे प्रत्यक्षात होत नसते.
* ब्रश कोणता वापरायचा हे खूप महत्वाचे आहे. अनेकदा ब्रश खूप वापरून झाल्यावर त्याचे ब्रिस्टल्स सॉफ्ट होऊन फाकले तरी तो वापरणे बंद केले जात नाही. हे ब्रिस्टल्स दातांच्या फटींमध्ये पोहोचणे आवश्यक असल्यामुळे साधारणपणे तीन महिन्यांनंतर ब्रश बदलणे इष्ट.

 ‘माऊथवॉश’ वापरावा का?
* तोंडाला दरुगधी येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे आधी नेमके कारण शोधणे आवश्यक.
* दात किडून त्यात अन्नकण अडकून राहिले आणि ते साफ न झाल्यामुळे कुजले तर तोंडाला दरुगधी येते. तसेच हिरडय़ा सैल करणाऱ्या ‘पायोरिया’सारख्या  आजारातही अशी दरुगधी येऊ शकते.
* मौखिक कारणे नसतील तर पोट साफ न होणे, बद्धकोष्ठ, आम्लपित्त, मधुमेह, फुफ्फुसांचा संसर्ग अशा तक्रारीही तोंडाला दरुगधी येण्यास कारणीभूत ठरू शकतात.
* दात ब्रश- पेस्टने घासल्यानंतर माऊथवॉशचा वापर फायदेशीर ठरू शकतो. हिरडय़ांमधील ज्या फटींपर्यंत ब्रश पोहोचू शकत नाही त्या फटी माऊथवॉशच्या जंतूनाशक गुणधर्मामुळे स्वच्छ होतात आणि श्वासांना ताजेपणा येतो.  
डॉ. परेश गांधी
pareshgandhi007@gmail.com
दातांचा रंग किती महत्त्वाचा?
* दात पांढरे शुभ्र कधीच नसतात. त्यांना एक प्रकारची मोतिया रंगाची पिवळसर झाक असतेच.
* दातांचा रंग आपल्या ‘जीन्स’वर अवलंबून असतो.
* शरीराच्या त्वचेची रंगछटाही दातांच्या रंगावर परिणाम घडवते. जसे की, गौरवर्णीय युरोपियन लोकांचे दात मोतिया रंगाचे भासतात; तर आफ्रिकन वंशाच्या लोकांचे दात त्यांच्या कृष्णवर्णी त्वचेमुळे खूप पांढरे दिसतात. भारतीय वंशाच्या लोकांचे दात मुळातच थोडे पिवळसर दिसतात.
* लहान मुलांचे दुधाचे दात मात्र मोठय़ा माणसांपेक्षा नक्कीच जास्त पांढरे दिसतात.
* तंबाखू, सुपारी, पान, मावा अशा व्यसनांमुळे तसेच धूम्रपान आणि मद्यपानामुळेही दातांवर डाग पडतात.
* यापैकी कोणतेही व्यसन नसतानाही दात पिवळे पडू शकतात. चहा, कॉफीच्या अतिसेवनामुळे तसेच आपल्या रोजच्या जेवणात असलेल्या फोडणीतील हळदीमुळेही दातांवर पिवळसर रंग चढतो.
* हल्ली टीव्हीवर दाखवतात त्याप्रमाणे ‘दात अत्यंत पांढरेच दिसले पाहिजेत,’ या धोरणाचा अपप्रचार केला जात आहे. दातांच्या रंगापेक्षाही दातांचे स्वच्छ आणि न किडलेले असणे अधिक महत्वाचे असते. दातांवर कीटण, प्लाक किंवा डाग असतील तर ते हानिकारकच असते. असे अस्वच्छ दात म्हणजे खराब हिरडय़ा आणि पायोरियाला निमंत्रणच. दात किडलेला असेल तर दाताच्या मुळाला सूज येऊन वेदना सुरू होतात. अशा वेळी वेळीच इलाज केला नाही तर दात गमावण्याची वेळही येऊ शकते.  
* त्यामुळे दात काळे, तपकिरी किंवा फार पिवळे नक्कीच नसावेत; पण ते अगदी सफेद कागदासारखे पांढरे दिसावेत असा अट्टाहासही नसावा.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Care of teath
First published on: 21-01-2014 at 06:37 IST