इन्शुलीन कुठे घेणं चांगलं?
साधारणत: इन्शुलीन दंडावर, मांडीवर अथवा पोटावर देतात. ते स्नायूंमध्ये दिलं जात नाही. त्वचेच्या खाली दिलं जातं. यासाठी पोटाचा भाग सगळ्यात चांगला. एकतर स्वत:चं स्वत:ला घेत येतं आणि पोटावर मज्जारज्जू कमी असल्यानं फारसं दुखतही नाही. तिथं जागाही अधिक असल्यानं एकाच जागी पुन्हा पुन्हा टोचण्याची गरज नाही. एकाच जागी पुन्हा पुन्हा इंजेक्शन घेतल्यानं त्या जागेची चरबी झडण्याचा किंवा त्या जागेला कायमची सूज येण्याचा (हायपरट्रॉफी) धोका असतो. अशा जागी इंजेक्शन दिल्यास ते नीट शोषलं जात नाही. डोस कमी पडतो. म्हणून इंजेक्शनची जागा सतत बदलती ठेवावी.
इन्शुलीन फ्रिजमध्येच ठेवावं लागतं का?
इन्शुलीनवर थेट सूर्यप्रकाश पडला तर ते कुचकामी होतं. पण सामान्य तापमानाला ते थंड ठिकाणी, आचेपासून दूर ठेवलं तर ते फ्रिजविना महिनाभर टिकू शकतं. आता इन्शुलीनची पेनं मिळतात. ती अधिक काळ सामान्य तापमानाला टिकतात. प्रवासात असताना, विशेषत: गाडीनं जाताना ते गरम होणार नाही याची काळजी घ्या. एकच गोष्ट लक्षात असू  द्या. इन्शुलीनच्या बाटलीत तुम्हाला कण दिसले तर ती बाटली फेकून द्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुमेह आणि इन्शुलीन यांचं नातं काय आहे
शरीरात दोन यंत्रणा काम करतात. आपण जेवतो तेव्हा बाहेरून येणाऱ्या ग्लुकोजला हाताळणारा हार्मोन म्हणजे इन्श्युलीन. आपण दिवसातून दोनदा जेवतो. दोन वेळा नाश्ता करतो. पण शरीराला चोवीस तास ऊर्जा लागते. यासाठी ग्लुकोजचं पद्धतशीर नियोजन करण्याचं काम इन्श्युलीनकडे असतं. त्यामुळं कोणीही इन्श्युलीनशिवाय जगूच शकत नाही. इन्श्युलीन बाहेरून आलेल्या ग्लुकोजची यकृतात, स्नायूंमध्ये साठवण करतं. त्याचा ऊर्जेसाठी जास्तीत जास्त उपयोग करायला पेशींना उद्युक्त करतं. तरीही ग्लुकोज शिल्लक राहिलं तर त्याचं चरबीच्या कणांमध्ये रूपांतर करतं. मधुमेहाबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा शरीर आवश्यकतेनुसार इन्श्युलीन बनवू शकत नाही किंवा शरीरानं बनवलेलं इन्शुलीन कुचकामी निघतं तेव्हा मधुमेह होतो.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes and insulin
First published on: 06-06-2015 at 06:37 IST